US halts billions of dollars in US arms sales to Ukraine
वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकी प्रचारांदरम्यान दिलेल्या वचनांवर कारवाई करण्यास सुरु केली आहे. अमेरिकेच्या जन्मत: नागरिकत्वाचा हक्क, बेकादेशीर स्थलांतरितांना हद्दपार आणि रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यावर ट्रम्प प्रशासनाने कारवाया सुरु केल्या आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पुतिन यांना अल्टिमेट दिला असून आता युक्रेनला अमेरिकेकडून मिळणारी मदत थांबवली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाने झेलेन्स्कींना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनला अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्सच्या मिळणाऱ्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा ट्रम्प यांनी थांबवला आहे. एवढेट नव्हे तर इतर देशांना मिळणारी मदत देखील ट्रम्प यांनी बंदकरणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, इस्त्रायल आणि इजिप्तचा यामध्ये समावेश नसून या देशांना अमेरिकेचा पाठिंबा मिळणार आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणांतर्गत हा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. परदेशी धोरणांवर कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या युक्रेनला शस्त्रस्त्र पुरवठा थांबवण्याच्या निर्णायामुळे आदेशाचा विकासापासून ते लष्करी मदतीपर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाच्या कार्यकाळात युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची शस्त्रे पुरवण्यात आली होती. यामुळे रशियाचा सामाना करण्यास युक्रेनला सहजसोपे जात होते. अमेरिकेच्या मदतीमुळे युक्रेन युद्धात टिकून राहिला होता असे म्हटले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनला 2023 मध्ये 64 अब्ज डॉलर्सची मदत बायडेन प्रशासनाने केली होती. 2024 च्या मदती संबंधित अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
ट्रम्प यांचा पुतिन यांना अल्टिमेटम
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुक प्रचारादरम्यान शपथ घेताच रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र शपथविधीला चार दिवस उलटले तरी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याची चिन्हे अद्याप दिसली नाहीत. दरम्यान ट्रम्प यांनी पुन्हा एकदा 100 दिवसांत युद्ध संपवणार असल्याचे म्हटले असून त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना अल्टिमेटम दिला आहे. युक्रेन युद्ध संपवण्यासाठी तडजोड करा नाहीतर मोठी किंमत मोजायला तयार राहा. पुतिन यांनी युद्ध संपवण्यास नकार दिल्यास रशियावर निर्बंध लादले जाऊ शकतात, असे ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले. ट्रम्पचा हा धोका रशिया कितपत सहन करेल?
ट्रम्प यांना पुतीन यांच्या अटी ऐकून घ्यायच्या नाहीत
या संपूर्ण प्रकरणामध्ये ट्रम्प यांचे विशेष दूत, निवृत्त अमेरिकन जनरल किथ केलॉग यांनी युद्धबंदीसाठी 100 दिवसांची योजना तयार केली आहे. त्याच वेळी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ट्रम्प यांच्या शपथविधीदरम्यान सुरक्षा परिषदेची बैठक घेतली आणि युद्धाच्या समाप्तीसंदर्भात पुढील चर्चेसाठी आपली संमती दर्शविली. युद्धाची मूळ कारणे दूर केली तर त्यावर तोडगा निघू शकतो, असे ते म्हणाले. म्हणजे पुतिन यांना अटींसह चर्चा पुढे नेण्याची इच्छा आहे. पण त्याच्या अटी काय असतील हे अद्याप उघड करण्यात आलेले नाही. अशा स्थितीत पुतिनकडून स्पष्ट हिरवा सिग्नल न मिळाल्याने ट्रम्प धमकावण्याच्या आणि इशारा देण्याच्या पद्धतीत आले आहेत.