Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आम्हाला टॉयलेट पेपर सारखं वापरलं…! भारत-अमेरिकेच्या वाढत्या जवळीकतेने पाकिस्तानचा जळफळाट

Pakistan US Relations : पाकिस्तानने अमेरिकेशी संबंधावर मोठे खळबळजनक विधान केले आहे. यामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या मते, अमेरिकेशी संबंधामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 11, 2026 | 03:09 PM
Pakistan US Relations

Pakistan US Relations

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेशी जवळीक वाढून पाकिस्तानला पाश्चाताप
  • अमेरिकेशी संबंधावर केला मोठा दावा
  • जाणून घ्या काय म्हणाले आसिफ ख्वाजा
Asif Kahwaja on Relations with US : इस्लामाबाद : गेल्या अनेक काळापासून अमेरिकेच्या (America) जीवावर उड्या मारणाऱ्या पाकिस्तानचा (Pakistan) प्रेमभंग झाला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी संसदेत बोलताना अमेरिकेशी संबंधावर खळबळजनक विधान केले आहे. तसेच अमेरिकेवर गंभीर आरोपही केले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ख्वाजा यांनी अमेरिकेने पाकिस्तानला टॉयलेट पेपर सारखे वापरले असल्याचे म्हटले आहे. त्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा भारत आणि अमेरिकेची जवळीकता वाढत आहे.

ट्रम्प यांचा दुटप्पी चेहरा! अमेरिकेने Pok आणि अक्साई चीन भारताचा भाग दाखवणारा नकाशा गुपचूप हटवला; ड्रॅगनला घाबरली महासत्ता?

काय म्हणाला पाकिस्तान ?

आसिफ ख्वाज यांनी पाकिस्तानच्या संसदेत बोलताना, २००१ नंतर अमेरिकेशी संबंधावर भाष्य केले आहे. त्यांनी अमेरिकेशी संबंध प्रस्थापित करणे पाकिस्तानची मोठी धोरणात्मक चूक असल्याचे म्हटले आहे. यामुळे पाकिस्तानचे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हटले. पाकिस्तानने आमचा टॉयलेटपेपर सारखा वापर केल्याचा आणि गरज संपल्यावर फेकून दिल्याचा आरोप केला आहे.

अफगाण युद्धात अमेरिकेला साथ सर्वात मोठी चूक -ख्वाजा

संसदेत बोलताना ख्वाजा यांनी पाकिस्तानच्या जुन्या निर्णयाचा उल्लेख केला. यामध्ये त्यांनी १९८० च्या दशकात सोव्हिएत युनियनविरोधी आणि २०११ च्या अफगाणविरोधी युद्धात अमेरिकेला साथ दिल्याची सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले. त्यांच्या मते पाकिस्तान इस्लामच्या रक्षणासाठी किंवा जिहादासाठी युद्ध लढला नाही, तर अमेरिकेच्या पाठिंबा आणि राजकीय वैधता मिळवण्यासाठी युद्ध लढले.

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी खुलासा केला की, जिहादच्या नावाखाली त्यांच्या लोकांची दिशाभूल करण्यात आली. प्रत्याक्षात त्यांना प्रॉक्सी वॉर मध्ये अडकवण्यात आले. ख्वाजा यांनी हे कबूल केले की या युद्धांचे समर्थन करण्यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या शैक्षणिक पाठ्यक्रमातही बदल केला. याचा विपरित परिणाम पाकिस्तानमध्ये झाला.

ख्वाजा यांनी अमेरिकेने पाकिस्तानचा त्यांच्या स्वार्थासाठी वापर करुन घेत असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, अमेरिकेने त्यांना टॉयलेट पेपरपेक्षाही वाईट वागणूक दिली पूर्वीच्या पाकिस्तानी धोरणांना वाढत्या हिंसाचार, अतिरेकीपण आणि आर्थिक संकटासाठी ख्वाजा यांनी जबाबादार धरले.

Big statement –
“Pak was used like toilet paper”
Khawaja Asif admitted that Pakistan has historically fought wars for superpowers & waged a “Made in USA” jihad. Asif also claimed that Pakistan was treated “worse than toilet paper” by USA, used for a purpose and then discarded. pic.twitter.com/DpNFAWfG9I — War & Gore (@Goreunit) February 11, 2026


पाकिस्तानची पुन्हा नाच्चकी! रशियाने भारत-पाक वादात मध्यस्थीस दिला नकार, शाहबाज सरकारला दिला महत्वाचा सल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: आसिफ ख्वाजा यांनी अमेरिकेबाबत काय विधान केले?

    Ans: आसिफ ख्वाजा यांनी, पाकिस्तानने २००१ पासून अमेरिकेशी संबंध प्रस्थापित करणे सर्वात मोठी चूक होती. अमेरिकेने केवळ त्यांच्या स्वार्थासाठी पाकिस्तानचा वापर करुन घेतला, त्यांना टॉयलेट पेपरपेक्षाही तुच्छ वागणूक दिली असे म्हटले.

  • Que: अफगाण युद्धाबाबत पाकिस्तानने काय म्हटले?

    Ans: २०११ च्या अफगाणविरोधी युद्धात अमेरिकेला साथ दिल्याची सर्वात मोठी चूक असल्याचे आसिफ ख्वाजा यांनी म्हटले.

Web Title: Used like toilet paper pakistan on us relations after growing india us ties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Donald Trump
  • India-US trade deal
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

ट्रम्प यांचा दुटप्पी चेहरा! अमेरिकेने Pok आणि अक्साई चीन भारताचा भाग दाखवणारा नकाशा गुपचूप हटवला; ड्रॅगनला घाबरली महासत्ता?
1

ट्रम्प यांचा दुटप्पी चेहरा! अमेरिकेने Pok आणि अक्साई चीन भारताचा भाग दाखवणारा नकाशा गुपचूप हटवला; ड्रॅगनला घाबरली महासत्ता?

India-US Trade Deal: ट्रम्पच्या आदेशानंतर जागतिक तेल बाजारावर भारत-अमेरिका कराराचा मोठा परिणाम होणार?
2

India-US Trade Deal: ट्रम्पच्या आदेशानंतर जागतिक तेल बाजारावर भारत-अमेरिका कराराचा मोठा परिणाम होणार?

Bangladesh Elections : मोहम्मद युनूस यांचे मोठे आश्वासन; मतदानानंतर लोकशाही सरकारला सोपवणार सत्ता
3

Bangladesh Elections : मोहम्मद युनूस यांचे मोठे आश्वासन; मतदानानंतर लोकशाही सरकारला सोपवणार सत्ता

Bangladesh Election : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्तरंजित खेळ! प्रचारादरम्यान BNP नेत्याचा डोळाच काढला, देशभरात खळबळ
4

Bangladesh Election : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्तरंजित खेळ! प्रचारादरम्यान BNP नेत्याचा डोळाच काढला, देशभरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.