Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वचन दिले गेले, आश्वासन पाळले गेले’; अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्यास सुरुवात

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांना काढण्याच्या निर्णयावर कारवाई सुरु झाली आहे. शपथ घेताच ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना हाकलून लावण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 25, 2025 | 12:13 PM
Deportation of illegal immigrants begins in the US

Deportation of illegal immigrants begins in the US

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांना काढण्याच्या निर्णयावर कारवाई सुरु करण्यात आली आहे. शपथ घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून हाकलून लावण्याच्या कार्यकारी आदेशावर लगेचच स्वाक्षरी केली होती. आता या लोकांना लष्करी विंमानांमधून सीमेपलीकडे नेण्यात येत आहे. यासंबंधित व्हाईट हाऊसने एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे. शेअर केलेल्या या छायाचित्रात बेकायदेशीर स्थलांतरितांना हातकड्या लावून लष्करी विमानाकडे नेले जात असल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहिनुसार, पहिल्या दिवशी 160 स्थलांतरितांना दोन लष्करी विमानांमधून ग्वाटेमालाला पाठवण्यात आले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतर रोखण्याचे आश्वासन दिले होते. शपथविधीनंतर लगेचच त्यांनी स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशांमध्ये या मोहिमेचा समावेश होता. त्यांच्या प्रशासनाने आता या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. व्हाईट हाऊसच्या निवेदनानुसार, ‘जो कोणी बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करेल, त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल,’ असा संदेश जगाला देण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Tahawwur Rana मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेची मान्यता

Just as he promised, President Trump is sending a strong message to the world: those who enter the United States illegally will face serious consequences. pic.twitter.com/yqgtF1RX6K — The White House (@WhiteHouse) January 24, 2025

अमेरिकन प्रशासनाचे कठोर धोरण स्पष्ट

गृह सुरक्षा विभागाच्या मते, ग्वाटेमाला आणि अमेरिका दोन्ही देश बेकायदेशीर स्थलांतर पूर्णतः थांबवण्यासाठी आणि सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहेत. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ग्वाटेमालाला पाठवलेल्या दोन उड्डाणांद्वारे त्याची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे बेकायदेशीर स्थलांतरितांवर कडक कारवाई सुरू झाली असून, अमेरिकन प्रशासनाचे कठोर धोरण स्पष्ट होत आहे. प्रशासनाने स्थलांतरितांना शोधून त्यांची ओळख पटवून त्यांना त्वरित हद्दपार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहे.

‘वचने दिली गेली, आश्वासने पाळली गेली

व्हाईट हाऊसने त्यांच्या पोस्टमध्ये ‘वचने दिली गेली, आश्वासने पाळली गेली’ असा संदेश दिला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या धोरणामुळे स्थलांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, या कठोर निर्णयाचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे दोन्ही मतप्रवाह निर्माण झाले आहेत. हा निर्णय भविष्यात अमेरिकेच्या स्थलांतर धोरणांवर मोठा प्रभाव पाडणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- 26 जानेवारीला प्रमुख पाहुण्यांच्या संदर्भात होती ‘ही’ समस्या; भारताच्या मुत्सद्देगिरीमुळे सुटले कोडे

Web Title: Us begins deportation of illegal immigrants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Illegal immigration
  • World news

संबंधित बातम्या

Iran Threat: ब्रिटनच्या अणु ठिकाणांवर  इराण करू शकतो हल्ला; गुप्तचर अहवालानंतर खळबळ; संरक्षणासाठी खर्च अर्धा अब्ज पाऊंड
1

Iran Threat: ब्रिटनच्या अणु ठिकाणांवर इराण करू शकतो हल्ला; गुप्तचर अहवालानंतर खळबळ; संरक्षणासाठी खर्च अर्धा अब्ज पाऊंड

Flying Cars: उडणाऱ्या गाड्यांचे स्वप्न लवकरच होणार साकार; चीन ते भारत एअर टॅक्सीची मोठी क्रांती, वाचा कधी सुरू होणार सेवा?
2

Flying Cars: उडणाऱ्या गाड्यांचे स्वप्न लवकरच होणार साकार; चीन ते भारत एअर टॅक्सीची मोठी क्रांती, वाचा कधी सुरू होणार सेवा?

Miss Universe 2026 महाअंतिम सोहळ्यापूर्वी मोठा धक्का! 15 देशांनी माघार घेतली; 6 आशियाई देशांवर घालण्यात आली बंदी
3

Miss Universe 2026 महाअंतिम सोहळ्यापूर्वी मोठा धक्का! 15 देशांनी माघार घेतली; 6 आशियाई देशांवर घालण्यात आली बंदी

Google Pixel Drop नोव्हेंबर 2026 अपडेट रिलीज; पिक्सेल 10 मध्ये ‘रॅम्बलर एआय’सह अनेक जबरदस्त फीचर्स दाखल
4

Google Pixel Drop नोव्हेंबर 2026 अपडेट रिलीज; पिक्सेल 10 मध्ये ‘रॅम्बलर एआय’सह अनेक जबरदस्त फीचर्स दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.