
Trump Urges NATO to Impose 50 to 100 percent tarrif on China
काय लिहिले होते पत्रात?
डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (१३ सप्टेंबर) नाटो देशांना एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी म्हटले की, “मी रशियावर कठोर निर्बंध लादण्यास तयार आहे. जर नाटो देश यावर सहमत असतील तर त्यांनी रशियावर निर्बंध लादण्यास सुरुवात करावी. तसेच रशियाकडून तेल खरेदी थांबवावी. त्यांनी पत्रात पुढे म्हटले की, भारतानंतर आता चीनवर कर लादण्याची वेळ आली आहे. चीनवर ५० ते १००% पर्यंत शुल्क लादण्यात यावे. हे रशिया आणि युक्रेन युद्ध थांबल्यानंतर उठवले जाईल. हे पाऊल घातक असले तरी युद्ध संपवण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे ट्रम्प यांनी पत्रात म्हटले.”
कोणते देश रशियाकडून तेल खरेदी करतात
ट्रम्प यांनी सांगितले की, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्यांमध्ये नाटोचा सदस्य देश तुर्की आहे. चीन आणि भारतानंतर तुर्की हा सर्वात मोठा रशियाचा तेल व्यापारी भागीदार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यानंतर हंगेरी आणि स्लोवाकियाराखे देशही रशियाकडून तेल खरेदी करतात. या देशांना ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास सांगतिल आहे.
भारतावरील कर
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदीमुळे ५०% कर लादला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारत रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धात आर्थिक पाठबळ देत आहे. यामुळे युद्ध थांबवण्याचे नाव घेईना. पण भारतवार कर लादल्यास रशियावर दबाव निर्माण होईल आणि मॉस्को युद्ध थांबवेल असे ट्रम्प यांचे मत आहे. दरम्यान भारताने ट्रम्प यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. हा कर अन्यायकारक असल्याचे भारताने म्हटले आहे.
चीनवरील कर
दुसरीकडे सध्या चीनवर अमेरिकेने ३०% कर लादला आहे. परंतु ट्रम्प यांनी नाटो देशांना चीनवर ५० ते १०० टक्के कर लादण्याची मागणी केली आहे. हा कर युद्ध थांबल्यानंतर उठवला जाईल असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.