Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणमधील अणुकेंद्रांवर युद्धाचे सावट! अणू गळती झाल्यास ८ देशांत पसरणार ‘सायलेंट किलर’ विष; पिण्याच्या पाण्यासाठीही होणार हाहाकार

Middle East Conflict: इराणच्या अणुकेंद्रांजवळ वाढत्या हल्ल्यांमुळे 'न्यूक्लियर सेफ्टी' (अणू सुरक्षा) धोक्यात आली असल्याचा गंभीर इशारा 'इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी' (IAEA) चे महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 03, 2026 | 04:25 PM
इराणमधील अणुकेंद्रांवर युद्धाचे सावट! अणू गळती झाल्यास ८ देशांत पसरणार 'सायलेंट किलर' विष (Photo Credit- X)

इराणमधील अणुकेंद्रांवर युद्धाचे सावट! अणू गळती झाल्यास ८ देशांत पसरणार 'सायलेंट किलर' विष (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

 

  • अरे बापरे! इराणमध्ये अणू गळती झाली तर ८ देशांना बसणार मोठा फटका!
  • हवेत पसरणार ‘सायलेंट किलर’ विष
  • तज्ज्ञांचा इशारा
Israel attacks Iran News: मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण लष्करी संघर्षाने आता एका नव्या आणि भयानक धोक्याकडे जगाचे लक्ष वेधले आहे. इराणच्या अणुकेंद्रांजवळ वाढत्या हल्ल्यांमुळे ‘न्यूक्लियर सेफ्टी’ (अणू सुरक्षा) धोक्यात आली असल्याचा गंभीर इशारा ‘इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी’ (IAEA) चे महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी दिला आहे. अद्याप कोणतीही किरणोत्सर्गी गळती (Radiation Leak) झालेली नसली, तरी परिस्थिती बिघडल्यास ‘रेडिओलॉजिकल रिलीज’ची शक्यता नाकारता येत नाही. हा एक असा ‘सायलेंट किलर’ आहे जो डोळ्यांना न दिसता हजारो किलोमीटरपर्यंत विनाश घडवू शकतो.

समुद्रमार्गे खाडी देशांवर ओढवणार मोठे संकट

इराणच्या बुशहरसारख्या किनारपट्टीवरील अणू प्रकल्पांमधून थोडीही गळती झाली, तर त्याचा सर्वात पहिला आणि घातक परिणाम समुद्रावर होईल. आखाती देशांतील किमान ६ ते ८ देश थेट याच्या तडाख्यात येऊ शकतात. कुवेत, कतार आणि बहरीनसारख्या देशांसाठी ही स्थिती एखाद्या भीषण आपत्तीपेक्षा कमी नसेल. याचे मुख्य कारण म्हणजे हे देश पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे समुद्राचे पाणी गोड करणाऱ्या ‘डीसॅलिनेशन’ (Desalination) प्लांटवर अवलंबून आहेत. जर समुद्राचे पाणी किरणोत्सर्गी झाले, तर या देशांतील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प होईल. सर्वाधिक धोका संयुक्त अरब अमिरातीला (UAE) आहे, कारण तिथला ८० टक्क्यांहून अधिक पिण्याच्या पाण्याचा स्रोत समुद्रच आहे.

World War 3 : आता थेट प्रहार! ट्रम्प यांचे इराणला ‘डेथ वॉरंट’; सैनिकांना युद्धाचा आदेश जारी, अमेरिकेच्या महायभकंर प्लॅनने खळबळ

वाऱ्याच्या वेगासह सीमा ओलांडणार 

अणू गळतीचा धोका केवळ पाण्यापुरता मर्यादित राहणार नाही. हवेची दिशा हे रेडिएशन सौदी अरेबिया, ओमान आणि इराकसारख्या शेजारील देशांपर्यंत पोहोचवू शकते. एखादी मोठी गळती झाल्यास किरणोत्सर्गी कण अवघ्या काही तासांत आंतरराष्ट्रीय सीमा पार करून लाखो लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. जॉर्डन आणि सीरियासारख्या देशांनाही या अस्थिरतेमुळे मोठा धोका पत्करावा लागू शकतो. तज्ज्ञांच्या मते, हवेतून पसरणारे हे प्रदूषण रोखणे अशक्य आहे. हवामानातील बदलांनुसार हे रेडिएशन कित्येक मैल दूरपर्यंत कहर माजवू शकते, ज्यामुळे संपूर्ण क्षेत्रातील पर्यावरण आणि जनजीवन कित्येक वर्षांसाठी उद्ध्वस्त होऊ शकते.

रेडिएशनपासून बचावासाठी खबरदारीचे नियम

अणू रेडिएशनच्या स्थितीत जीव वाचवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ‘कमीतकमी संपर्क’. तज्ज्ञांच्या मते, अशी परिस्थिती उद्भवल्यास खालील बाबींचे पालन करणे आवश्यक आहे:

  • सुरक्षित आश्रय: तात्काळ वीट किंवा काँक्रीटच्या मजबूत इमारतीमध्ये आश्रय घ्यावा.
  • हवा बंद करा: बाहेरची दूषित हवा आत येऊ नये म्हणून खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद करावेत. एसी किंवा पंखे यांसारखे व्हेंटिलेशन सिस्टिम त्वरित बंद कराव्यात.
  • दुरी राखा: रेडिएशनच्या स्त्रोतापासून जितके जास्त लांब राहाल, तितका धोका कमी होईल.
  • खाद्य सुरक्षा: अशा काळात केवळ सीलबंद बाटलीतील पाणी आणि डबाबंद अन्नच सुरक्षित असते.

वेळेचे भान, अंतर आणि सुरक्षेच्या या कडक नियमांचे पालन करूनच या ‘अदृश्य मृत्यू’च्या छायेतून वाचणे शक्य आहे.

Iran Strategy : काय आहे इराणची मोजॅक रणनीती? ४ दिवसांतच अमेरिका-इस्रायलला फुटला घाम; ट्रम्प यांच्यासाठी इराण ठरतोय गळ्याचा फास?

Web Title: If there is a nuclear leak in iran 8 countries will be hit hard silent killer poison will spread in the air

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • nuclear bomb
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.