भारत-अमेरिकेने व्हावे सावध? चीनच्या नव्या अत्याधुनिक ड्रोन बॉम्बर GJ-X चे उड्डाण यशस्वी, जगभरात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या नव्या अत्याधुनिक ड्रोन बॉम्बरचे नाव GJ-X आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या ड्रोन बॉम्बरचा आकार आणि रचना अमेरिकेच्या प्रसिद्ध B-21 रायडर स्टेल्थ बॉम्बरप्रमाणे आहे. या ड्रोनचे पंख ४२ मीटर आहेत. या ड्रोनचे पहिले उड्डाण चीनच्या झिंजियांग प्रांतात मालन एअरबेसवर करण्यात आले होते. बिना पायलट चालणारे हे जगातील अत्यंत दुर्मिळ आणि अत्याधुनिक ड्रोन मानले जात आहे.
– GJ-X UCAV: 42m wingspan stealth drone, tested October 19, 2025, at Malan base, Xinjiang.– Flying-wing design, WS-10C/WS-15 engines, 7,000+ km range, 15-20 hr endurance. – 2-4 tons payload for strike/ISR, AI-driven swarm tactics for A2/AD. 1/2 pic.twitter.com/Yy58aUY61S — Defence News Of INDIA (@DefenceNewsOfIN) October 20, 2025
गेल्या काही काळात चीनन सतत आपल्या लष्करी ताकदीत वाढ करत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आशिया-प्रशांत प्रांतामध्ये धोरणात्मक भागीदारीमध्ये बदल होताना दिसत आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्राला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे भारत आणि अमेरिका दोन्ही देश चीनच्या या लष्करी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
प्रश्न १. चीनचे GJ-X ड्रोन नेमके काय आहे?
चीनचे GJ-X ड्रोन हे नव्या पिढीचे स्टेल्थ बॉम्बर ड्रोन आहे. हे एक मानवविरहित ड्रोन आहे.
प्रश्न २. चीनच्या या नव्या अत्याधुनिक ड्रोनची तुलना कशाशी करण्यात आली आहे?
चीनच्या या नव्या अत्याधुनिक ड्रोनची तुलना ही अमेरिकेच्या B-21 रायडर स्टेल्थ बॉम्बरशी करण्यात आली आहे.
कोण आहे सिराज वहाज? ज्यासोबत फोटो शेअर करताच जोहर ममदानींवर संतापले ट्रम्प ; एलॉन मस्कने म्हटले…






