Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Midterm Elections :डेमोक्रॅट्सचा ऐतिहासिक विजय ट्रम्प यांच्या जिव्हारी;रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का पराभवाचे खापर इतरांवर फोडले

US Midterm Elections : अमेरिकेच्या २०२६ मधील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सनी प्रतिनिधीगृह आणि सिनेटवर नियंत्रण मिळवले. या ऐतिहासिक पराभवानंतर ट्रम्प यांनी निकाल स्वीकारला; मात्र आपण निवडणुकीत असतो तर पक्षाचा विजय झाला असता, असा दावा केला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 08, 2026 | 10:14 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • दोन्ही सभागृहांवर डेमोक्रॅट्सचे वर्चस्व
  • ट्रम्प यांनी पराभवाचे खापर इतरांवर फोडले
  • इराण युद्ध आणि महागाईचा निवडणुकीवर परिणाम
US Midterm Elections : अमेरिकेच्या २०२६ मधील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळवत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या निकालामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मतदारांनी ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात कौल दिल्याचे चित्र समोर आले असून, या पराभवामुळे अमेरिकेच्या राजकारणात नव्या संघर्षाला सुरुवात झाली आहे.

दोन्ही सभागृहांवर डेमोक्रॅट्सचे वर्चस्व

२०२६ च्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सनी प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये विजय मिळवला. विशेष म्हणजे, पारंपरिकपणे रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव असलेल्या काही राज्यांमध्येही डेमोक्रॅट्सनी मोठे यश मिळवले. कॅन्सस, दक्षिण कॅरोलिना आणि टेक्साससारख्या राज्यांतील निकालांनी राजकीय समीकरणे बदलली आहेत. या विजयामुळे डेमोक्रॅट्सना ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयांवर नियंत्रण ठेवण्याची आणि महत्त्वाच्या विधेयकांना अडवण्याची ताकद मिळणार आहे.

Yeman Breaking : येमेनमध्ये विस्थापनाचा कहर; ३ लाखांहून जास्त नागरिक बेघर, १.६५ लाख मुलांचे भविष्य अंधारात

ट्रम्प यांनी पराभवाचे खापर इतरांवर फोडले

निवडणुकीतील पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, आपण निवडणुकीच्या रिंगणात असतो तर रिपब्लिकन पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळवला असता, असा दावा केला. आपण उमेदवार नसल्यामुळे पक्षाचा पराभव झाला, असे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले.

मात्र, त्यांनी निवडणुकीचा निकाल स्वीकारण्याची तयारी दर्शवली आणि डेमोक्रॅट्सचे अभिनंदनही केले. दुसरीकडे, रिपब्लिकन पक्षातील काही समर्थकांनी या पराभवासाठी ट्रम्प यांच्या धोरणांना जबाबदार धरले आहे.

Sweden News : होलोकॉस्ट नाकारणे आता ठरणार गुन्हा; स्वीडनच्या संसदेत घटनादुरुस्ती मंजूर

इराण युद्ध आणि महागाईचा निवडणुकीवर परिणाम

या निवडणुकीत इराण युद्ध, वाढती महागाई, इंधनाचे दर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती हे महत्त्वाचे मुद्दे ठरले. युद्धामुळे अमेरिकेतील नागरिकांवर आर्थिक भार वाढल्याची भावना मतदारांमध्ये होती. ट्रम्प यांनीही इराण युद्धाचा रिपब्लिकन पक्षाच्या पराभवात काही प्रमाणात वाटा असल्याचे मान्य केले. मात्र, इराणविरोधात घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले.

डेमोक्रॅट्सच्या या विजयामुळे आता अमेरिकेतील सत्तासंतुलन बदलणार आहे. नव्या सभागृहात ट्रम्प प्रशासनाच्या कारभाराची चौकशी, आर्थिक निर्णयांवर नियंत्रण आणि महत्त्वाच्या धोरणांवर विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या उर्वरित कार्यकाळात व्हाइट हाऊस आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Us midterm elections 2026 democrats historic victory trump republicans defeat cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 10:14 PM

Topics:  

  • Marathi News
  • US election updates

संबंधित बातम्या

Israel News : इराणमधील मोहीम अजून संपलेली नाही, इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांचा इशारा; कारवाईसाठी इस्रायल सज्ज
1

Israel News : इराणमधील मोहीम अजून संपलेली नाही, इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांचा इशारा; कारवाईसाठी इस्रायल सज्ज

school bullying: शाळांमध्ये वाढतेय बुलिंगचे संकट! भारतातील ४२% मुले त्रस्त, मानसिक आरोग्यासाठी ‘हे’ मॉडेल फायद्याचे
2

school bullying: शाळांमध्ये वाढतेय बुलिंगचे संकट! भारतातील ४२% मुले त्रस्त, मानसिक आरोग्यासाठी ‘हे’ मॉडेल फायद्याचे

Satara News : पाच हजारांची अग्रिम मदत अंतिम नाही; पंचनाम्यानंतर निकषांनुसार पूर्ण मदत देणार – पालकमंत्री शंभूराज देसाई
3

Satara News : पाच हजारांची अग्रिम मदत अंतिम नाही; पंचनाम्यानंतर निकषांनुसार पूर्ण मदत देणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

Israel News :नेतान्याहूंच्या सत्तेला मोठे आव्हान; राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झॉग यांच्याकडून,आयझेनकोट यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण
4

Israel News :नेतान्याहूंच्या सत्तेला मोठे आव्हान; राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झॉग यांच्याकडून,आयझेनकोट यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.