Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणच्या केरमान शहरात दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट; 103 जणांचा मृत्यू तर 200 पेक्षा अधिक जण जखमी

इराणच्या दक्षिणेकडील केरमान शहरात दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. यामध्ये 103 नागरिकांचा मृत्यू झाला असून, 200 जण जखमी झाले आहेत. इराणचा दिवंगत टॉप जनरल कमांडर कासिम सुलेमानीच्या कबरीजवळ हे बॉम्बस्फोट झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 04, 2024 | 01:05 PM
इराणच्या केरमान शहरात दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट; 103 जणांचा मृत्यू तर 200 पेक्षा अधिक जण जखमी
Follow Us
Follow Us:

तेहरिन : इराणच्या दक्षिणेकडील केरमान शहरात दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. यामध्ये 103 नागरिकांचा मृत्यू झाला असून, 200 जण जखमी झाले आहेत. इराणचा दिवंगत टॉप जनरल कमांडर कासिम सुलेमानीच्या कबरीजवळ हे बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांची अद्याप कोणीही जबाबदारी घेतली नाही. मात्र, अज्ञात दहशतवाद्यांना या बॉम्बस्फोटासाठी इराणने जबाबदार धरले आहे.

इराणमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. ज्यामध्ये लोक रस्त्यावर इकडे-तिकडे धावताना दिसतात. इराणच्या ‘नॅशनल इमर्जन्सी सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन’चे प्रवक्ते बाबक येक्ता परस्त यांनी सांगितले की, जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे, असे वृत्त अल जझीराने दिले आहे. स्फोटात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. आवश्यक असल्यास, आपत्कालीन सेवा रुग्णांना हेलिकॉप्टरद्वारे करमान ते तेहरानपर्यंत नेण्यासाठी सज्ज आहेत, असे ते म्हणाले.

2020 साली अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात कासिम सुलेमानी ठार झाला होता. सुलेमानीच स्मरण करण्यासाठी त्याच्या कबरीजवळ मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्यावेळी हे बॉम्बस्फोट झाले. पहिला बॉम्बस्फोट झाल्यानंतर दुसरा स्फोट 20 मिनिटांनी झाला. इस्लामिक स्टेटचे दहशतवादी घडवून आणतात त्या पद्धतीचा हा बॉम्बस्फोट वाटतो, असं बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

Web Title: Two powerful explosions in the city of kerman iran 103 people died nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2024 | 01:05 PM

Topics:  

  • Iran News

संबंधित बातम्या

Hormuz Crisis : ओमानला ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतच्या करारावर अडथळा आणल्यास बॉम्बिंग करू
1

Hormuz Crisis : ओमानला ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतच्या करारावर अडथळा आणल्यास बॉम्बिंग करू

Iran News : IRGCचा दावा; ट्रम्प कार्यकाळ संपेपर्यंत इराणची संघर्ष लांबवण्याची तयारी
2

Iran News : IRGCचा दावा; ट्रम्प कार्यकाळ संपेपर्यंत इराणची संघर्ष लांबवण्याची तयारी

Middle East News :इराण युद्धाचा विमान वाहतुकीला मोठा फटका; मध्यपूर्वेतील एअरलाइन्सना ४.३ अब्ज डॉलर तोट्याचा अंदाज
3

Middle East News :इराण युद्धाचा विमान वाहतुकीला मोठा फटका; मध्यपूर्वेतील एअरलाइन्सना ४.३ अब्ज डॉलर तोट्याचा अंदाज

Strait of Hormuz News : होर्मूझवर इराणची पकड आणखी मजबूत! ओमानसोबत नवा शिपिंग रूट ठरला; अमेरिकेची चिंता वाढली
4

Strait of Hormuz News : होर्मूझवर इराणची पकड आणखी मजबूत! ओमानसोबत नवा शिपिंग रूट ठरला; अमेरिकेची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.