US Media on India China Relations
US Media on India China Relations : वॉशिंग्टन : अमेरिका आणि भारताच्या संबंधामध्ये तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील टॅरिफमुळे हा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत. येथे शांघाय परिषदेत ते सहभागी झाले आहेत. मात्र यावर अमेरिकन मीडिया नाराज दिसून येत आहे. अमेरिकन मीडियाने दावा केला आहे की चीन याकडे केवळ महासत्ता बनण्यासाठी एक संधी म्हणून पाहत आहे.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीन अमेरिका आणि भारतामधील तणावाचा फायदा स्वार्थासाठी घेत आहे. ही चीनची धोरणात्मक रणनीती असण्याची शक्यता आहे. सध्या चीन रशियाशी आपले जुने संबंध अधिक मजबूत करत आहे. तर याच वेळी पूर्वी शत्रू असलेल्या भारताशी देखील संबंध मजबूत करण्याकडे लक्ष देत आहे.
पण यामुळे दक्षिण आशियामध्ये चीनचा प्रभाव वाढत असून ही कूटनीति असल्याचे अमेरिकन मीडियाने म्हटले आहे. चीन अमेरिकेविरोधात भारताला पाठिंबा देऊन, तसेच लष्करी बाळाच्या माध्यमातून व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेचा प्रभाव कमी करमण्याचा प्रयत्न करत आहे.
याच वेळी चीनी मीडियाने देखील भारत आणि चीनमधील संबंधावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान चीनच्या चायना डेलीने, पंतप्रधान मोदींच्या भेटीला भारत आणि चीन संबंधांना गती देणारा नवी अध्याय म्हणून वर्णन केले आहे. तसेच टॅरिफवॉरदरम्यान जागतिक व्यापारात निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर भारताने एक धोरणात्मक मार्ग निवडणे आवश्यक असल्याचेही चीनी माध्यमांनी म्हटले आहे. शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने, पंतप्रधान मोदींच्या विधानाचा उल्लेख करत, भारत हा लहान व्यापारी, शेतकीर आणि पशुपालन करणाऱ्यांचे हित जपण्यासाठी कोणताही दबाव स्वीकारणार नाही, असे म्हटले आहे.
याच वेळी आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२५ च्या अखेरिस होणारा भारत दौरा रद्द केला असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. २०२५ मध्ये भारतात क्वाड समितीचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी ट्रम्पही उपस्थित राहणार होते, मात्र आता त्यांचा हा दौरा रद्द झाले असल्याचे सांगण्यात येते आहे. यामागचे कारण म्हणजे पंतप्रधान मोदींचा चीन दौरा आणि भारताची रशियाकडून तेल खरेदी आहे. तसेच भारताने भारत-पाक युद्धबंदीचे श्रेयही ट्रम्प यांना घेऊन दिले नाही, यामुळे ट्रम्प नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
सध्या अमेरिकेने भारतावर २५ टक्के कर आणि अतिरक्त २५ टक्के दंड लागू केला आहे. म्हणजेच एकूण ५० टक्के कर भारतावर लागू केला आहे. भारत रशियाला युक्रेनविरोधी युद्धात आर्थिक मदत करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केली आहे.