
China Microwave Weapon System
भारतासाठी इशारा? राफेलविरोधात चीनने मैदानात उतरवले J-16 ; जाणून घ्या किती घातक?
गेल्या काही काळात चीनने आपल्या लष्करी ताकदीत मोठी वाढ केली आहे. अनेक धोकादायक शस्त्रे विकसित करत आहे. याच वेळी चीनने आणखी एक नवे शस्त्रे मैदानात उतरवले आहे. द स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने हरिकेन-३००० नावाचे मायक्रोवेव्ह वेपन मैदानात उतरवले आहे. हे शस्त्र ८० हजार व्होल्टपर्यंत इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्लस निर्माण करु शकते. चीनने हे शस्त्र २०२४ मध्ये लष्करी परेडमध्ये ट्रक-माउंटेड हरिकेन-३००० प्रदर्शित केले होते. नोरिंकोचे तज्ज्ञ यू जियानझेनने हे डिझाइन केले असून यामध्ये हलक्या आणि लहान मानवरहित हवाई आणि ड्रोन्सला पाडम्याची क्षमता आहे. जागतिक बाजारपेठेत ही सर्वात घातक प्रणाली मानली जात आहे.
तज्ज्ञांनी दावा केला आहे की, चीनची ही हरिकेन-३००० प्रणाली एकट्याने लेझर शस्त्रे आणि तोफखान्यांच्या ताकदीएवढ्याने हल्ला करु शकते. यामध्ये एकाच वेळी हजारो ड्रोन्सला धोबीपछाड करण्याची क्षमता आहे. जे अमेरिकेच्या तंत्रज्ञानाला फेल करु शकते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.