ट्रम्प नव्हे... या तीन व्यक्तींपैकी एकाला मिळू शकतो नोबेल शांतता पुरस्कार; जाणून घ्या कोणाची नावे आहेत चर्चेत? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nobel Prize 2025 : नवी दिल्ली : सध्या नोबोल पारितोषिकाच्या (Nobel Prize) विजेत्यांची नावे घोषित केली जात आहे. वैद्यक, भौतिक आणि रसायनशास्त्रातील पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहे. नोबेल शांतता पुरस्काराची जास्त चर्चा होत आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या पुरस्काराची सात युद्ध थांबवल्याबद्दल मागणी केली आहेत. परंतु ट्रम्प यांना निराशा मिळण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते हा पुरस्कार त्यांना दिला जाणार नाही. ओलोस्थित पीस रिसर्च इन्सिट्यूटच्या अध्यक्षा नीना ग्रेग यांनी ट्रम्प यांची धोरणे नोबेल पुरस्काराच्या विरोधी आहे. त्यांनी युद्ध सोडवली असली तर अजूनही अस्थिरतेचे वातावरण आहे. यामुळे हे अल्फ्रेड नोबेल यांच्या उद्देशाच्या विरोधी आहे. यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळणार नाही.
सध्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी ही नावे चर्चेत
सध्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी ३३८ जणांना नामांकन देण्यात आले आहे. पण यातील तीन नावे जास्त चर्चेत आहेत. यामध्ये दोन संघटना आहेत. पहिली सुदान इमर्जन्सी रिस्पॉन्स रूम्स (ERRs) चे कार्यकर्ते, ज्यांनी सुदानच्या दुर्गम भागातील लोकांना मदत केली आहे. तर दुसरी युरोपमधील ऑफिस फॉर डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्स अँड ह्युमन राईट्स (OSCE) सुरक्षा आणि सहकार्य संघटना जी लोकशाही, कायद्याचे राज्य आणि मानवी हक्कांसाठी लढते.
यामध्ये तिसरा व्यक्तीचे नाव जास्त चर्चेत असून ही व्यक्ती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमि र पुतिन यांची कट्टर विरोधक अलेक्सी नवलनी यांची पत्नी आहे. अलेक्सी नवलनी यांची २०१४ मध्ये रशियाच्या तुरुंगात निधन झाले होते. पण त्यांची पत्नी युलिया नवलीन यांनी त्यांची हत्या झाली असून यामागे पुतिन यांचा हात असल्याचे म्हटले आहे.
Nobel Prize 2025 : नोबेल पारितोषिकांमधून गणित का गायब ? १२० वर्ष जुने गूढ अजूनही उलगडलेले नाही
नोबेल पुरस्कार विजेत्याला काय बक्षिस मिळते?
दरवर्षी रॉयल स्वीडीश अकादमी ऑफ सायन्सेस रसायशास्त्रातील इत्कृष्ट संशोधनांसाठी नोबेल पुरस्कार प्रदान करते. यामध्ये विजेत्यांना ११ दशलक्ष स्वीडीश क्राउन म्हणजे १२ दशलक्ष डॉलर्स मानधन म्हणून मिळते. एकापेक्षा अधिक जास्त शास्त्रज्ञांमध्ये ही रक्कम वाटून दिली जाते.
या पुरस्कारानंतर अजून तीन पुरस्कार राहिलेले आहेत. यामध्ये ०९ ऑक्टोबर रोजी साहित्य क्षेत्रातील, तर १३ ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्रातील पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. तसेच शांतता नोबेल पुरस्कारही जाहीर करण्यात येणार आहे.
प्रश्न १. नोबेल पुरस्कार कोणाकडून प्रदान केला जातो.
नोबेल पुरस्कार हा रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस नॉर्वेतील नार्वेजियन नोबेल समितीद्वारे प्रदान केला जातो.
प्रश्न २. कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो नोबेल शांतता पुरस्कार?
नोबेल शांतता पुरस्कार हा वैज्ञानिक अल्फ्रेड नोबोल यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पुण्यतिथी दिवशी १० डिसेंबर रोजी प्रदान केला जातो.
प्रश्न ३. यंदाचे कोणते नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत?
२०२५ चे नोबेल पारितोषिक वैद्यक, भौतिक आणि रसायनशास्त्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
प्रश्न ४. २०२५ चा वैद्यक शास्त्रातील पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमधील २०२५ चा नोबेल पुरस्कार मेरी ई. ब्रुनको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना जाहीर करण्यात आला आहे.
प्रश्न ५. २०२५ चा भौतिक शास्त्रातील पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
यंदाचा २०२५ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जॉन क्लार्क, मायकेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनस या तीन शास्त्रज्ञांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
प्रश्न ६. २०२५ चा रसायन शास्त्रातील पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने २०२५ चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा सुसुमु कितागावा, रिचर्ड रॉबसन, आणि ओमर याघी यांना प्रदान केल आहे.