Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगभरातील देशांना अमेरिकेच्या मदतीचे दरवाजे बंद; पण ‘या’ दोन देशांना सूट का?

अमेरिका अनेक दशकांपासून जगभरातील सुमारे 180 देशांना आर्थिक मदत करत आला आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच जगभरातील देशांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 29, 2025 | 06:23 AM
US freezes foreign aid for almost all countries except Israel and Egypt

US freezes foreign aid for almost all countries except Israel and Egypt

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिका अनेक दशकांपासून जगभरातील सुमारे 180 देशांना आर्थिक मदत करत आला आहे. ही मदत लष्करी सहाय्य, मानवी मदत, किंवा आर्थिक विकास निधीच्या स्वरूपात दिली जाते. 2022 मध्ये अमेरिकेने सुमारे 6400 कोटी डॉलर्स आर्थिक मदतीसाठी खर्च केले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच जगभरातील देशांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. मात्र या निर्णयातून  इस्त्रायल आणि इजिप्तला वगळण्यात आले आहे.

परंतु, या बंदीमधून इज्रायल आणि इजिप्त या दोन देशांना वगळण्यात आले आहे. या निर्णयामागील ट्रम्प यांचा नेमका हेतू काय आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. खरंतर इस्त्रायल आणि अमेरिकेचे संबंध आजही घनिष्ठ आहेत, पण इजिप्तला मदत का केली जात आहे असा प्रश्न जागतिक स्तरावर विचारला जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी इस्त्रायलवरील शस्त्र पुरवठ्याची बंदी उठवली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- NIA लवकरच अमेरिकेला जाणार; मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरु

ट्रम्प प्रशासनाचा निर्णय

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर काही तासांतच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीर केले होते की, इस्त्रायल आणि इजिप्त वगळता इतर देशांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य थांबवले जाईल. इस्त्रायला दरवर्षी सुमारे 3.3 अब्ज डॉलर तर इजिप्तला 1.3 अब्ज डॉलर मदत दिली जाते.

इजिप्तला दिल्या जाणाऱ्या मदतीचा उपयोग त्यांच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि दहशतवादाविरोधातील लढाईसाठी केला जातो. ही मदत तणावग्रस्त परिस्थिती हाताळण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या सुरक्षेला बळकटी देण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. तसेच ट्रम्प यांनी असेही म्हटले होते की, जो कोणी अमेरिकाविरोधात असेल त्याच्यावर कर लादण्यात येईल आणि कोणतीही मदत मिळणार नाही.

इस्त्रायल मदतीमागील कारणे

इस्त्रायल हे अमेरिकेचे मध्यपूर्वेतील सर्वात महत्त्वाचे सहयोगी राष्ट्र आहे. 1979 मध्ये झालेल्या इस्त्रायल-इजिप्त शांतता करारानंतर अमेरिकेचा या भागातील प्रभाव वाढला आहे. या करारानुसार इस्त्रायल आणि इजिप्त यांनी एकमेकांवर कोणत्याही प्रकारचे सैन्य किंवा राजकीय हल्ले न करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे या कराराला समर्थन देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची या देशांना मिळणारी मदत थांबवली नाही. याशिवाय, इस्त्रायलला दिलेले आर्थिक सहाय्य हे लष्करी मदतीशीदेखील संबंधित आहे.

इजिप्तला मदतीमागील कारणे

तर इजिप्तमध्ये दहशतवादी संघटनांविरोधात लढाईत अमेरिकेची मदत मोठी भूमिका बजावते. अमेरिकेची ही मदत देशातील स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी आणि मध्यपूर्वेतील दहशतवादाविरोधात व्यापक मोहिमेसाठी महत्त्वाची मानली जाते. याशिवाय, अमेरिका आणि इजिप्तमधील संबंध 100 वर्षाहून जुने आहेत. 1922 मध्ये इजिप्तने ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर अमेरिकेसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर हे संबंध अधिक बळकट होत गेले.

अमेरिकेचा धोरणात्मक दृष्टिकोन

इस्त्रायल आणि इजिप्तला मदत सुरू ठेवून अमेरिका मध्यपूर्वेतील आपली सामरिक घेराबंदी आणि प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या निर्णयामुळे अमेरिकेचे जागतिक धोरण अधिक स्पष्ट होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात जोरदार पुनरागमन करुन संपूर्ण जगाला अमेरिकेची पुढील भूमिका काय असेल याचा एक छोटासा टेलर दिला आहे. यामुळे अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी कारवाई; बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी गुरुद्वारांमध्ये शोध सुरु

Web Title: Us freezes foreign aid for almost all countries except israel and egypt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Egypt
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
2

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
3

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
4

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.