युक्रेनला मोठा झटका; रशियाचा डनिप्रो शहरावर इंटरकॉन्टिनेंटल मिसाइलचा हल्ला
कीव: रशिया-युक्रेन युद्ध शिगेला पोहोचले आहे. जागतिक स्तरांवर तिसरे महायुद्ध सुरू होण्याची भिती निर्माण झाली आहे. अमेरिकेच अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची परवानगी दिल्यानंतर रशियावर झालेल्या हल्ल्यांमुळे पुतिन संप्त झाले. त्यांनंतर या हल्ल्यांचे प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने देखील आता युक्रेनलवर पलटवार केला आहे.
युक्रेनच्या डनिप्रो भांगावर इंटरकॉन्टिनेंटल मिसाइलचा हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनच्या डनिप्रो भांगावर इंटरकॉन्टिनेंटल मिसाइलचा हल्ला केला आहे. युक्रेनन स्पषट् केले आहे की, रशियाने काल रात्री युक्रेनच्या डनिप्रो शहराला लक्ष्य करून हे हल्ले केले आहे. युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे की, रशियाने अस्त्रखान भागातून गोळीबार देखील केला आहे. उत्तर कोरियाच्या सैन्याने युद्धभूमीवर रशियाला मदत करण्यासाठी पोहोचल्यामुळे युद्धाने अधिक तीव्र वळण घेतले आहे.
कीवमध्ये अमेरिकेचा दूतावास बंद
तज्ञांचे म्हणणे आहे की, रशिया आणि युक्रेन युद्धात अमेरिका आता मोठी भूमिका बजावत आहे. बायडेन प्रशासन युक्रेनला रशियाबरोबरच्या युद्धात कार्मिकविरोधी लँड माइन्स वापरण्याची परवानगी देखील देण्याची शक्यता आहे. यामुळे रशिया-युक्रेन युद्ध अजून उफाळू शकते. रशियाच्या संभाव्य हल्ल्यांची माहिती मिळताच अमेरिकाने सतर्कतेचे पाऊल उचलून कीवमधील दूतावास बंद केला आहे. तसेच दूतावासाच्या अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे. युक्रेनने अमेरिका निर्मित लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर आता ब्रिटीश क्रूझ क्षेपणास्त्रांचा हल्ला रशियावर केला आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
रशियाने युक्रेनची अनेक क्षेपणास्त्रे पाडली
यामुळे रशिया अधिकच संतप्त झाला. आणि या हल्ल्यांचे प्रतयुत्तर म्हणून रशियाने युक्रेनवर इंटरकॉन्टिनेंटल मिसाइल डागली. मात्र रशियन सैन्याने युक्रेनची अनेक क्षेपणास्त्रे पाडली असल्याचे म्हटले आहे. युक्रेनने ब्रिटनच्या ‘स्टॉर्म शॅडो’ क्रूझ मिसाईलने रशियावर हल्ला केला मात्र, ब्रिटिश बनावटीची ही क्षेपणास्त्रे रशियाने नष्ट केल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही रशियाने क्षेपणास्त्रे नष्ट केली होती. रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटीश-निर्मित ‘स्टॉर्म शॅडो’ क्षेपणास्त्रे याआधी देखी पाडण्यात आली होती.
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किंमतीत वाढ
रशिया-युक्रेन संघर्षामुळे वाढलेल्या तणावामुळे तेलाच्या किमतींमध्ये बुधवारी वाढ झाली, तरीही अमेरिकेतील तेल साठ्यांमध्ये मोठ्या वाढीमुळे ही वाढ मर्यादित राहिली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या वाढत्या तणावामुळे तेल पुरवठ्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तेल पुरवठा जास्त होण्याची चिंता वाढली आहे.