
bangladesh election 2026 tarique rahman return bnp jamaat islami ncp alliance internal conflict
Tarique Rahman return to Bangladesh 2026 : बांगलादेशातील (Bangladesh) राजकारण सध्या एका अत्यंत निर्णायक वळणावर आहे. १७ वर्षांनंतर लंडनमधून मायदेशी परतलेले बीएनपी (BNP) नेते तारिक रहमान (Tariq Rahman)यांच्या एन्ट्रीने संपूर्ण देशातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. तारिक रहमान यांच्या स्वागतासाठी उसळलेल्या जनसागरामुळे बीएनपीचा विजय निश्चित मानला जात असतानाच, दुसरीकडे कट्टरपंथी जमात-ए-इस्लामी (Jamaat-e-Islami) पक्ष मात्र प्रचंड अडचणीत सापडला आहे. बीएनपीने जमातसोबत निवडणूकपूर्व युती करण्यास स्पष्ट नकार दिल्याने जमातच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
बीएनपीकडून डावलले गेल्यानंतर, जमात-ए-इस्लामीचे प्रमुख शफीकुर रहमान यांनी आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी एक नवीन रणनीती आखली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यावर उभा राहिलेला नवीन पक्ष ‘नॅशनल सिटीझन्स पार्टी’ (NCP) आणि इतर ९ लहान पक्षांसोबत १० पक्षांची एक महायुती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांनी शेख हसीना यांच्याविरोधात क्रांती केली, त्याच विद्यार्थ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आहे. मात्र, या युतीमुळे खुद्द राष्ट्रवादी (NCP) पक्षामध्येच फूट पडली आहे. पक्षाच्या अनेक नेत्यांनी जमातसारख्या कट्टरपंथी पक्षासोबत हातमिळवणी केल्याबद्दल निषेध व्यक्त करत राजीनामे दिले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War: बर्फात सापडले घातपाताचे धागेदोरे! पुतिन यांच्या हत्येच्या कट युक्रेनला पडणार महागात, पुराव्यांबाबत संभ्रम
तारिक रहमान हे बांगलादेशातील तरुण पिढीमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या आगमनामुळे बीएनपी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, अनेक जनमत चाचण्यांमध्ये (Opinion Polls) बीएनपी बहुमताच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. तारिक रहमान यांनी आपल्या भाषणात “शांतता आणि विकासाचा” संदेश दिल्याने मध्यमवर्गीय मतदारांचा कलही बीएनपीकडे झुकला आहे. यामुळेच जमात-ए-इस्लामी, जो पूर्वी बीएनपीचा मोठा मित्रपक्ष होता, तो आता एकाकी पडला आहे.
BIG NEWS 🚨 BNP leader Tarique Rahman returns to Bangladesh. INDIAN MEA : “India supports free and fair elections in Bangladesh, and this development should be viewed in that context only” Main Contest is between BNP and Jamaat-e-Islami in Bangladesh. Jamaat-e-Islami is Anti… pic.twitter.com/RtpqTvgrt6 — News Algebra (@NewsAlgebraIND) December 26, 2025
credit : social media and Twitter
निवडणूकपूर्व युती होत नसल्याचे पाहून आता जमातने एक नवीन युक्ती वापरली आहे. जमातचे प्रमुख शफीकुर रहमान यांनी संकेत दिले आहेत की, निवडणुकीनंतर जर बीएनपीला गरज पडली, तर जमात त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्यास तयार आहे. “आम्हाला किमान पाच वर्षे स्थिर देश पाहायचा आहे आणि त्यासाठी आम्ही एकत्र काम करू शकतो,” असे विधान त्यांनी केले आहे. हे विधान म्हणजे बीएनपीच्या जवळ जाण्याचा जमातचा प्रयत्न मानला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Election 2026: तुम्ही निवडणुकीला घाबरताय? अवामी लीगला वगळल्याबद्दल युनूस सरकारवर हसीनांच्या पुत्राचा सर्जिकल स्ट्राईक
जमात-ए-इस्लामीचा इतिहास नेहमीच वादात राहिला आहे. १९७१ च्या मुक्ती युद्धादरम्यान या पक्षाने पाकिस्तानी सैन्याला पाठिंबा दिला होता, ज्यामुळे बांगलादेशी जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल आजही प्रचंड राग आहे. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जमातला निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती आणि २०२४ मध्ये हसीना सरकारने त्यांना ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित केले होते. मात्र, मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने ही बंदी उठवल्याने जमात पुन्हा सक्रिय झाली आहे.
Ans: तारिक रहमान तब्बल १७ वर्षांच्या वनवासानंतर (लंडनहून) बांगलादेशात परतले आहेत.
Ans: जमातने विद्यार्थी आंदोलनातून उदयाला आलेल्या नॅशनल सिटीझन्स पार्टी (NCP) आणि इतर लहान पक्षांसोबत युती केली आहे.
Ans: बांगलादेशात १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व ३०० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.