
Donald Trump and Elon Musk
दोन्ही नेत्यांमध्ये फंडिग बिलावरुन तीव्र वाद झाला होता. पण हा वाद विसरुन मस्क आदराने व्हाईट डाऊसच्या डिनरपार्टीमध्ये उपस्थि राहिले. हे रियूनियन अचानक झालेले नाही, तर एक राजकीय आणि वैयक्तिक पातळीवरील एक चर्चा होती. सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सन्मानार्थ डिनर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मस्क यांनाही आमंत्रण मिळाले होते. मस्क या कार्यक्रमात सहभागी झाले आणि पुन्हा एकदा ट्रम्प-मस्क यांच्या मैत्री प्रकाशझोतात आली.
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या बिग ब्युटीफुल धोरणावर तीव्र टीका केली होती. हे फंडिग बिल सरकारचा खर्च वाढवणारा असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. यावरुन दोघांमध्ये तीव्र वाद झाला होता. दोघेही सोशल मीडियावरुन एकमेकांवर हल्ला करत होते. यावेळी मस्क यांनी एपस्टिन प्रकरणाशी ट्रम्प यांचा संबंध असल्याचा आरोप केला. ज्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र वाद झाला. शिवाय नासा चे आयझॅकमॅन यांना प्रमुख पदासाठीच्या उमेदवारीतून हटवण्यात आले. यावरुन नाराजी जास्त वाढली. पण नवीन परर्सनल डायरेक्टर डॅन स्काविनो यांनी वाद सोडवला आणि आयझॅकमॅन यांना नासाच्या प्रमुखपदासाठीचे नामांकन पुन्हा दिले. यामुळे हा वाद इथेच थांबला.
नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या व्हाइट डाऊसमध्ये सौदीचे क्राऊन प्रिन्स यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अमेरिका-सौदी सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. तसेच दोन्ही देशांत शस्त्रास्त्र करारही करण्यात आला. दरम्यान सौदी प्रिन्सच्या सन्मानार्थ ट्रम्प यांनी व्हाइट हाउस स्टेटमध्ये डिनरचे आयोजन केले होते. यावेळी मस्क आणि ट्रम्प एकत्र दिसेल. मस्क यांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची होती, कारण मस्क यांच्या xAI कंपनीने सौदीच्या HUMAIN AI कंपनसोबत मोठा डेंटा सेंटर प्रकल्पाची घोषणा केली आहे. यामुळे दोन्ही देशांचे आंतरराष्ट्रीय नेटवर्किंग अधिक मजबूत होईल.
सध्या ट्रम्प-मस्कमधील ६ महिन्यांच्या तणावानंतर ही भेट मैत्रीचा एक नव्या अध्याय आणि अमेरिकेच्या राजकारणात मोठा ट्विस्ट मानला जात आगे. मस्क यांचे परतणे ट्रम्प सरकार आणि रिपब्लिकनपक्षासाठी मोठा ताकद ठरु शकते. २०२६ च्या निवडणुकांमध्ये समीकरणात बदल होभ शकतो. यामुळे सध्या याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
Musk VS Trump: ट्रम्प यांचा एलॉन मस्कला इशारा; संबंध सुधारण्यास दिला नकार
Ans: ट्रम्पच्या टीमने बॅक-चॅनल चर्चांच्या माध्यमातून ट्रम्प-मस्कमधील तणाव कमी झाला आहे. मस्कच्या धोरणांना पुन्हा मदत करम्याची हमी ट्रम्प सरकारने दिली आहे. तसेच आयझॅकमॅन यांच्या नासाचे नामांकनही पर देण्यात आले आहे.
Ans: ट्रम्प-मस्क यांच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या बिग ब्युटीफूल धोरणांवरुन वाद झाला होता. मस्क यांनी हे विधेयक सराकराचा खर्च वाढवाणारे असल्याचे म्हटले होते. तसेच मस्क यांनी ट्रम्पवर एपस्टिन प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोपही केला होता. यामुळे दोघांमध्ये तीव्र वाद झाला होता.
Ans: मस्क यांचे परतणे ट्रम्प सरकार आणि रिपब्लिकनपक्षासाठी मोठा ताकद ठरु शकते येत्या २०२६ च्या निवडणूकांमध्ये रिपब्लिकन पक्षासाठी मोठा विजय ठरु शकतो. यामुळे ट्रम्प मस्क यांना सपोर्ट करण्याची शक्यता आहे.