Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3: 24 मार्चला होणार महायुद्ध? 48 तासांचा काऊंटडाऊन सुरु; ट्रम्पची अट न मानल्यास इराणमध्ये पसरणार अंधाराचे साम्राज्य

World War 3 : इस्रायलवरील मोठ्या हल्ल्यानंतर, जर ४८ तासांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही, तर इराणचे वीज प्रकल्प नष्ट करण्याची धमकी ट्रम्प यांनी तेहरानला दिली आहे. जाणून घ्या याबाबत सविस्तर अपडेट.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 22, 2026 | 08:11 AM
trump ultimatum iran 48 hours hormuz strait power plant threat israel attack update

trump ultimatum iran 48 hours hormuz strait power plant threat israel attack update

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांचा ४८ तासांचा अल्टिमेटम
  • इस्रायलवर भीषण हल्ला
  • जागतिक ऊर्जा संकट

Trump ultimatum to Iran 48 hours : आज २२ मार्च २०२६, जगाच्या इतिहासातील एक अत्यंत संवेदनशील दिवस ठरण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला (Iran) दिलेला ‘अल्टिमेटम’ केवळ दोन देशांमधील वाद नसून, तो तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरू शकतो. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून जगाची ‘ऊर्जा नस’ दाबली आहे, ज्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणचे अस्तित्व धोक्यात आणणारी धमकी दिली आहे.

नेमकी घटना काय? ट्रम्प यांची ‘ट्रुथ सोशल’ पोस्ट

भारतीय वेळेनुसार पहाटे ५:१४ वाजता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ अकाउंटवरून इराणला थेट चेतावणी दिली. ट्रम्प यांनी म्हटले की, “इराणकडे आतापासून केवळ ४८ तास आहेत. जर त्यांनी कोणत्याही अटीशिवाय होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही, तर अमेरिका त्यांच्या सर्वात मोठ्या वीज प्रकल्पांवर हल्ले करून ते पूर्णपणे उद्ध्वस्त करेल.” हा अल्टिमेटम २४ मार्च रोजी पहाटे ५:१४ वाजता संपणार आहे. इराणने याकडे दुर्लक्ष केल्यास तेहरानसह संपूर्ण इराण अंधारात बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : अमेरिका 172 दशलक्ष बॅरल तेल बाजारात आणणार; इराणच्या मुसक्या आवळण्यासाठी वापरणार ‘ही’ रणनीती

इस्रायलमधील रक्तपात आणि दिमोनावर हल्ला

इराणने यापूर्वीच इस्रायलच्या दिमोना आणि अराद या शहरांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. दिमोना हे ठिकाण इस्रायलच्या मुख्य अणुसुविधेसाठी ओळखले जाते. या हल्ल्यात १०० हून अधिक लोक जखमी झाले असून, अनेक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. नतान्झ अणुसुविधेवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचा दावा इराणने केला आहे. मात्र, इस्रायलने दिमोनासारख्या संवेदनशील ठिकाणी झालेला हा हल्ला गांभीर्याने घेतला असून, अमेरिकेने आता या संघर्षात थेट उडी घेतली आहे.

🚨 “If Iran doesn’t FULLY OPEN, WITHOUT THREAT, the Strait of Hormuz, within 48 HOURS from this exact point in time, the United States of America will hit and obliterate their various POWER PLANTS, STARTING WITH THE BIGGEST ONE FIRST…” – President DONALD J. TRUMP pic.twitter.com/htLz1A0Mf7 — The White House (@WhiteHouse) March 22, 2026

credit – social media and Twitter

होर्मुझची सामुद्रधुनी: जगाचा गळा इराणच्या हातात?

होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची जलवाहतूक मार्ग आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के तेल याच मार्गातून वाहते. इराणने या मार्गाची नाकेबंदी केल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अमेरिकेत काही महिन्यांतच निवडणुका आहेत आणि वाढती इंधन दरवाढ ट्रम्प यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या घातक ठरू शकते. त्यामुळेच ट्रम्प यांनी आता ‘आर-पार’ची लढाई लढण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

इराणचे वीज प्रकल्प का आहेत निशाण्यावर?

