Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump: अबब! हे असे कसे झोपले? जिनपिंग यांचे भाषण अन् ट्रम्प यांच्या डुलक्या? Video Viral

Donald Trump: शेनझेन येथे पार पडत असलेल्या APEC शिखर परिषदेच्या मंचावर जागतिक नेत्यांची उपस्थिती होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग परिषदेची सुरुवात करताना आपले निवेदन देत होते. त्याच दरम्यान कॅमेरा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे वळला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 19, 2026 | 07:50 PM
सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी धरले धारेवर 

सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी धरले धारेवर 

Follow Us
Follow Us:

शि जिनपिंगच्या भाषणादरम्यान ट्रम्प झोपल्याचा व्हिडिओ व्हायरल
APEC शिखर संमेलनादरम्यानची घटना असल्याचे आले समोर 
सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी धरले धारेवर 

Donald Trump: सध्या चीनमध्ये शेनझेन शहरात APEC म्हणजेच आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन शिखर परिषद सुरू आहे. या परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील उपस्थित राहिले आहेत. मात्र या परिषदेदरम्यान एक वेगळाच प्रसंग पाहायला मिळाला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आपले प्रास्ताविक निवेदन देत असताना डोनाल्ड ट्रम्प झोपले असल्याचे दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल झाला आहे.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग निवेदन देत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पडोळे बंद करून बसले असल्याचे दिसून येत आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प झोपले असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. सोशल मिडियावर ट्रम्प यांच्यावर टीका देखील केली जात आहे.

PM Modi: मनिलात पंतप्रधान मोदी पाकिस्तानी ई-रिक्षात बसले? व्हायरल दाव्यामागे बजाजच्या एका फुटेजने फिरवली चक्रे

शेनझेन येथे पार पडत असलेल्या APEC शिखर परिषदेच्या मंचावर जागतिक नेत्यांची उपस्थिती होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग परिषदेची सुरुवात करताना आपले निवेदन देत होते. त्याच दरम्यान कॅमेरा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे वळला. त्यामध्ये ते डोळे बंद करून बसल्याचे दिसून आले. हा प्रसंग थेट टीव्ही वाहिन्यांवर दाखवण्यात आला. त्यानंतर काही वेळातच या क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जाऊ लागल्या. ट्रम्प डोळे बंद करून बसल्याचे दृश्य समोर आल्याने नेटिझन्स आणि राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आले.

CCTV फुटेजनंतर ट्रम्प टीकेचे धनी

चीनमधील शेनझेन येथे सुरू असलेल्या APEC शिखर परिषदेदरम्यान डोळे बंद करून बसलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता ते विरोधक आणि टीकाकारांच्या निशाण्यावर आले आहेत. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘सगळे जण परिषदेसाठी जातात आणि ट्रम्प APEC मध्ये डुलकी घ्यायला जातात.

Girls College Toilet Viral Video : कुठे दरवाजे नाहीत पार्टिशन्स अपुरे; कॉलेजमधील धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ केला व्हायरल

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील ही त्रिपक्षीय चर्चा शेनझेनमध्ये होत आहे. अमेरिका, चीन आणि रशिया या तिन्ही देशांचे सर्वोच्च नेते पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर एकत्रित आले आहेत. या बैठकीतून जागतिक राजकारण, व्यापार आणि भू-राजकीय पातळीवर कोणती नवी समीकरणे आकार घेतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: APEC शिखर परिषद २०२६ कुठे आयोजित करण्यात आली आहे?

    Ans: APEC म्हणजेच आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन शिखर परिषद चीनमधील शेनझेन शहरात आयोजित करण्यात आली आहे.

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे?

    Ans: : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग प्रास्ताविक निवेदन देत असताना डोनाल्ड ट्रम्प झोपल्यासारखे दिसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Web Title: Donald trump sleep video viral xii jinping speech apec in china tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • Donald Trump
  • viral video
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

IND Vs NZ: अरे हा कॅच तुझा की माझा? सेट बॅट्समनला पडीकलकडून जीवदान, गिलची प्रतिक्रिया Viral
1

IND Vs NZ: अरे हा कॅच तुझा की माझा? सेट बॅट्समनला पडीकलकडून जीवदान, गिलची प्रतिक्रिया Viral

IND vs NZ: अंपायरच्या निर्णयावर कर्णधार गिलचा पारा चढला! DRS वरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल
2

IND vs NZ: अंपायरच्या निर्णयावर कर्णधार गिलचा पारा चढला! DRS वरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

US Iran War : इराण पुन्हा क्षेपणास्त्रे आणि जैविक शस्त्रे बनवतोय; इस्रायलच्या इशाऱ्यानंतर अमेरिका मोठी कारवाई करण्याच्या तयारीत
3

US Iran War : इराण पुन्हा क्षेपणास्त्रे आणि जैविक शस्त्रे बनवतोय; इस्रायलच्या इशाऱ्यानंतर अमेरिका मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

US Politics: डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’
4

US Politics: डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.