Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uganda Accident : युगांडा हादरला! साखळी अपघतातमुळे रस्त्यावर हाहा:कार ; ५० हून अधिक लोकांचा मृत्यू

Uganda Road Accident : युगांडाची राजधानी कंपाला येथे एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. या अपघातामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. एका बस चालकाचा ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात लॉरीला धडक बसली आणि हा अपघात घडला.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 22, 2025 | 08:23 PM
Uganda road crash leaves more than 50 dead

Uganda road crash leaves more than 50 dead

Follow Us
Close
Follow Us:
  • युगांडामध्ये भयावह रस्ता अपघात
  • कंपाला-गुलू महामार्गावर बससचा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न
  • बससह अनेक वाहनांची जोरदाधडक
  • अपघातात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी
Uganda Accident News in Marathi : कंपाला : एक भीषण दुर्घटना अपघाताचे वृत्त समोर आले आहे. आफ्रिकन देश युगांडामध्ये एक अतिशय  भयावह रस्ता अपघात (Road Accident) घडला आहे. बस चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात मोठ्या प्रमाणात जीवीत व वित्तहानी झाली आहे. या अपघाताने संपूर्ण युगांडा हादरला आहे.

भारत-अमेरिकेने व्हावे सावध? चीनच्या नव्या अत्याधुनिक ड्रोन बॉम्बर GJ-X चे उड्डाण यशस्वी, जगभरात खळबळ

अपघातात अनेक लोकांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. युगांडाची राजधानी कंपाला आणि उत्तरेकडील गुलू शहराला जोडणाऱ्या कंपाला-गुलू महामार्गावर भीषण रस्ता अपघात झाला. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात बसची अनेक वाहनांना धडक बसली असून यामध्ये किमान ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णलयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कसा घडला अपघात?

सध्या या अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. कंपालाच्या पोलिसांच्या मते, या अपघातात दोन बससह आणखी चार वाहनांचा अपघात घडला आहे. प्राथमिक तपासानुसार बस चालकाने कंपाला-गुलू महामार्गावर एका लॉरील ट्रकला ओव्हरेट करण्याच प्रयत्न केला. मात्र बस दुसऱ्या बाजूने येणाऱ्या लॉरीला जोराद धडकली. यावेळी मागून येणारी वाहेन देखील एकामागूनएक एकमेकांवर आदळली. यामुळे महामार्गावर गोंधळ उडाल होता.

अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक बचाव आणि मतद पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना सुरक्षित बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच अनेक लोकांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. सध्या त्यांची ओळख पटवण्याचे कार्य सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना युगांडाच्या किरियानडोंगे शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातामुळे कंपाला-गुलू महामार्गावरील वाहतूक ठप्प

हा अपघात इतका भयंकर होता की, बससह सर्व वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि सर्वत्र रस्त्यावर पसरल्या होत्या. या अपघातामुळे कंपाला-गुलू महामार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. या दुर्दैवी अपघातामुळे युगांडामध्ये अेक भागांमध्ये शोककळा पसरली आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. युगांडामध्ये कुठे आणि कधी झाला रस्ता अपघात?

युगांडामध्ये बुधवारी (२२ सप्टेंबर) सकाळी राजधानी कंपाला येथे कंपाला-गुलू महामार्गावर भीषण रस्ता अपघात घडला आहे.

प्रश्न २. युगांडामधील रस्ते अपघातात किती जीवित व वित्तहानी झाली?

युगांडामध्ये झालेल्या भयावह रस्ते अपघातात ६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय दोन बससह चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रश्न ३. युगांडामधील रस्ते अपघाताचे काय कारण आहे?

युगांडाच्या पोलिसांच्या प्राथमिक तापासानुसार बस चालकाने एका लॉरीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता, यावेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या लॉरीमुळे जोरदार धडक झाली. यानंतर मागील वाहने देखील एकमेकांवर जोरदार आदळली ज्यामुळे हा अपघात घडला.

Russia Ukraine War : ‘व्यर्थ चर्चा…’ ; ट्रम्प यांनी पुतिनसोबतची बुडापेस्ट बैठक केली रद्द? काय आहे कारण?

Web Title: Uganda road crash leaves more than 50 dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 08:22 PM

Topics:  

  • Road Accident

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.