ट्रम्प यांनी इराणच्या ‘एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर’ला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. जर इराणचे वीज प्रकल्प नष्ट झाले, तर केवळ उद्योगधंदेच नाही, तर त्यांचे लष्करी दळणवळण आणि संरक्षण यंत्रणाही कोलमडून पडेल. इराणचे सर्वात मोठे वीज प्रकल्प कोणते आहेत हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नसले तरी, तज्ज्ञांच्या मते ‘बुशहर’ सारखी ठिकाणे अमेरिकेच्या रडारवर असू शकतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Crude Oil: ‘तुमची सवलत तुमच्याकडेच ठेवा’ ट्रम्पच्या ‘ऑईल गेमवर’ इराणची गुगली; 30 दिवसांच्या ऑफरला म्हटलं ‘खोटी आशा’

 २४ मार्चला काय होणार?

आता संपूर्ण जगाचे लक्ष २४ मार्चच्या त्या वेळेकडे लागले आहे. इराण ट्रम्प यांच्या धमकीपुढे झुकणार की होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवून युद्धाला निमंत्रण देणार? जर ही सामुद्रधुनी उघडली नाही, तर अमेरिका आणि इराणमधील थेट संघर्ष जागतिक अर्थव्यवस्थेला खिळ घालू शकतो. भारत, युरोप आणि आशियाई देशांसाठी हा काळ अत्यंत कठीण असणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणला दिलेला ४८ तासांचा अल्टिमेटम कधी संपतो?

    Ans: हा अल्टिमेटम २४ मार्च २०२६ रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ५:१४ वाजता संपणार आहे.

  • Que: होर्मुझची सामुद्रधुनी का महत्त्वाची आहे?

    Ans: जगातील २०% तेल पुरवठा याच मार्गातून होतो. याची नाकेबंदी झाल्यास जगभरात इंधन टंचाई आणि महागाई प्रचंड वाढते.

  • Que: इराणने इस्रायलवर हल्ला का केला?

    Ans: इराणच्या नतान्झ अणुसुविधेवर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून इराणने इस्रायलच्या दिमोना आणि अराद शहरांवर क्षेपणास्त्र माऱ्या केला.

Web Title: Trump ultimatum iran 48 hours hormuz strait power plant threat israel attack update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 08:02 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Trump च्या निर्णयाने बाजार उसळला, GIFT Nifty 4% ने वाढला, 23,000 चा आकडा पार होण्याची आशा
1

Trump च्या निर्णयाने बाजार उसळला, GIFT Nifty 4% ने वाढला, 23,000 चा आकडा पार होण्याची आशा

Middle East War: ‘तेलाचा साठा पुरेसा आहे, मात्र LPG चा पुरवठा…’; मध्य-पूर्वेतील संघर्षाबाबत क्रेंद सरकारचे मोठे विधान
2

Middle East War: ‘तेलाचा साठा पुरेसा आहे, मात्र LPG चा पुरवठा…’; मध्य-पूर्वेतील संघर्षाबाबत क्रेंद सरकारचे मोठे विधान

World War 3: “आमच्या इशाऱ्यामुळेच अमेरिकाने गुडघे टेकले”; Donald Trump यांच्या विधानावर इराणचा पलटवार
3

World War 3: “आमच्या इशाऱ्यामुळेच अमेरिकाने गुडघे टेकले”; Donald Trump यांच्या विधानावर इराणचा पलटवार

US Iran युद्धात Donal Trump यांनी टाकला ‘शांततेचा बाॅम्ब’! आता तरी ऊर्जा संकटातून दिलासा मिळणार का?
4

US Iran युद्धात Donal Trump यांनी टाकला ‘शांततेचा बाॅम्ब’! आता तरी ऊर्जा संकटातून दिलासा मिळणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.