Trump reduces tariffs on South Korea, says 'good relations with US
South Korea US relations : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ (Tarrif) धोरणाने संपूर्ण जग चिंतेत आहे. ट्रम्प अमेरिकेला व्यापारामध्ये पुढे नेण्याचा हेतू ठेवून निर्णय घेत आहे, मात्र याचा फटका जागतिक पुरवठा साखळीला बसत आहे. त्यांच्या मते, अमेरिकेवर जे देश जास्त कर लावतील त्यांच्यावरही अमेरिका तितकाच कर लादणार आहेत.
दक्षिण कोरियावरही ट्रम्प यांनी २५% कर लागू केला होता, मात्र हा कर वाटाघाटीच्या चर्चेनंतर कमी करण्यात आला आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियातील संबंध चांगले झाले असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दक्षिण कोरिया (South Korea) आणि अमेरिकेत (America) नवीन व्यापार करार करण्यात आला आहे. या करारानंतर ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.
येत्या दोन आठवड्यात ट्रम्प आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांची बैठक होणार आहे. व्हाइट हाउसमध्ये ही बैठक पार पडेल. या बैठकीची तारिख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. या बैठीबद्दल पत्रकाराने प्रश्न विचारले असता ट्रम्प यांनी दक्षिण कोरियासोबत संबंध चांगले झाले असल्याचे म्हटले.
ट्रम्प यांनी म्हटले की, “अमेरिकेचे दक्षिण कोरियाशी खूप चांगले संबंध आहेत.” दोन्ही देशांत गेल्या महिन्यांत बुधवारी (३० जुलै) रोजी व्यापार करारची घोषणा केली होती. यामध्ये दक्षिण कोरियावरील कर १५% करण्यात आला होता.
दक्षिण कोरियाने अमेरिकेमध्ये गुंतवणूकीचे आश्वासनही दिले आहे. येत्या ४ वर्षांत दक्षिण कोरिया अमेरिकेमध्ये ३५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यातील १०० अब्ज डॉलर्स अमेरिकन उर्जा उत्पादनांच्या खरेदीसाठी गुंतवले जाणार आहे. याशिवाय, तांदूळ आणि गोमांसावर दक्षिण कोरियाने अमेरिकेवर कर लादत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र गोमांस उत्पादनांवरील बंदी उठवण्यात आली आहे. तांदूळश व्यापारबाबत अद्याप कोणताही करार करण्यात आलेला नाही.
अमेरिकेने दक्षिण कोरियावर किती कर लागू केला होता?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियावर २५% टक्के कर लागू केला होता.
अमेरिका आणि दक्षिण कोरियातील वाटाघाटीनंतरची स्थिती काय आहे?
अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये करावर वाटाघाटाची चर्चा करण्यात आली. ३० जुलै रोजी दोन्ही देशात व्यापार करार करण्यात आला. याअंतर्गत अमेरिकेने दक्षिण कोरियावर १५% कर लागू केला आहे.
दक्षिण कोरिया अमेरिकेत किती डॉलर्सची गुंतवणूक करणार?
दक्षिण कोरिया अमेरिकेमध्ये ३५० अब्ज डॉलर्स गुंतवणार असून यातील १०० अब्ज डॉलर्स अमेरिकेची उर्जा उत्पादने खरेदी करणाऱ्यासाठी आहेत.
पाकिस्तानमध्ये भीषण रेल्वे अपघात; ट्रेनचे डब्बे रुळावरुन घसरल्याने १० हून अधिक जखमी