Us Lawmakers Urge Trump To end Tariffs and Fix Ties With India
India US Relations : वॉशिंग्टन : अमेरिका आणि भारतामध्ये टॅरिफवरुन (Tarrif) तणावाचे वातावरण कायम आहे. यामुळे दोन्ही देशांवर परिणाम होत आहे. पण डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) भारतावरील टॅरिफ कमी करण्यास तयार नाहीत. त्यांच्या या निर्णयामुळे अमरिकेत कॉंग्रस खासदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अमेरिकेतील कॉंग्रसच्या १९ सदस्यांनी व्हाइट हाउसला एक संदेश पाठवत भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकन कॉंग्रेस खासदारांनी भारत आणि अमेरिकेतील वाढता तणाव कमी करण्याचा इशारा ट्रम्प यांना दिला आहे. यासाठी तातडीने पावले उलावीत असे खासदारांनी म्हटले आहे. ०८ ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या संदेशात, खासदारांनी ट्रम्प यांच्या भारतावर ५० टक्के टॅरिफ लादण्याच्या निर्णयामुळे मोठ्या लोकशाही असलेल्या देशाशी संबंध बिघडले असल्याचे म्हटले. यामुळे केवळ भारतावर नाही तर, अमेरिकेच्या हितांवरही विपरीत परिणाम होत आहे. यामुळे भारत आणि अमेरिका संबंध पुन्हा स्थिर करणे महत्त्वाचे असल्याचे खासदारांनी म्हटले आहे.
खासदारांनी हेही स्पष्ट केले आहे की, ट्रम्प यांच्या भारतावरील टॅरिफमुळे भारतीय उत्पादक आणि अमेरिकन ग्राहकांवर परिणाम होत आहे, ज्यामुळे पुरवठा साखळीत अडचणी निर्माण झाल्या आहेत. अमेरिकेच्या कॉंग्रेस खासदारांनी भारताला एक महत्त्वाचा आणि मोठा व्यापारी भागीदार म्हणून संबोधले आहे.
यामुळे अमेरिकन उत्पादक सेमीकंडक्टर, आरोग्यसेवा आणि उर्जा यांसारख्या क्षेत्रात भारतावर अवलंबून असतात, ज्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. खासदारांनी महटले की, भारतात गुंतवणूकीमुळे अमेरिकन कंपन्यांना जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळतो. यामुळे अमेरिकेतील स्थानिक समुदायासाटी नोकऱ्या आणि आर्थिक संधीही उपलब्ध होतात.
खासदारांच्या मते, भारतावरील करत वाढवल्याने दोन्ही देशांतील संबंध अधिक ताणले गेले आहे. याचा अमेरिकन कुटुंबांवर परिणाम होत नाही, तर जागतिक बाजारपेठांवरही होच आहे. ट्रम्प यांच्या या संधीचा फायदा चीन घेत असल्याचेही खासदारांनी म्हटले आहे. यामुळे भारतासाशी तातडीने संबंध सुधारण्यात यावे असा कडक इशारा देण्यात आला आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर किती कर लादला आहे?
ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर ५० टक्के कर लादला आहे. तसेच २५ टक्के अतिरिक्त दंडही लागू केला आहे.
प्रश्न २. ट्रम्प यांनी भारतावर कर का लादला आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदी न थांबवल्यामुळे भारतावर ५० टक्के कर लादला आहे.
प्रश्न ३. अमेरिकन कॉंग्रेस खासदारांना ट्रम्प यांना काय इशारा दिला?
अमेरिकन कॉंग्रस खासदारांनी ट्रम्प यांना भारतावरील कर कमी करण्याचा आणि बिघडलेले संबंध स्थिर करण्याचा इशारा दिला आहे.
प्रश्न ४. भारतावरील अमेरिकन करामुळे काय परिणाम होत आहे?
भारतावरील ५० टक्के करामुळे भारत आणि अमेरिका दोन्ही देशांच्या पुरवठा साखळीवर, उत्पादक आणि ग्राहकांवर परिणाम होत आहे.
चीनची गोल्डमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक; भारतही खरेदी करत आहे सोनं, नेमक काय आहे प्रकरण?