Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Xi Putin : शेन्झेनमध्ये रंगणार महासत्तांचा महासंग्राम! ट्रम्प, पुतिन आणि शी जिनपिंग यांच्या भेटीने जगाची धाकधूक वाढली

Trump Xi Putin : १९ नोव्हेंबर रोजी चीनमध्ये ट्रम्प, शी जिनपिंग आणि पुतिन यांची त्रिपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत अणुशस्त्रांवर मर्यादा घालणे, इराण युद्ध आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 16, 2026 | 01:13 PM
Trump Xi Putin Trilateral Meeting 2026 APEC Summit Shenzhen November 19

Trump Xi Putin Trilateral Meeting 2026 APEC Summit Shenzhen November 19

Follow Us
Follow Us:
  • ऐतिहासिक त्रिपक्षीय भेट
  • अणुशस्त्र नियंत्रण आणि इराण युद्धावर चर्चा
  • चीनचा सावध पवित्रा आणि युक्रेनचा मुद्दा

आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर येत्या गुरुवारी एक असा ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे, जो कदाचित जगाची दिशा बदलून टाकेल. जगातील तीन सर्वात शक्तिशाली आणि अण्वस्त्रसज्ज देश अमेरिका, चीन आणि रशिया यांचे सर्वोच्च नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Trump Xi Putin) यांच्यात गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी दक्षिण चीनमधील तंत्रज्ञान नगरी ‘शेन्झेन’ (Shenzhen) येथे ऐतिहासिक त्रिपक्षीय बैठक होणार आहे. सोमवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करून या महाबैठकीवर शिक्कामोर्तब केले आहे.

दक्षिण चीनमधील शेन्झेन येथे १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC) शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या शिखर परिषदेच्या निमित्ताने जगातील २१ देशांचे नेते एकत्र येत आहेत, मात्र सर्वांच्या नजरा या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या ट्रम्प, जिनपिंग आणि पुतिन यांच्या विशेष बैठकीवर खिळल्या आहेत. अमेरिका आणि रशियाने यापूर्वीच या बैठकीला दुजोरा दिला होता, आणि आता चीननेही अधिकृत घोषणा केल्याने या महासत्तेच्या भेटीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. जरी या बैठकीचा संपूर्ण अधिकृत कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेला नसला, तरी या तीन नेत्यांच्या चर्चेतून जागतिक शांतता, व्यापार आणि सुरक्षिततेबाबत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

अणुशस्त्रांच्या स्पर्धेला लगाम घालण्यासाठी ट्रम्प यांचा मोठा डाव

व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऐतिहासिक बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुख्य भर जगातील अणुशस्त्रांची संख्या कमी करण्यावर असणार आहे. विशेषतः अणुशस्त्रांवर मर्यादा घालणाऱ्या नव्या करारात चीननेही सामील व्हावे, अशी अमेरिकेची आग्रही मागणी आहे. सध्याच्या घडीला जागतिक अण्वस्त्र साठ्याचा विचार केला तर अमेरिका आणि रशिया हे चीनपेक्षा खूप पुढे आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अंदाजानुसार, चीनकडे सध्या ६०० हून अधिक अण्वस्त्रे आहेत, तर अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांकडे प्रत्येकी ५,००० पेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत.

या चर्चेचे महत्त्व यावर्षी आणखी वाढले आहे कारण अमेरिका आणि रशिया यांच्यातील अणुशस्त्रांवर मर्यादा घालणारा शेवटचा द्विपक्षीय करार (‘न्यू स्टार्ट’ संधी) फेब्रुवारी २०२६ मध्ये संपुष्टात आला आहे. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच या दोन महासत्तांमधील अणुशस्त्रांवर कोणतेही कायदेशीर निर्बंध राहिलेले नाहीत. त्यामुळेच ट्रम्प यांना आता रशियासोबतच चीनलाही एका नव्या अणुकरारात बांधून ठेवायचे आहे. मात्र, चीनने या प्रस्तावावर सावध आणि काहीसा नकारात्मक पवित्रा घेतला आहे. चीनचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे अमेरिका आणि रशियाच्या तुलनेत खूपच कमी अणुशस्त्रे आहेत, त्यामुळे जोपर्यंत या दोन देशांनी स्वतःचा अण्वस्त्र साठा कमी करत नाहीत, तोपर्यंत चीन अशा कोणत्याही चर्चेत सहभागी होण्यास इच्छुक नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : AI Weapons : ‘कोण जगेल आणि कोण मरेल, हे यंत्रांनी ठरवू नये…’ एआय युद्धाच्या नियमांवर 128 देशांची मोठी खलबते

इराण युद्धावर तोडगा निघणार, पण युक्रेनचा मुद्दा बाजूला राहणार?

अणुशस्त्रांसोबतच डोनाल्ड ट्रम्प या बैठकीत मध्य पूर्वेत सुरू असलेल्या इराण युद्धाचा मुद्दाही प्रामुख्याने उपस्थित करणार आहेत. शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत चर्चा करून इराणमधील संघर्ष कसा थांबवता येईल, यावर ट्रम्प यांना मार्ग काढायचा आहे. रशिया आणि चीन या दोन्ही देशांचे इराणशी घनिष्ठ संबंध असल्याने, या दोन नेत्यांचा हस्तक्षेप इराण युद्ध थांबवण्यासाठी निर्णायक ठरू शकतो, असा अमेरिकेचा अंदाज आहे.

