US Plane Crash Two planes collide in midair in Arizona, two people dead
वॉशिंग्टन: अमेरिकेत विमान अपघातांच्या मालिकांचे सत्र सुरुच असून अमेरिकेच्या एरिझोन राज्यात 19 फेब्रुवारी रोजी स्थानिक वेळानेनुसार, दोन लाहन विमानंचा अपघात झाला. ही दोन लहान विमान एकमेकांना हवेतच धडकली. या भीषण अपघाता दोन जमांचा मृत्यू झाला असून राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्डाने टक्सन शहराच्या बाहेरील विमानतळावर घडलेल्या या घटनेची चौकशी सुरु केली आहे. हा अमेरिकेतील पाचवा अपघात आहे.
अमेरिकेत वाढत्या विमान अपघातांच्या घटना
गेल्या काही दिवासंमध्ये अमेरिकेत चार मोठ्या विमान अपघातांच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. नुकतेच एक डेल्टा जेट विमानसा टोरोंटो विमानतळावर लॅंडिगदरम्यान अपघात झाला. सुदैवाने यातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप बचावले. याशिवाय, अलास्कामध्येही एक विमान अपघात झाला होता. यापूर्वी वॉशिंग्टन डीसीच्या अमेरिकन एअरलाइन्सट्या प्रवासी विमानाला अमेरिक सैन्याच्या विमानाची धडक बसली होती, यात 67 जणांचा मृत्यूची नोंद झाली होती.
मेडिकल ट्रान्सपोर्ट जेट दुर्घटना
तसेच जानेवरी महिन्याच्या अखेरीस फिलोडेल्फियात एका मेडिकल ट्रान्सपोर्ट जेट विमानाचा देखील अपघात झाला होता. या दुर्घटनेत सातजण ठार तर 19 जण जखमी झाले होते. या जेटमध्ये एका रुग्णासोबत त्याची पत्नी व एक लाहान मूल देखील होते.
सध्या ताज्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्डाने (NTSB) आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेचा तरास सुरु केला आहे. अपघाताच्या वेळी खराब वातावरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. खराब हवामानामुळे अपघात झाला असल्याचा अंदाज बांधला जात आहे. सध्या तपास सुरु असून चौकशीतून हे स्पष्ट होईल की हा अपघात मानवी चुकीमुळे झाला की तांत्रिक बिघाडामुळे.
विमान उद्योग आणि सुरक्षा यंत्रमा चिंतेत
गेल्या काही महिन्यांत वारंवार विमान अपघात झाल्यामुळे अमेरिकेतील विमान उद्योग आणि सुरक्षा यंत्रणा चिंतेत आहेत. या घटनांमुळे विमान सुरक्षा नियम अधिक कठोर करण्यावर भर दिला जात आहे. उत्तर अमेरिका आणि जागतिक पातळीवर हवाई वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चर्चा वाढल्या आहेत. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी अधिक काटेकोर उपाययोजना करण्यात येत आहेत.
कॅनडातही विमान अपघात
तसेच काल कॅनडाच्या टोरंटो येथेही एका विमान अपघाताची घटना घडली आहे. टोरंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेल्टा एअरलाइन्सचे विमान क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 17 लोक जखमी झाले असून त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. या विमानाने मिनियापोलिसहून टोरंटोला प्रवास केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात एकूण 76 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते.