Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Warfare: पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धात भारताची एन्ट्री? डीपफेक व्हिडिओने उडवली जगभरात खळबळ; वाचा तथ्य

Afghanistan Pakistan Clash: पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान नेतन्याहू यांच्याबद्दल खोटे दावे केले जात आहेत. भारतीय पंतप्रधान किंवा इस्रायली पंतप्रधान दोघांनीही अफगाणिस्तानला मदत करण्याबद्दल एकही शब्द बोललेला नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 27, 2026 | 01:22 PM
fact check pm modi israel pm netanyahu afghanistan aid video fake deepfake alert

fact check pm modi israel pm netanyahu afghanistan aid video fake deepfake alert

Follow Us
Close
Follow Us:
  • फेक न्यूजचा पर्दाफाश
  • युद्धजन्य परिस्थिती
  • एआयचा गैरवापर

PM Modi Israel visit deepfake video : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष (Afghanistan-Pakistan Conflict) आता टोकाला पोहोचला असून सीमेवर युद्धाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा संवेदनशील काळात सोशल मीडियावर एका डीपफेक व्हिडिओने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संयुक्तपणे अफगाणिस्तानला लष्करी आणि आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, तपासाअंती हा दावा पूर्णपणे खोटा, बनावट आणि खोडसाळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेमका काय आहे तो ‘बनावट’ व्हिडिओ?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ आणि व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी इस्रायलच्या संसदेत भाषण करत असताना अफगाणिस्तानसाठी अब्जावधी डॉलर्सचे मदत पॅकेज जाहीर करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, एआयच्या (AI) मदतीने तयार केलेल्या या व्हिडिओमध्ये मोदी अफगाण तालिबानचे सर्वोच्च नेते मुल्ला हैबतुल्लाह यांचे नाव घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ अशा प्रकारे एडीट केला आहे की, जणू भारत आणि इस्रायल यांनी पाकिस्तानविरुद्ध नवीन युती केली आहे. परंतु, वास्तव हे आहे की पंतप्रधान मोदींनी त्यांच्या इस्रायल दौऱ्यात किंवा इतर कोणत्याही भाषणात अफगाणिस्तानला अशा प्रकारची मदत देण्याबाबत अवाक्षरही काढलेले नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  Trump 2026: डोनाल्ड ट्रम्पना संपवायचे होते! ‘या’ पाकिस्तानी व्यक्तीला हाताशी धरून इराणचे भव्य षड्यंत्र; न्यू यॉर्क कोर्टाचा खुलासा

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर रक्ताचा सडा

एकीकडे ही फेक न्यूज पसरत असतानाच, जमिनीवर मात्र परिस्थिती अत्यंत भीषण आहे. पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह पक्तिका आणि कंधार प्रांतांत जोरदार हवाई हल्ले केले आहेत. गुरुवारी रात्री अफगाण सैन्याने पाकिस्तानी सीमा सैनिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. इस्लामाबादच्या संरक्षण मंत्र्यांनी आता अफगाणिस्तानसोबत “खुले युद्ध” घोषित केले असून दोन्ही देशांमधील ग्राउंड बॉर्डर क्रॉसिंग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये झालेल्या संघर्षात ७० हून अधिक जणांचा बळी गेला होता, आता हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.

The video is AI-manipulated (deepfake). Fact-checks by India Today, NewsMeter, and NewsChecker confirm the audio was altered—Modi and Netanyahu never mentioned Taliban aid, Afghanistan redevelopment, or “Hibatullah as a dear friend.” Real Knesset speeches (Feb 25, 2026) covered… — Grok (@grok) February 26, 2026

credit – social media and Twitter

इस्रायलची भूमिका आणि डीपफेकचा धोका

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या भाषणात “कट्टरपंथी इस्लाम” विरुद्धच्या लढाईवर भर दिला होता, मात्र त्यांनी अफगाणिस्तानच्या राजवटीला मदत करण्याबाबत कोणतेही विधान केलेले नाही. सोशल मीडिया तज्ज्ञांनी सावध केले आहे की, अशा प्रकारचे एआय जनरेटेड व्हिडिओ दोन देशांमधील राजनैतिक संबंध बिघडवण्यासाठी आणि जनमानसात संभ्रम निर्माण करण्यासाठी वापरले जात आहेत. नेटीझन्सनी कोणत्याही पडताळणीशिवाय अशा व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: आता उघड युद्ध होईल! पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ तालिबानवर डाफरले; भारताचं नाव घेत ओकली विषारी गरळ

भारताची अधिकृत भूमिका

भारत सरकारने नेहमीच अफगाणिस्तानच्या सामान्य जनतेला मानवतावादी मदत पुरवण्यावर भर दिला आहे, परंतु तालिबान राजवटीला लष्करी मदत देण्याबाबत किंवा पाकिस्तानविरुद्ध युती करण्याबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कोणतीही “संयुक्त पत्रकार परिषद” किंवा “मदत पॅकेज” जाहीर करण्यात आलेले नाही. ही केवळ अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्षाचा फायदा घेऊन खोटी माहिती पसरवण्याची खेळी आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंतप्रधान मोदींनी अफगाणिस्तानला मदत जाहीर केली आहे का?

    Ans: नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ एआय जनरेटेड (Deepfake) आहे. भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

  • Que: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध का सुरू झाले आहे?

    Ans: सीमावाद आणि ड्युरंड रेषेवरील घुसखोरीवरून दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून तणाव आहे. नुकत्याच झालेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले करत "खुले युद्ध" जाहीर केले आहे.

  • Que: व्हायरल व्हिडिओमध्ये इस्रायलचा उल्लेख का आहे?

    Ans: भारत आणि इस्रायलची मैत्री सर्वश्रुत आहे. या मैत्रीचा गैरवापर करून पाकिस्तानविरुद्ध नवीन युती झाल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी या फेक व्हिडिओमध्ये इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना दाखवण्यात आले आहे.

Web Title: Fact check pm modi israel pm netanyahu afghanistan aid video fake deepfake alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Afghanistan-Pakistan Conflict
  • Israel
  • PM Narendra Modi
  • World War 3

संबंधित बातम्या

Strait of Hormuz: “जवळ आलात तर थेट उडवून देऊ..”; होर्मुजच्या नाकेबंदीवर ट्रम्प यांचा इराणला सर्वात मोठा इशारा; तेहरानमध्ये खळबळ
1

Strait of Hormuz: “जवळ आलात तर थेट उडवून देऊ..”; होर्मुजच्या नाकेबंदीवर ट्रम्प यांचा इराणला सर्वात मोठा इशारा; तेहरानमध्ये खळबळ

War Crimes : इस्रायलने मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या! चिमुकल्यांच्या रुग्णालयाची राखरांगोळी; इराणने जारी केला भयावह VIDEO
2

War Crimes : इस्रायलने मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या! चिमुकल्यांच्या रुग्णालयाची राखरांगोळी; इराणने जारी केला भयावह VIDEO

नेतान्याहूंचा ‘हुकमी एक्का’ की Israelच्या विनाशाची नांदी? Roman Gofman यांच्या नियुक्तीवरून लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेत उभी फूट
3

नेतान्याहूंचा ‘हुकमी एक्का’ की Israelच्या विनाशाची नांदी? Roman Gofman यांच्या नियुक्तीवरून लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेत उभी फूट

US-Iran Conflict : ‘करार होणारच होता… पण’, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले सत्य; शस्त्रसंधी संपणार, मिसाईल्स बरसणार?
4

US-Iran Conflict : ‘करार होणारच होता… पण’, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले सत्य; शस्त्रसंधी संपणार, मिसाईल्स बरसणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.