दुसरीकडे, संपूर्ण जगाला चिंतेत टाकणाऱ्या रशिया-युक्रेन युद्धावर या त्रिपक्षीय बैठकीत थेट चर्चा होण्याची शक्यता खूप कमी आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, युक्रेन युद्धाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील असून त्यावर स्वतंत्रपणे चर्चा केली जाईल. चीननेही यापूर्वी स्पष्ट केले आहे की, युक्रेन हा युरोपीय संघर्ष असल्याने त्यावरील कोणत्याही शांतता चर्चेत युरोपीय देशांचाही सहभाग असणे आवश्यक आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Election : वॉरंटशिवाय छापे, तिघांना अटक आणि नंतर निर्दोष सुटका; इस्रायलच्या निवडणुकीतील ‘त्या’ कारवाईचे गुपित उघड

बदलती जागतिक समीकरणे आणि या बैठकीचे महत्त्व

ही त्रिपक्षीय बैठक केवळ औपचारिकता नसून बदलत्या जागतिक राजकारणाचे मोठे प्रतीक मानली जात आहे. सध्याच्या घडीला रशिया आणि चीन यांच्यात अत्यंत घनिष्ठ मैत्री आणि धोरणात्मक भागीदारी आहे. तर दुसरीकडे व्यापार युद्ध, तांत्रिक स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवरून अमेरिका या दोन्ही देशांशी संघर्ष करत आहे. अशा परिस्थितीत हे तीन बलाढ्य नेते एकाच टेबलावर समोरासमोर बसणे, हीच मोठी घडामोड आहे.

दरम्यान, या बैठकीच्या निमित्ताने आणखी एक रंजक माहिती समोर आली आहे की, प्रसिद्ध उद्योजक एलन मस्क हे देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चीन दौऱ्यावर जाणार आहेत, मात्र ते या त्रिपक्षीय बैठकीत सहभागी होणार नाहीत. तसेच या आशिया दौऱ्यात ट्रम्प उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट घेणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. एकंदरीत, १९ नोव्हेंबर रोजी शेन्झेन येथे होणारी ही बैठक जागतिक शांतता आणि भविष्यातील सत्तासंतुलनाची नवी दिशा ठरवणारी ठरेल, यात शंका नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प, शी जिनपिंग आणि पुतिन यांची पहिली त्रिपक्षीय बैठक कधी आणि कुठे होणार आहे?

    Ans: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची पहिली ऐतिहासिक त्रिपक्षीय बैठक गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी दक्षिण चीनमधील शेन्झेन शहरात APEC शिखर परिषदेच्या निमित्ताने होणार आहे.

  • Que: या त्रिपक्षीय बैठकीत कोणत्या मुख्य मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे?

    Ans: या बैठकीत प्रामुख्याने जगातील अणुशस्त्रांची संख्या कमी करणे, चीनला अणुकरारात सामील करून घेणे, इराण युद्ध संपवणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व जागतिक सुरक्षेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • Que: चीन अणुशस्त्र करारात सहभागी होण्यास का नकार देत आहे?

    Ans: अमेरिका आणि रशियाकडे प्रत्येकी ५,००० हून अधिक अणुशस्त्रे आहेत, तर चीनकडे केवळ ६०० हून अधिक अणुशस्त्रे आहेत; त्यामुळे या दोन देशांनी आधी स्वतःचा साठा कमी करावा, असे म्हणत चीन चर्चेस नकार देत आहे.

Web Title: Trump xi jinping putin first trilateral meeting china shenzhen apec summit hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Vladimir Putin
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

Nvidia : ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकले टेक जगताचे बादशहा; गुप्तचर यंत्रणांचा इशारा धुडकावून ट्रम्प यांनी जेन्सन हुआंगला का वाचवले?
1

Nvidia : ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकले टेक जगताचे बादशहा; गुप्तचर यंत्रणांचा इशारा धुडकावून ट्रम्प यांनी जेन्सन हुआंगला का वाचवले?

Donald Trump: अमेरिकेचे इराणसोबतचे चर्चेचे दरवाजे बंद; ट्रम्प यांचा मोठा निर्णय, जेडी व्हान्स यांना दिली ‘ही’ नवीन जबाबदारी
2

Donald Trump: अमेरिकेचे इराणसोबतचे चर्चेचे दरवाजे बंद; ट्रम्प यांचा मोठा निर्णय, जेडी व्हान्स यांना दिली ‘ही’ नवीन जबाबदारी

Russia Ukraine War: पुतिन यांनी ट्रम्प यांच्या दूतांसोबत केली चार तास चर्चा, जाणून घ्या मग युक्रेनवर शांतता कराराला का दिला नकार?
3

Russia Ukraine War: पुतिन यांनी ट्रम्प यांच्या दूतांसोबत केली चार तास चर्चा, जाणून घ्या मग युक्रेनवर शांतता कराराला का दिला नकार?

QUAD Summit 2026: मनिलामध्ये मोदी-ट्रम्प जोडी चीनला दाखवणार आरसा; एकाच दौऱ्यात साध्य करणार दोन प्रमुख उद्दिष्टे
4

QUAD Summit 2026: मनिलामध्ये मोदी-ट्रम्प जोडी चीनला दाखवणार आरसा; एकाच दौऱ्यात साध्य करणार दोन प्रमुख उद्दिष्टे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.