Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Tariff Team: पीटर, स्कॉट, हॉवर्ड… ट्रम्पच्या टॅरिफ टीमचे ‘त्रिमूर्ती’, ज्यांच्या एका सल्ल्याने उडवली भल्या भल्याची झोप

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाने जगाला हादरवून टाकले आहे. सध्या ट्रम्प यांनी 70 हून अधिक देशांवर परस्पर कर लागू केलेल्या देशांना करातून 90 दिवसांची सवलत दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 10, 2025 | 05:00 PM
Trump Tarrif Team Peter Navarro, Scot baessent, Howard Lutnick, Trade War who stands with Trump tariffs

Trump Tarrif Team Peter Navarro, Scot baessent, Howard Lutnick, Trade War who stands with Trump tariffs

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाने जगाला हादरवून टाकले आहे. सध्या ट्रम्प यांनी 70 हून अधिक देशांवर परस्पर कर लागू केलेल्या देशांना करातून 90 दिवसांची सवलत दिली आहे. मात्र या सवलतीमधून चीनला वगळले आहे. चीन आणि अमेरिकेत टॅरिफ वॉर सुरुच असून ट्रम्प यांनी चीनवर तब्बल  125% शुल्क लादले आहे. चीनने देखील अमेरिकन उत्पादनांवर 84% अतिरिक्त कर लागू केला आहे. यामुळे दोन्ही देशांत प्रचंड तांडव सुरु आहे.

पण तुम्हाला माहिती आहे, ट्रम्प यांच्या एवढा मोठा निर्णय घेण्यामागे कोणचा हात आहे? त्यांच्या टॅरिफ बॉम्बच्या धोरणामागे तीन असे चेहरे आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. यामध्ये पीटर नैवारौ, स्कॉट बेसेंट आणि हार्वर्ड लुटनिक यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. डोनाल्ड ट्रम्प टॅरिफचे समर्थक असून या त्रिमूर्तीसोबत मिळून सर्वांना धक्का दिला आहे.

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, जगभरातील देशांनी अनेक दशकांपासून अमेरिकेला लुटले आहे, आता यापूढे असे होऊ दिले जाणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- जॉर्जिया मेलोनी चिंतेत! इटलीत परिवहन सेवा एकाच वेळी ठप्प, नेमकं प्रकरण काय?

पीटर नैवारो चीनचे विरोधक

पीटर नैवारो हे सर्वात मोठे आणि ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार आहेत. सध्या जगभरात यांची चर्चा सुरु आहे.एलॉन मस्कसोबतचा टॅरिफवाद सध्या चांगलाच रंगला आहे. ते ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचे मुख्य सुत्रधार मानले जातता. ते कट्टर चीनविरोधी असून त्यांनी Death by China आणि China Wars या पुस्तकांमधून विरोधी भूमिका मांडली आहे. तसेच ते America First धोरणाचे कट्टर समर्थक आहेत.

त्यांचा ठाम विश्वास आहे की, उच्च टॅरिफमुळे परकीय उत्पादन महागेल. यामुळे देशांतर्गत उत्पादनाला, रोजगार वाढीला चालना मिळेल. नैवारो यांनीच प्रथम परस्पर शुल्काचा सल्ला ट्रम्प यांना दिला होता. त्यांच्या या निर्णयामागे असा हेतू होता की, यामुळे अमेरिकेची व्यापर तूट संतुलित राहिल आणि यामुळे परदेशी देशांना त्यांच्या धोरणांत बदल करावा लागेल.

अर्थमंत्री स्कॉट बेसेंट

अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी पूर्वी हेज फंड मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी नैवारो यांच्या रेसिप्रोकल टॅरिफ धोरणाला पाठिंबा दिला आहे. 2015 मध्ये त्यांनी स्वत:ची KEY Square Group नावाची गुंतवणूक कंपनी सुरु केली होती. त्यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला नेहमीच समर्थन दिले आहे.

त्यांचा विश्वास आहे की टॅरिफमुळे केवळ व्यापरच संतुलित होणार नााही, तर यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे, पण टॅरिफचे धोरण दीर्घ काळ फायदेशीर ठरेल असले त्यांचे म्हणणे आहे.

हार्वर्ड लुटनिक

ट्रम्प यांच्या ‘Make The America Great Again’ धोराणाचे समर्थक आहेत. ट्रम्प यांचे खास मित्र आणि अमेरिकेच्या वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून लुटनिक कार्यरत आहेत. त्यांच्या टॅरिफ धोरणाचे ‘de facto Face’मानले जाते. त्यांच्या मते, टॅरिफमुळे इतर देशांवार दबाव आणून त्यांना धोरण बदलण्यास भाग पाडता येते. चीन आणि व्हिएतनामसारख्या देशांवर अधिक शुल्क लागू करण्याध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

ही त्रिमूर्ती म्हणजे ट्रम्प यांच्या संरक्षणवादी धोरणामागील बौद्धिक आणि धोरणात्मक आधारस्तंभ आहे. यांनी जागतिक व्यापारात मोठा वादळ निर्माण केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताचा बांगलादेशला मोठा दणका; ‘या’ सुविधेवर आणली बंदी, आता नेमकं काय होणार?

Web Title: Trump tarrif team peter navarro scot baessent howard lutnick trade war who stands with trump tariffs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
2

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
3

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
4

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.