Trump's eye on Ukraine’s minerals amid geopolitical drama
वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनसमोर नवीन अटी ठेवल्या असून त्यांनी अध्यक्ष झेलेन्स्की यांना दुर्मीळ खनिजे देण्याची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, जर युक्रेनने ही खनिजे दिली नहीत तर त्यांना स्टारलिंक सेवा उपलब्ध करुन दिली जाणार नाही. पूर्वी झेलेन्स्की यांनी अमेरिकेला 500 अब्ज डॉलर्सच्या खनिजांचा स्वस्तात पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नंतर युक्रेनने या वचनाचे पालन केले नाही.
युक्रेनचा खनिज साठा रशियाच्या ताब्यात
यामुळे ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिका हा खनिजसाठा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज साठा आहे, पण त्यातील 60% भाग डोनबास, लुहांस्क आणि डोनेस्क या भागांमध्ये आहे. सध्या या भागांमध्ये रशियाचा ताबा आहे, तर उर्वरित 40% मध्य आणि पश्चिम युक्रेनमध्ये आहे. अमेरिका या भागांवर कब्जा केल्यास, त्याला रशियन सैन्याला तेथून हटवावे लागेल यामुळे अमेरिका आणि रशियात संघर्ष निर्माण होऊ शकतो.
अमेरिका फुकट मदत करत नाही
अमेरिका कधीही कोणालाही विनामूल्य मदत करत नाही. गेल्या तीन वर्षांत अमेरिका यूक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवत होती, ती विनामूल्य नव्हती. अमेरिकेची खरी नजर यूक्रेनच्या खनिज संपत्तीवर होती. यापूर्वी ब्लॅकरॉक कंपनीला यूक्रेनमधील सुपीक जमीन दिली गेली, मात्र आता अमेरिकेची प्राथमिकता दुर्मीळ खनिजे मिळविणे आहे.
अमेरिका युक्रेनवर दबाव
युक्रेनमध्ये कोळसा आणि लोखंडाशिवाय प्रचंड प्रमाणा रेअर मिनरल्स आहेत. ही खनिजे नवीन तंत्रज्ञान, विशेषत: सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. सप्टेंबरमध्ये झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना ही खनिजे देण्याचे वचन दिले होते, पण आता ते मागे हटले आहेत. त्यामुळे अमेरिका त्यांच्यावर दबाव टाकत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना थेट धमकी दिली आहे की, युक्रेनने खनिजे देण्यास नकार दिला तर, स्टारलिंक सेवा, शस्त्रास्त्रे आणि आर्थिक मदत बंद होईल.
झेलेन्स्की संकटात
सध्याच्या परिस्थितीत झेलेन्स्की अडचणीत सापडले आहेत. त्यांनी अमेरिकेच्या मागण्या मान्य केल्या, तर रशियासोबतचा संघर्ष अधिक वाढेल. पण जर त्यांनी नकार दिला, तर अमेरिका त्यांना स्टारलिंक सेवा, शस्त्रास्त्रे आणि आर्थिक मदत बंद करू शकते. त्यामुळे यूक्रेनसाठी ही “आगे कुआं, पीछे खाई” अशी स्थिती झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- एका चुकीने उजळले नशीब; एका रात्रीत महिला झाली मालामाल