US issues official notification of additional tarrif on India from 27 august
US Tarrif On India : वॉशिंग्टन : अखेर भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादले जाणारच. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली असून अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ (Tarrif) लादले आहे. भारताकडून सध्या अमेरिकेशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात होते. पण आता मात्र अमेरिकेने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे.
उद्यापासून म्हणजेच २७ ऑगस्ट २०२५ पासून दुपारी १२ वाजून १ मिनिटांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याचा निर्णय न बदल्यानमे ट्रम्प यांनी शुल्क दुप्पट केले आहे. त्यांनी म्हटले होते की, भारत रशियाला युक्रेन युद्धात तेल खरेदी करुन अप्रत्यक्ष मदत करतच आहे.
यामुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसा घडत आहे. या कारणामुळेच त्यांनी भारतावर टॅरिफ लादले आहे. यामुळे रशियाला आता धक्का बसेल. त्यांची तेल निर्यात कमी होईल आणि रशिया युद्धबंदी करण्यास तयार होईल असे ट्रम्प यांचे मत आहेत. आता भारताकडून रशियाला मिळणार खतपाणी बंद होईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादले होते. यामध्ये त्यांनी २५% अतिरिक्त वाढ केली असून आता ५० टक्के टॅरिफ भारतावर लादले आहे. तसेच अतिरिक्त दंडही लादला आहे.
ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’वर मोदींचा पलटवार, ‘आम्ही आमची ताकद वाढवतच राहू’; दहशतवाद्यांनाही गंभीर इशारा
याच वेळी ट्रम्प यांनी चीनशी संबंधाचे कौतुक केले आहे. चीनवर अमेरिकेने कोणतेही टॅरिफ लागू केलेले नाही. तसेच अमेरिका आणि चीनमध्ये हळूहळू संबंध वाढवण्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. सध्या ट्रम्प यांनी चीनला टॅरिफच्या अंतिम मुदतीत वाढ दिली आहे. चीनलवर ३०% शुल्क लादण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प सतत भारताला रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याची धमकीही देत आहे. असे न केल्यास टॅरिफमध्ये अधिक वाढ करण्याचेही त्यांनी पुन्हा म्हटले आहे. भारताने सुरुवातीपासून ट्रम्प यांच्या निर्णयाचा विरोध केला आहे. भारताने त्यांच्या धमकीनंतरही रशियाशी मोठा व्यापार करार केला, तसेच हे केवळ राष्ट्रीय हितासाठी आणि जागतिक स्थिरतेसाठी असल्याचेही भारताने अनेक वेळा स्पष्ट केले आहे. मात्र ट्रम्प यांची नाराजी काही दूर झालेली नाही.
भारताने सांगितले की, चीन हा रशियाचा मोठा तेल खरेदीदार आहे. असे असूनही अमेरिका त्यांच्याविरोधात कारवाई करत नाही. तसेच अमेरिका आणि युरोपीय देशही रशियाशी व्यापार करतात. हेही भारताने सांगितले आहे. मात्र आता ट्रम्प यांनी अतिरिक्त कराच्या निर्णयावर स्वाक्षरी केली असून याचा काय परिणाम होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे.