झेलेन्स्कींना फसवत आहेत ट्रम्प? रशियाचे कीववर डागतोय क्षेपणास्त्र, पण युक्रेनला 'हे' शस्त्र वारण्याची नाही परवानगी, कारण काय ? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia Ukraine War news in Marathi : कीव/मॉस्को : सध्या रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia Ukraine War)अधिक तीव्र होत चालले आहे. दोन्ही देश एकमेकंवर हल्ले करत आहे. नुकतेच युक्रेनने त्यांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त २४ ऑगस्ट रोजी रशियाच्या न्यूक्लिअयर प्रोजेक्टवर हल्ला केला आहे. युक्रेनने या प्रोजेक्टवर १२ हून अधिक ड्रोन हल्ले केले आहेत. शिवाय रशियाने देखील युक्रेनच्या महत्वपूर्ण भागांवर ताबा मिळवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीच्या प्रयत्नात आहेत. परंतु या हल्ल्यांमुळे शांततेच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.
पण याच वेळी जागतिक स्तरावर एक वेगळीच चर्चा सुरु आहे. सांगितले जात आहे की, युक्रेनने अमेरिकेकडून लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे खेरदी केली आहे. परंतु याचा वापर करण्यास त्यांना परवानगी नाही. यामुळे डोनाल्ड ट्रम्प वोलोडिमिर झेलेन्स्कींना (Volodymir Zelensky) फसवत आहेत. त्यांचा युद्ध संपवण्याचा कोणताही हेतू नाही अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. यावर अमेरिकेच्या सरकारी वृत्तसंस्था वॉल स्ट्रीट जर्नलच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मोठा खुलासा केला आहे.
अमेरिकेवर ‘Tarrif Hike’ चा पहिला तडाखा; भारतासह युरोपीय देशांनी टपाल सेवा केली बंद
अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनला रशियावर अमेरिकेच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा वापर करण्याची परवानगी नाही. सध्या हे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. पण युक्रेनने एकदा रशियाच्या आत असलेल्या लक्ष्यावर एटीएसीएमएस डागण्याची परवानगी मागितली होती. परंतु अमेरिकेने याला नकार दिला होता.
अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे देऊ केली आहे. पण अमेरिका आणि युक्रेनमध्ये झालेल्या संरक्षण करारानुसार, याचा वापर करण्यास युक्रेनला मनाई करण्यात आली आहे. युक्रेनला युरोपीय देशांनी दिलेली क्षेपणास्त्रेही यामध्ये सामील आहेत. पण अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या धोरण व्यवहारानुसार युक्रेनला ही शस्त्रे वापरण्याची परवानगी नाही. या करारानुसार, याचा अंतिम निर्णय अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेसेथ यांच्याकडे आहे.
अमेरिकेच्या य नकारामुळे युक्रेन रशियाविरुद्ध लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरु शकत नाही. याच्या वापरामुळे युक्रेनचा युद्धात सहज विजय शक्य आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना शांतता प्रस्थापित करायची आहे. त्यांची इच्छा आहे की, युक्रनने रशियाशी तडजोड करावी. ट्रम्प यांना रशिया आणि युक्रेन युद्ध लवकरात लवकर संपावयचे असेही व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन यांनी म्हटले आहे.
शिवाय ट्रम्प यांनी याचा युद्ध सुरु होण्याचा आरोपी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर केला आहे. त्याच्यामुळेच युक्रेनला केवळ बचाव करण्याची परवानगी आहे, प्रत्युत्तर देण्याची नाही असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी असाही दावा केला आहे. २०२० मध्ये ते राष्ट्राध्यक्ष असते तर युद्ध सुरुच झाले नसते.