
Bangladesh Violence
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,नवनी वर्षाच्या पूर्वसंध्येला शरीयतपूर येथे एका खोकन दास नावाच्या हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. कट्टरपंथी जमावाने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करत त्याला जिवंत जाळले असल्याचे वृत्त मिळाले आहे. या आणखी एका हिंदूच्या हत्येने जगभरात खळबळ उडाली आहे. सध्या बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरु आहे. ही हिंदू तरुणाच्या हत्येची चौथी घटना आहे. यापूर्वी २४ डिसेंबर २०२५ रोजी कालीमोह युनियन येथे हुसेनडांगा भागात कट्टरपंथी जमावाने अमृत मंडलची हत्या केली होती. तसेच मैमनसिंग येथे देखील दिपू चंद्र दास यांची १८ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. याशिवाय ४२ वर्षीय बजेंद्र बिस्वासची देखील निघृणपणे हत्या करण्यात आली होती.
हिंदूंवरील अत्याचाराबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. भारतासह ब्रिटनमध्ये बांगलादेश हाय कमिशन बाहेर बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराविरोधीत तीव्र आंदोलने करण्यात आली आहे. बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराबाबत कारवाईची तीव्र मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जात आहे.
बांगलादेशातील या अस्थिरतेमुळे येत्या १२ फ्रेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकांवर बाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. येत्या काळाता निवडुणाक होणार का नाही? झाल्या तर त्या निष्पक्ष आणि शांततेत पार पडतील का असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. शिवाय या सर्व घडामोडींवर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) सरकारने मौन पाळले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकार संघटना आणि जगभरातील देशांकडून या हिंसाचाराला तीव्र विरोध केला जात आहे.