
Bangladesh election chaos Yunus government criticized for excluding Awami League Sheikh Hasina's son alleges
Sajeeb Wajed Slams Mohammad Yunus : बांगलादेशातील (Bangladesh) राजकीय वातावरण आता युद्धाच्या मैदानासारखे तापले आहे. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी अंतरिम सरकारने घेतलेल्या एका निर्णयाने जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग (Awami League) पक्षाला निवडणुकीत सहभागी होण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. या निर्णयावर संताप व्यक्त करत शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद यांनी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
सजीब वाजेद यांनी मॅनहॅटनमधील आपल्या निवासस्थानावरून दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “ज्या पक्षाला देशातील ४० ते ६० टक्के जनतेचा पाठिंबा आहे, त्यांना वगळून निवडणुका घेणे म्हणजे ती लोकशाही नसून केवळ एक ‘राज्याभिषेक’ आहे.” वाजेद यांच्या मते, प्रोफेसर मोहम्मद युनूस हे निवडणुकीला घाबरत आहेत कारण त्यांना माहित आहे की अवामी लीग मैदानात उतरली तर त्यांचे सरकार टिकणार नाही. सजीब यांनी याला राजकीय सूडबुद्धीचे कृत्य म्हटले असून, यामुळे बांगलादेश पुन्हा एकदा अस्थिरतेच्या खाईत लोटला जाईल, असा इशारा दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : New Year 2026: आकाशात फिनिक्सची झेप! दुबई-अबु धाबीत नववर्षाचे जोरदार स्वागत अन् जागतिक विक्रमांची रास, पाहा VIDEO
दुसरीकडे, युनूस सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. मुख्य सल्लागारांचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी स्पष्ट केले की, अवामी लीगने २०२४ च्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर केलेल्या अत्याचारासाठी त्यांना शिक्षा मिळणे आवश्यक आहे. “ज्यांनी देशात फॅसिस्ट राजवट चालवली आणि हजारो निष्पापांचा बळी घेतला, त्यांना लोकशाही प्रक्रियेत स्थान नाही,” असे सरकारने म्हटले आहे. मे २०२५ मध्ये दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत पक्षाच्या राजकीय हालचालींवर बंदी घालण्यात आली होती, जी आता निवडणुकीपर्यंत कायम राहणार आहे.
या राजकीय संघर्षात आता अमेरिकेचीही एन्ट्री झाली आहे. अमेरिकेच्या पाच प्रमुख खासदारांनी युनूस सरकारला पत्र लिहून अवामी लीगवरील बंदीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. “एका मोठ्या राजकीय पक्षाला पूर्णपणे वगळल्यास निवडून आलेल्या सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणे कठीण होईल,” असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र, बांगलादेश सरकारने या पत्राकडे दुर्लक्ष करत आपली भूमिका ‘कायदेशीर’ असल्याचे सांगितले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Great Green Wall 2.0 : चीनचा वाळवंटाला निरोप! आता झाडं नाही, ‘हे’ छोटे जीव वाळवंटात निर्माण करणार नंदनवन, वाचा कसे ते?
राजकीय विश्लेषकांच्या मते, अवामी लीगशिवाय होणारी ही निवडणूक बांगलादेशच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त निवडणूक ठरू शकते. जर ४० टक्क्यांहून अधिक मतदार अवामी लीगला पाठिंबा देणारे असतील, तर त्यांच्या मतदानाशिवाय निवडून आलेले सरकार जनतेचे प्रतिनिधित्व कसे करेल, हा मोठा प्रश्न आहे. या गोंधळामुळे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक आणि अवामी लीगच्या समर्थकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Ans: २०२४ च्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आणि 'फॅसिस्ट' राजवटीचा आरोप करत अंतरिम सरकारने दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत अवामी लीगवर बंदी घातली आहे.
Ans: सजीब वाजेद यांनी म्हटले आहे की अवामी लीगशिवाय होणारी निवडणूक ही 'Coronation' (राज्याभिषेक) आहे, खरी लोकशाही निवडणूक नाही.
Ans: बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.