Trump Only listening to top 15 economies not everyone's cries
वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : वाढता व्यापार असमतोल कमी करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लादला होता. त्याचा सर्वांत जास्त फटका चीनला बसला. ट्रम्प यांनी नंतर त्यांची टैरिफ योजना ९० दिवसांसाठी थांबवली, परंतु चीनसोबतचा संघर्ष सुरूच असून अमेरिकेने आता चीनवर एकूण २४५ टक्क्यांपर्यंतचा टॅरिफ लादला, तर चीनने अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर १२५ टक्क्यांपर्यंतचा टॅरिफ लादला आहे. दरम्यान, वाढत्या व्यापार युद्धादरम्यान दोन्ही देशांनी उदारता दाखवली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दावा केला की, चीनने त्यांच्याशी टॅरिफवरील चर्चेसाठी संपर्क साधला. यावर बोलणे सुरू आहे.
टॉप १५ अर्थव्यवस्थांमध्ये कोण ?
टॅरिफ लादल्यानंतर अनेक देशांनी अमेरिकेशी संपर्क साधला. अमेरिका त्यापैकी पहिल्या १५ अर्थव्यवस्थांशी चर्चा करत आहे. या टॉप-१५ अर्थव्यवस्थांमध्ये अमेरिका तसेच चीन, जपान, जर्मनी, भारत, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, इटली, ब्राझील, कॅनडा, रशिया, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, स्पेन आणि मेक्सिको यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी बेझंट यांनी या देशांची निवड त्यांच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) आधारावर केली आहे. पहिल्या १५ पैकी चार देश युरोपियन युनियनचे सदस्य आहेत.
Reporter: President Trumps has said China wants to make a deal… Why doesn’t he just pick up the phone and get this ball going?
Leavitt: He would be gracious if China intends to make a deal. If China continues to retaliate, it’s not good for China. The United States of America… pic.twitter.com/wOhF29pqkm
— Acyn (@Acyn) April 11, 2025
credit : social media
भारताबद्दल अमेरिकेचा दृष्टिकोन काय ?
अमेरिकेने सर्व युरोपियन युनियन निर्यातीवर २०% कर लादण्याची घोषणा केल्यानंतर ट्रम्प यांना समोरासमोर भेटणाऱ्या मेलोनी या पहिल्या युरोपियन नेत्या आहेत. त्यांच्या बैठकीनंतर ओव्हल ऑफिसमध्ये पत्रपरिषदेत ट्रम्प यांनी ट्रेझरी सेक्रेटरींना चालू असलेल्या कर चर्चेचे पुनर्मूल्यांकन करण्यास सांगितले. बेझंट म्हणाले, यासाठी आमच्याकडे एक निश्चित प्रक्रिया आहे आणि आम्ही प्रथम ‘मोठ्या १५’ अर्थव्यवस्थांवर काम करत आहोत. आम्ही एकाच वेळी सर्वांचे ऐकू शकत नाही. भारतासोबत टॅरिफ रिझोल्यूशनवर वाटाघाटी खूप वेगाने सुरू आहेत. त्यांनी सांगितले की, एक दिवस आधी जपानसोबत खूप सकारात्मक चर्चा झाली होती आणि युरोपियन युनियन आधीच चर्चा करत आहे. पुढील आठवड्यात दक्षिण कोरियासोबत टैरिफ चर्चा होण्याची शक्यता आहे. अशी आशा त्यांनी व्यक्त केली.