Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak-Afg War: ‘हल्ले ताबडतोब थांबवा, नाहीतर…’ पाक-अफगाणिस्तान युद्धात UNची एन्ट्री; अँटोनियो गुटेरेस यांचा हादरवणारा इशारा

Afghanistan-Pakistan War: संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आणि दोन्ही देशांना शत्रुत्व संपवण्याचे आणि राजनैतिक मार्गाने मतभेद सोडवण्याचे..

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 28, 2026 | 12:18 PM
un chief antonio guterres warns pakistan afghanistan stop war immediately torkham crisis

un chief antonio guterres warns pakistan afghanistan stop war immediately torkham crisis

Follow Us
Close
Follow Us:
  • यूएनचा निर्वाणीचा इशारा
  • मानवतावादी संकट
  • निधीचा अभाव

Antonio Guterres statement on Pak-Afghan war 2026 : दक्षिण आशियातील दोन शेजारील देश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (Afghanistan-Pakistan Conflict) यांच्यातील सीमावाद आता एका विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध “खुले युद्ध” घोषित केल्यानंतर ड्युरंड रेषेवर रक्ताचा सडा पडत आहे. या पार्श्वभूमीवर, संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना तातडीने शस्त्रसंधी करण्याचे आवाहन केले असून, “हिंसाचार थांबवा, अन्यथा याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील,” असा स्पष्ट इशारा दिला आहे.

तोरखम सीमेवर मृत्यूचे तांडव आणि यूएनची चिंता

संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अफगाणिस्तानमधील तोरखम सीमा ओलांडणाऱ्या निर्वासितांच्या छावण्यांवर (Transit Centers) झालेले हल्ले हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहेत. या भागात गरिबी, दुष्काळ आणि भूकंपाने आधीच कंबरडे मोडले असताना, आता युद्धाने सामान्य जनतेचे जगणे कठीण केले आहे. सुमारे २२ दशलक्ष (२.२ कोटी) अफगाण नागरिक, ज्यात महिला आणि चिमुरड्या मुलांचा समावेश आहे, सध्या केवळ मानवी मदतीवर जिवंत आहेत. या युद्धामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणारी रसद खंडित झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak-Afghan War: तालिबानचा पाकिस्तानवर ‘ड्रोन’ स्ट्राइक! अबोटाबाद, नौशेरा लष्करी तळ धडाधडले; रणांगणाचे LIVE VIDEO VIRAL

निधीचा ठणठणाट: मदतीचे हात तोकडे पडणार?

संयुक्त राष्ट्रांनी एक धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. या वर्षाच्या मानवतावादी मदत योजनेसाठी साधारण १.७ अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे, परंतु दुर्दैवाने आतापर्यंत केवळ ११ टक्केच निधी जागतिक समुदायाकडून मिळाला आहे. जर हे युद्ध असेच सुरू राहिले, तर मृतांची संख्या हजारो पटीने वाढू शकते. अन्नाचा तुटवडा आणि वैद्यकीय सोयींचा अभाव यामुळे रणांगणापेक्षा उपासमारीने जास्त बळी जाण्याची भीती गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे.

The claim is from Taliban-affiliated Afghan Times. Taliban spokesman Zabihullah Mujahid stated today they “want to resolve this through dialogue” and have always pushed peaceful solutions. No independent confirmation of specific appeals to UN/Middle East nations for mediation,… — Grok (@grok) February 28, 2026

credit – social media and Twitter

राजनैतिक मध्यस्थीची गरज: इराण आणि युएईचे कौतुक

अँटोनियो गुटेरेस यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, तोफांच्या गोळ्यांनी प्रश्न सुटणार नाहीत. त्यांनी अलिकडच्या काळात इराण आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांनी दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. संयुक्त राष्ट्रांचे राजकीय मिशन (UNAMA) सध्या काबूलमध्ये सक्रिय असून तेथील स्थानिक नेत्यांच्या संपर्कात आहे. “शत्रुत्व संपवून चर्चेच्या मेजावर येणे हाच एकमेव पर्याय आहे,” असे यूएनचे ठाम मत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak-Afghan War: तालिबानचा पाकिस्तानवर ‘ड्रोन’ स्ट्राइक! अबोटाबाद, नौशेरा लष्करी तळ धडाधडले; रणांगणाचे LIVE VIDEO VIRAL

खुले युद्ध आणि नागरिकांची सुरक्षा

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी शेजाऱ्यांसोबत उघडपणे युद्धाची घोषणा केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. काबूल, पक्तिया आणि खोस्त प्रांतात झालेल्या हवाई हल्ल्यांनी मानवी हक्कांच्या चिंधड्या उडवल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांनी सर्व पक्षांना ‘आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे’ (International Humanitarian Law) पालन करण्याचे आवाहन केले आहे. निष्पाप नागरिकांना युद्धाचे साधन बनवू नका, असा कडक संदेश पाकिस्तान आणि तालिबान या दोन्ही राजवटींना देण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धावर काय भूमिका घेतली आहे?

    Ans: संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांना तातडीने हिंसाचार थांबवून राजनैतिक मार्गाने वाद सोडवण्याचे आवाहन केले आहे आणि नागरिकांच्या संरक्षणावर भर दिला आहे.

  • Que: अफगाणिस्तानमध्ये सध्या किती लोकांना मदतीची गरज आहे?

    Ans: सुमारे २२ दशलक्ष (२.२ कोटी) लोक सध्या मानवतावादी मदतीवर अवलंबून आहेत, जे युद्धामुळे धोक्यात आले आहेत.

  • Que: तोरखम सीमेवर काय घडले आहे?

    Ans: तोरखम सीमा ओलांडणाऱ्या निर्वासितांच्या रिसेप्शन सेंटर्सवर हल्ले झाले असून, त्यामुळे मानवतावादी मदत कार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

Web Title: Un chief antonio guterres warns pakistan afghanistan stop war immediately torkham crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Afghanistan-Pakistan Conflict

संबंधित बातम्या

Pak-Afghan War: तालिबानचा पाकिस्तानवर ‘ड्रोन’ स्ट्राइक! अबोटाबाद, नौशेरा लष्करी तळ धडाधडले; रणांगणाचे LIVE VIDEO VIRAL
1

Pak-Afghan War: तालिबानचा पाकिस्तानवर ‘ड्रोन’ स्ट्राइक! अबोटाबाद, नौशेरा लष्करी तळ धडाधडले; रणांगणाचे LIVE VIDEO VIRAL

Pak-Afghan War : पाक-अफगाण युद्धात ट्रम्प यांचा हस्तक्षेप; दोन्ही देशांच्या ‘खूनी खेळा’वर दिला मोठा इशारा
2

Pak-Afghan War : पाक-अफगाण युद्धात ट्रम्प यांचा हस्तक्षेप; दोन्ही देशांच्या ‘खूनी खेळा’वर दिला मोठा इशारा

Afganistan vs Pakistan War: लष्कर आणि शस्त्रांस्त्रांच्या बाबतीत कुणाची ताकद सर्वात जास्त?
3

Afganistan vs Pakistan War: लष्कर आणि शस्त्रांस्त्रांच्या बाबतीत कुणाची ताकद सर्वात जास्त?

PakAfgWar: युद्धाचा भडका! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर सर्वात मोठा हवाई हल्ला; इस्लामाबाद, अबोटाबाद हादरले, लष्करी तळांवर बॉम्बवर्षाव
4

PakAfgWar: युद्धाचा भडका! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर सर्वात मोठा हवाई हल्ला; इस्लामाबाद, अबोटाबाद हादरले, लष्करी तळांवर बॉम्बवर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.