Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्पच्या शपथविधीकडे जगाचे लक्ष पण अमेरिकेचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर; नेमकं कारण काय?

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. यावेळी अमेरिकेचा राष्ट्रीय धव्ज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 04, 2025 | 01:39 PM
शपथविधीआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासंदर्भातील खटल्यात कोर्टाचा मोठा निर्णय; हश मनी प्रकरणात ट्रम्प...

शपथविधीआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासंदर्भातील खटल्यात कोर्टाचा मोठा निर्णय; हश मनी प्रकरणात ट्रम्प...

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. यावेळी अमेरिकेचा राष्ट्रीय धव्ज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे. याचे कारण म्हणजे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनानंतर सध्याचे अध्यक्ष जो बायडेन यांनी देशभर 30 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या नियमांनुसार, माजी किंवा विद्यमान अध्यक्षांच्या निधनानंतर 30 दिवसांसाठी राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो.

डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध

जिमी कार्टर यांचे 100 व्या वर्षी निधन झाल्यानंतर बायडेन यांनी राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकविण्याचा आदेश दिला आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्या या निर्णयावर आपत्ती व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले आहे की, ते अध्यक्षपदाची शपथ घेत असताना झुकेलेला ध्वज देशवासीयांसाठी योग्य संदेश देणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी याचा तीव्र विरोध केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेच्या संसदेत भारतीयांचा बोलबाला; इतिहासात पहिल्यांदाच ‘हे’ सहा नेते करणार प्रतिनिधित्व

ध्वज अर्ध्यावर का फडकवला जाणार?

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या फ्लॅग कोडनुसार, माजी अध्यक्षांच्या निधनानंतर 30 दिवसांसाठी ध्वज अर्ध्या फडकवण्यात येतो. याशिवाय उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, काँग्रेसचे सदस्य किंवा राष्ट्रीय शोकप्रसंगीदेखील ध्वज अर्धावर फडकवला जाऊ शकतो, मात्र हा कालावधी कमी असतो. राष्ट्रीय ध्वज हा देशाच्या शोकभावनेचे प्रतीक म्हणून अर्ध्यावर फडकवण्यात येतो.

किती काळापर्यंत ध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार

जिमी कार्टर यांच्या निधनानंतर 28 जानेवारीपर्यंत म्हणजेच 30 दिवसांपर्यंत ध्वज अर्ध्यावर फडकवलेला राहील. त्यामुळे 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाची शपथ घेत असताना आणि त्यानंतर पहिल्या आठवड्यात संपूर्ण देशभर ध्वज अर्धा फडकवलेला असेल. अमेरिकेच्या फ्लॅग कोडनुसार, अध्यक्ष, राज्यपाल किंवा वॉशिंग्टन डी.सी.चे महापौर राष्ट्रीयध्वज संबंधित आदेश देऊ शकतात. हा आदेश सामान्यत: राष्ट्रीय शोक, स्मृतिदिन किंवा आपत्तीच्या काळात देण्यात येतो.

ट्रम्प यांची भूमिका

डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र याचा विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही अमेरिकन नागरिकाला अर्धा फडकवलेला ध्वज पाहणे आवडणार नाही. त्यांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या अध्यक्षपदाच्या सुरुवातीस ध्वज अर्ध्यावर फडकवलेला असणे योग्य ठरणार नाही. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प 30 दिवसांचा आदेश कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात, कारण फ्लॅग कोड बंधनकारक नसतो. मात्र, अशा निर्णयावर राष्ट्रीय भावना आणि परंपरेचा विचार केला जाईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘चीनच्या लडाखमधील ‘या’ कारवाया संबंध सुधारणाऱ्या नाहीत’; परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञांचा दावा

Web Title: Us flag will fly at half staff on donald trumps inauguration nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 01:39 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Joe Biden
  • World news

संबंधित बातम्या

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 
1

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 

अमेरिकेत इमिग्रेशन कारवाईत हिंसाचार ; ICE अधिकाऱ्याच्या गोळीबारात एक महिला ठार, VIDEO
2

अमेरिकेत इमिग्रेशन कारवाईत हिंसाचार ; ICE अधिकाऱ्याच्या गोळीबारात एक महिला ठार, VIDEO

World War 3: ब्रिटनच्या आकाशात ‘मृत्यूचे दूत’! विमानतळावर उतरली डझनभर सशस्त्र अमेरिकन विमाने; कोणता देश रडारवर?
3

World War 3: ब्रिटनच्या आकाशात ‘मृत्यूचे दूत’! विमानतळावर उतरली डझनभर सशस्त्र अमेरिकन विमाने; कोणता देश रडारवर?

World War 3: अटलांटिक महासागरात सुरू होणार महायुद्ध? अमेरिकेने रशियन तेल टँकर खेचून नेला; रशियाची थेट अणुहल्ल्याची धमकी
4

World War 3: अटलांटिक महासागरात सुरू होणार महायुद्ध? अमेरिकेने रशियन तेल टँकर खेचून नेला; रशियाची थेट अणुहल्ल्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.