Ukraine signed a 100 billion dollars arms deal with America for Security
Trump Zelensky Meet : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेनस्की (Volodymir Zelensky) यांच्यात व्हाइट हाउसमध्ये बैठक पार पडली. यावेळी युरोपीय देश आणि नाटो प्रमुखही उपस्थित होते. रशिया युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध थांबवण्यावर चर्चा करणे हा या भेटीचा उद्देश होता. ही बैठक यशस्वी झाली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या बैठकीनंतर युरोपीय नेत्यानीही आनंद व्यक्त केला आहे.
तसेच या बैठकीनंतर ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांना देखील याची माहिती दिली आहे. यामुळे आता रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये लवकरच शांतता बैठक होईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…
झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्या बैठकीपूर्वी या करारावर युरोपीय देशासोबत चर्चा करण्यात आली होती. यामध्ये अमेरिकेकडून कोणती शस्त्रे आणि ड्रोन खरेदी केली जातील याची सर्व माहिती युरोपीय देशांना देण्यात आली. यानंतर बैठकीमध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आला. या बदल्यात युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या संरक्षणासाठी अमेरिका निर्मित पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणालीची मागणी आणि पायाभूत सुविधांच्या संरक्षणाची मागणी केली आहे.
या बैठकीनंतर पुतिन आणि झेलेन्स्की यांच्या परस्पर भेट होणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. सध्या यावर चर्चा सुरु असून यासाठी वेळ आणि जागा निश्चित केली जात आहे. येत्या १५ दिवसांत ही भेट होण्याची शक्यता असल्याचे जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी म्हटले आहे. तसचे या बैठीनंतर आणकी एक बैठक होणार असून यामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील उपस्थित राहणार आहेत.
चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर