Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Threatens Iran: अमेरिका हल्ला करण्यास तयार! ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट आणि इराणमधील झाला आंदोलनाचा भडका

Trump on Iran Protest: रविवार (दि. २८ डिसेंबर २०२५) पासून सुरू झालेल्या इराणमध्ये सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये झालेल्या संघर्षात किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 02, 2026 | 04:06 PM
Trump Threatens Iran If anything happens now America will attack 7 protesters die in Iran Angry Donald Trump warns of war

Trump Threatens Iran If anything happens now America will attack 7 protesters die in Iran Angry Donald Trump warns of war

Follow Us
Close
Follow Us:
  •  इराणमध्ये निदर्शकांवर सुरू असलेल्या गोळीबारावर संताप व्यक्त करत डोनाल्ड ट्रम्प यांनी “अमेरिका आता शांत बसणार नाही, आम्ही हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार आहोत,” असा थेट इशारा दिला आहे.
  •  महागाई आणि आर्थिक संकटाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, सुरक्षा दलांच्या कारवाईत ७ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे.
  •  इराणचा महागाई दर ४२ टक्क्यांच्या पार गेल्याने जनता रस्त्यावर उतरली असून, राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी “लोकांच्या समस्या सोडवल्या नाहीत तर आपल्याला नरकाचा सामना करावा लागेल,” अशी कबुली दिली आहे.

Trump on Iran Protest : मध्य पूर्वेतील तणाव आता एका स्फोटक वळणावर पोहोचला आहे. इराणमध्ये महागाई आणि चलनाचे मूल्य कोसळल्याने सर्वसामान्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अतोनात हिंसक स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या २४ तासांत सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ७ निदर्शकांचा बळी गेल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रचंड संतप्त झाले आहेत. त्यांनी इराणच्या (Iran) राज्यकर्त्यांना कडक शब्दात बजावले आहे की, जर शांततापूर्ण आंदोलकांचे रक्त सांडणे थांबले नाही, तर अमेरिका लष्करी कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘ट्रुथ सोशल’वर वादळ!

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत इराणला धारेवर धरले. “इराणमधील लोक स्वातंत्र्यासाठी आणि चांगल्या जीवनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना मारणे बंद करा. अमेरिका पूर्णपणे तयार आहे (Fully Prepared) आणि आम्ही कडक कारवाई करण्यास सज्ज आहोत,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या विधानामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धाची शक्यता पुन्हा एकदा बळावली आहे. विशेषतः जून २०२५ मध्ये अमेरिकेने इराणच्या काही तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर हा तणाव आता टोकाला पोहोचला आहे.

का पेटलाय इराण? महागाईचा ४२ टक्क्यांचा विळखा!

इराणमधील हे आंदोलन रविवारी (२८ डिसेंबर २०२५) तेहरानच्या ‘ग्रँड बाजार’मधील व्यापाऱ्यांनी सुरू केले होते. इराणचे चलन ‘रियाल’ अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १४ लाखांच्याही खाली कोसळले आहे. महागाईचा दर ४२.५ टक्क्यांवर गेल्याने सर्वसामान्य लोकांना अन्नधान्य खरेदी करणेही कठीण झाले आहे. तेहरान, इस्फहान आणि लोरेस्तान सारख्या प्रांतात हजारो लोक “हुकूमशहा मुर्दाबाद”च्या घोषणा देत रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारी १० हून अधिक विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी या आंदोलनात उडी घेतल्याने परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर गेली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?

७ मृत्यू आणि सुरक्षा दलांचा क्रूर चेहरा

‘सीएनएन’ आणि मानवाधिकार संघटनांच्या अहवालानुसार, लोरेस्तान आणि चहारमहाल प्रांतात सुरक्षा दलांनी आंदोलकांवर थेट गोळीबार केला. यात एका निष्पाप मुलासह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी पोलीस वाहने पेटवून दिली, तर काही ठिकाणी निमलष्करी दलाच्या (Basij) जवानांवरही हल्ले झाले. सरकारने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असली, तरी लोक माघार घेण्यास तयार नाहीत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी

पेझेश्कियान यांचा ‘नरकाचा’ इशारा!

एकीकडे सुरक्षा दले दडपशाही करत असताना, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. त्यांनी सरकारी टीव्हीवर बोलताना मान्य केले की, जनतेच्या मागण्या रास्त आहेत. “इस्लामिक तत्त्वांनुसार, जर आपण लोकांच्या पोटाचा प्रश्न सोडवू शकलो नाही, तर आपल्याला नरकात जावे लागेल,” असे हताश विधान त्यांनी केले आहे. मात्र, इराणमधील खरी सत्ता सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या हातात असल्याने पेझेश्कियान यांच्या बोलण्याला किती किंमत मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणमध्ये निदर्शने का होत आहेत?

    Ans: इराणमध्ये वाढलेली प्रचंड महागाई (४२.५%), चलनाचे अवमूल्यन आणि बिघडलेली आर्थिक परिस्थिती यामुळे जनता सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे.

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी काय इशारा दिला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर लिहिले आहे की, जर इराणने शांततापूर्ण निदर्शकांना मारणे सुरूच ठेवले, तर अमेरिका लष्करी कारवाई करण्यास पूर्णपणे तयार आहे.

  • Que: इराणमधील सध्याची आर्थिक स्थिती काय आहे?

    Ans: इराणच्या चलनाचा (Rial) दर डॉलरच्या तुलनेत कमालीचा घसरला असून महागाई गेल्या अनेक वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहे.

Web Title: Trump threatens iran if anything happens now america will attack 7 protesters die in iran angry donald trump warns of war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Gen Z
  • international news
  • iran

संबंधित बातम्या

Cyclone Ditwah : भारतच आमचा खरा मित्र! चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या श्रीलंकेसाठी जयशंकर बनले ‘तारणहार’
1

Cyclone Ditwah : भारतच आमचा खरा मित्र! चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या श्रीलंकेसाठी जयशंकर बनले ‘तारणहार’

Yemen Conflict : 10 मिनिटांची भेट अन् सौदीची नाराजी! क्राऊन प्रिन्स पाकिस्तानवर भडकले; सौदी-युएई संघर्षात पाकची कोंडी
2

Yemen Conflict : 10 मिनिटांची भेट अन् सौदीची नाराजी! क्राऊन प्रिन्स पाकिस्तानवर भडकले; सौदी-युएई संघर्षात पाकची कोंडी

प्रेम फक्त दोन जणांचं नाही! Gen Z जनरेशनला प्रेमात लागते मित्रांच्या परवानगीची गरज; वाढत चाललाय नवा ट्रेंड
3

प्रेम फक्त दोन जणांचं नाही! Gen Z जनरेशनला प्रेमात लागते मित्रांच्या परवानगीची गरज; वाढत चाललाय नवा ट्रेंड

इराणमध्ये परिस्थिती बिकट ! तेहरानमध्ये ‘हुकूमशहा मुर्दाबाद’च्या घोषणा; आंदोलनात अनेकांचा मृत्यू
4

इराणमध्ये परिस्थिती बिकट ! तेहरानमध्ये ‘हुकूमशहा मुर्दाबाद’च्या घोषणा; आंदोलनात अनेकांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.