US China Tarade Talks Trump signals possible cut in China's tarrif
US China Relations : बीजिंग/वॉशिंग्टन : अमेरिका (America) आणि चीनमध्ये (China) व्यापार तणाव पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांत टॅरिफमुळे मोठा वाद सुरु आहे. ट्रम्प यांनी चीनवर १००% शुल्क लागू केले होते. परिणामी चीनने देखील अमेरिकेवर कर लादला आणि दोन्ही देशांच्या व्यापार तणाव निर्माण ढाला. परंतु आता चीनवरील कर हटण्याची शक्यता असल्याचे संकेत ट्रम्पकडून मिळाले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठे खळबळजनक विधान केले आहे. यामुळे चीन आणि अमेरिकेतील व्यापार संघर्ष कमी होण्याची शक्यात तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Trump Tariff: ‘भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यास…’ डोनाल्ड ट्रम्पची पुन्हा धमकी, काय होणार परिणाम
ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी चीनवरील शुल्काबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी चीनवरील शुल्क कायमस्वरुपी नसल्याचे म्हटले. ट्रम्प यांनी हे एक तात्पुरते पाऊल असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, दोन्ही देश व्यापारात वाटाघाटीच्या चर्चेवर सहमत आहे. यामुळे चर्चा झाल्यावर योग्य तो निर्णय घेऊन टॅरिफ (Tarrif) हटवण्यात येईल. ट्रम्प यांनी असेही म्हटले की, या चर्चेमध्ये कोणताही निष्कर्ष निघाला नाही, तर शुल्क कायमस्वरुपी ठेवले जाऊ शकते.
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनीही येत्या आठड्यात चीनसबोत व्यापार चर्चा होणार असल्याचे म्हटले आहे. दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य (APEC) परिषदेत ही बैठक होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी, चीन आणि अमेरिकेचे संबंध चांगल्या टप्प्यावर असल्याचे म्हटले आहे. परंतु निष्पक्ष करार होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे चीनने देखील अमेरिकेशी संवाद साधण्यावर सहमती दिली आहे. बीजिंग देखील अमेरिकेशी व्यापारातील मतभेद सोडवण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहे. यामुळे सध्या सर्वांचे लक्ष्य येत्या आठवड्यात होणाऱ्या अमेरिका आणि चीनमधील चर्चेकडे लागले आहे.
भारताला पुन्हा कर लादण्याची धमकी
याच वेळी ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदीवरुन भारताला पुन्हा एकदा कर लादण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली तर त्यांना मोठे कर भरावे लागतील असे ते म्हणाले.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. चीनवरील टॅरिफबाबत काय म्हणाले ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील टॅरिफ कमी होण्याचे संकेत दिले आहेत, परंतु यासाठी दोन्ही देशांच्या वाटाघाटी चर्चेत निष्पक्ष आणि दोन्ही देशांच्या हिताचा तोडगा निघण्याची आशाही व्यक्त केली आहे.
प्रश्न २. चीनने अमेरिकेच्या टॅरिफ चर्चेवर काय प्रतिक्रिया दिली?
चीनही अमेरिकेसोबत व्यापार तणाव कमी करण्यासाठी वाटाघाटी चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.