रुबी ढल्ला यांच्या अडचणी वाढल्या; थेट कॅनडाच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर, का ठरल्या अपात्र? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ओटावा: भारतीय वंशाच्या कॅनेडियन नेत्या रूबी ढल्ला यांना कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्या आहेत. त्यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याची माहिती देत हा निर्णय धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी 6 जानेवारी 2025 रोजी आपल्या पदाचा आणि पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता.
सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
रूबी ढल्ला यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “कॅनडाच्या लिबरल पक्षाने मला नुकतेच कळवले की मी नेतृत्वाच्या शर्यतीतून अपात्र ठरवली गेली आहे. हा निर्णय अत्यंत धक्कादायक आहे. तसेच अधिक निराशाजनक बाब म्हणजे हा निर्णय प्रसारमाध्यमांत लीक करण्यात आला आहे. पक्षाने माझ्यावर जे आरोप लावले आहेत, ते पूर्णतः खोटे आणि बनावट आहेत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- एका चुकीने उजळले नशीब; एका रात्रीत महिला झाली मालामाल
I have just been informed by the Liberal Party of Canada that I have been disqualified from the leadership race. This decision is both shocking and deeply disappointing, especially since it was leaked to the media.
The allegations that the party have used against me are false, &… pic.twitter.com/VprPUEmLXL
— Ruby Dhalla (@DhallaRuby) February 21, 2025
त्या पुढे म्हणाल्या, ” माझ्या अपात्रतेसाठी सांगितलेल्या गेलेल्या गोष्टींवरुन स्पष्ट होते की, माझा प्रचार यशस्वी होत होता आणि माझ्या विजयाची शक्यता वाढली होती. यामुळे पक्षाला धोका वाटू लागला. कधी विदेशी हस्तक्षेपचा आरोप करण्यात आला, तर कधी निवडणूक प्रक्रियेतील कथित उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. खरंतर, या सर्व गोष्टी माझ्या उमेदवारीला रोखण्यासाठी आणि मला मार्क कार्नीसमोर उभे राहू न देण्यासाठी करण्यात आल्या.”
मार्क कार्नी यांच्या निवडीचा मार्ग मोकळा करण्याचा डाव?
रूबी ढल्ला यांच्या म्हणण्यानुसार, “लिबरल पक्ष हे विशिष्ट प्रतिष्ठानाला सत्तेत ठेवण्यास इच्छुक आहेत हे समोर आले आहे. त्यांना हे मान्य नव्हते की मी एकमेव व्यक्ती होते, जी मार्क कार्नी यांच्या ‘निर्विवाद’ निवडीच्या मार्गात अडथळा ठरू शकते. पक्षीय अंतर्गत राजकारणामुळे माझ्या संधी हिरावल्या गेल्या आहेत.”
त्या पुढे म्हणाल्या, “मला अपात्र ठरवूनही मी शांत बसणार नाही. मी कनाडाच्या लोकांसाठी संघर्ष करत राहीन.” रूबी ढल्ला यांचा हा आरोप मोठ्या राजकीय नाट्यासारखा आहे. लिबरल पक्षाने हा निर्णय का घेतला यावर अधिकृतपणे स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.