Trump warned Zelensky of trouble ahead during their tense White House meeting on February 28, 2025
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात शुक्रवारी (28 फेब्रुवारी 2025) व्हाईट हाऊसमध्ये महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत युक्रेनमधील युद्ध, अमेरिका-युक्रेन संबंध आणि खनिज करारांवर चर्चा झाली. मात्र, चर्चेच्या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तणाव वाढला आणि वादावादीपर्यंत मजल गेली. ट्रम्प यांनी थेट झेलेन्स्की यांना धमकीच्या सुरात सांगितले की, “आजपासून तुमचे वाईट दिवस सुरू.”
रशिया-युक्रेन युद्धावरून तणाव वाढला
झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्या समोर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना “दहशतवादी” घोषित करण्याची मागणी केली आणि “जगाने खुनीशी तडजोड करू नये,” असे ठामपणे सांगितले. यावर ट्रम्प यांनी युक्रेनला रशियासोबत शांतता करार करण्याचा सल्ला दिला. मात्र, झेलेन्स्की यांनी हा प्रस्ताव ठामपणे नाकारला आणि स्पष्ट केले की, “आम्ही कोणताही युद्धविराम स्वीकारणार नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तिसरं महायुद्ध अटळ? उत्तर कोरियाने पुन्हा एकदा जगाला दिला युद्धाचा इशारा
या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाला. ट्रम्प यांनी रोखठोक भाषेत झेलेन्स्की यांना सुनावले, “तुमचा देश संकटात आहे. तुम्ही अमेरिकेला आदेश देण्याच्या स्थितीत नाही. आम्ही तुम्हाला ३५० अब्ज डॉलर्सची शस्त्रे पुरवली, आणि तरीही तुम्ही तडजोड करण्यास तयार नाही. जर तुम्ही शांतता करार केला नाही, तर आम्ही या संघर्षातून बाहेर पडू.”
बैठकीत तणाव शिगेला; उपाध्यक्षांना करावा लागला हस्तक्षेप
वाद इतका चिघळला की, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वन्स यांना मध्यस्थी करावी लागली. ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “माझे उद्दिष्ट शांतता प्रस्थापित करणे आहे. आमच्यामुळेच युक्रेन आज सुरक्षित आहे.”
मात्र, झेलेन्स्की यांनी युक्रेनमध्ये रशियन सैन्याने केलेल्या अत्याचारांचे फोटो ट्रम्प यांना दाखवले आणि अमेरिकेने या युद्धात सक्रिय भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. “युद्धाच्या काळातही काही नियम असतात. अमेरिका केवळ सैनिकी मदत न देता, युक्रेनमधील युद्धातील हिंसा थांबवण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे झेलेन्स्की यांनी जोरदारपणे मांडले.
One of the wildest exchanges of foreign dignitaries in the Oval Office.
US President Trump and Vice President Vance get in a heated argument with Ukrainian President Zelensky.
“Your country is in big trouble. You’re not winning this” pic.twitter.com/isIYGQWuN1
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) February 28, 2025
credit : social media
खनिज करारावरूनही मतभेद
बैठकीत युक्रेनमधील खनिज संसाधनांच्या बदल्यात अमेरिकेने युक्रेनला सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी झेलेन्स्की यांनी केली. मात्र, ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळला आणि थेट उत्तर दिले की, “आम्ही आमच्या सोयीनुसार खनिज साठा वापरणार आहोत.”
अमेरिका-युक्रेन संबंधांवर काय परिणाम?
झेलेन्स्की यांनी यापूर्वी ट्रम्प यांच्याविषयी सकारात्मक भूमिका मांडली होती आणि सांगितले होते की, “डोनाल्ड ट्रम्प आमच्या बाजूने आहेत.” मात्र, या बैठकीतील वादानंतर अमेरिका-युक्रेन संबंधांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या कडव्या भूमिकेमुळे युक्रेनला अमेरिकेकडून होणाऱ्या मदतीत कपात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : षडयंत्रांविरुद्ध विजयाची गर्जना! कॅनडाच्या विधानसभेत भारतीयांनी रोवला झेंडा
अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्र आणि आर्थिक मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. मात्र, ट्रम्प यांच्या विधानांवरून असे दिसते की, त्यांच्या प्रशासनाची भूमिका आधीच्या धोरणांपेक्षा वेगळी असणार आहे. झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या बाजूने भक्कम भूमिका घेतली असली, तरी ट्रम्प यांचा “आजपासून तुमचे वाईट दिवस सुरू” हा इशारा युक्रेनसाठी मोठी चिंता निर्माण करणारा आहे. या घटनेनंतर जागतिक स्तरावर अमेरिका-युक्रेन संबंधांबाबत चर्चेला उधाण आले आहे.