TTP's open threat to Pakistan's Asim Munir
TTP and Pakistan Conflict : इस्लामाबाद : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तीव्र संघर्ष सुरु होता. या संघर्षात अनेक दहशतवादी ठार केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. यामध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या (TTP) या दहशतवादी गटाचा प्रमुख नूर वली महसूदला ठार केल्याचाही दावा करण्यात आला होता. परंतु TTP ने हा दावा फेटाळत महसूद जिवंत असल्याचा व्हिडिओ जारी केला.
‘इस्रायल अमेरिकेचा गुलाम…’ , नेतन्याहूंच्या वक्तव्याने उडाली खळबळ; जाणून घ्या काय म्हणाले?
या दाव्यानंतर TTP च्या प्रमुखाने पाकिस्तानविरोधात उघडपणे संघर्षाची घोषणा केली आहे. यामुळे पाकिस्तान आणि TTP मधील तणाव पुन्हा वाढला आहे. यामुळे मोठ्या संघर्षाची भीती निर्माण झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने TTP चा कमांडर काजिम याच्यावर १० कोटी रुपयांचे बक्षिण ठेवले होते. काजिवर पाकिस्तानच्या सैन्यातील एका लेफ्टनंट कर्नल आणि मेजरच्या हत्येचा आरोप करण्यात आला होता. तसेच कुर्रम जिल्ह्याच्या उपायुक्त जावेदुल्लाह महसूद यांच्या हत्येतही सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर काजिमने पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांना खुले आव्हान दिले आहे.
काजिमने एक व्हिडिओ संदेश जारी करत, “हिंमत असेल तर आमचा सामना करा, मैदानात या असे म्हटले आहे. त्याने पुढे म्हटले की, इन्शाअल्लाह हे युद्धच सुरुच राहिल. जर तुम्ही तुमच्या आईचे दूध प्यायले असाल तर पुढे या, असे मेंढ्या-बकऱ्यांसारखे सैनिकांना पाठवू नका. युद्ध कसे लढायचे हे आम्ही तुम्हाला शिकवू”. काजमिच्या या व्यक्तव्यने मोठी खळबळ उडाली आहे. सध्या यावर असीम मुनीर (Asim Munir) काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
TTP म्हणजे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानची स्थापना डिसेंबर २००७ मध्ये झाली होती. अनेक तालिबानी गटांनी एकत्र येऊन ही संघटना तयार केली होती. बैतुल्लाह महसूद या संघटनेचा संस्थापक होता. हा दक्षिण वजीपिस्तानच्या महसूद जमातीचा होता. परंतु २००९ मध्ये अमेरिकन ड्रोन हल्ल्यात बैतुल्लाह महसूदचा मृत्यू झाला. यानंतर हकीमुल्लाह महसूद, मग फजलुल्लाह, यांनी TTP ची कमांड संभाळली. सध्या नूर वली महसूद हा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे.
या संघटनेने पाकिस्तानमध्ये शरीया कायदा लागू करण्याचा उद्देश ठेवला आहे. तसेच पाक सैन्य आणि सरकारला अमेरिकेच्या धोरणांपासून दूर ठेवणे आणि अफगाण तालिबानशी वैचारिक साधत इस्लामिकतेचा प्रचार करणे उद्देश आहे. गेल्या काही काळात TTP पाकिस्तानसाटी मोठा धोका बनला आहे.
प्रश्न १. तालिबान-ए-तरहीक (TTP) ने असीम मुनीरला काय धमकी दिली?
TTP ने पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीरला युद्धाचे खुले आव्हान दिले आहे.
प्रश्न २. TTP गटाचा उद्देश का आहे?
पाकिस्तानमध्ये शरीया कायदा लागू करणे, पाक सैन्य आणि सरकारला अमेरिकेच्या धोरणांपासून दूर ठेवणे आणि तालिबानशी वैचारिक साधत इस्लामिकतेचा प्रचार करणे असा या दहशतवादी गट TTP चा उद्देश आहे.
प्रश्न ३. पाकिस्तानने कोणत्या दहशतवाद्याला ठार केल्याचा दावा केला होता?
पाकिस्तानने TTP या दहशतवादी गटाचा प्रमुख नूर वली महसूदला ठार केल्याचा दावा केला होता.
व्हेनेझुएलात भीषण दुर्घटनात! टेक ऑफनंतर काही क्षणातच विमान कोसळले आणि घडला स्फोट, VIDEO