US President Donald Trump imposes 25% tariff on all steel, aluminium imports in latest trade escalation
वॉशिंग्टन: सध्या राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या मुद्द्यावरुन सतत चर्चेचा विषय बनत आहेत. कॅनडा, मेक्सिको आणि चीनवरील केले तात्पुरता स्थगित केला असला तरी तो पुन्हा लादण्याची शक्यता आहे. तसेच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टील आणि ॲल्युमिनियमवर 25% कर लागू करण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या हा निर्णय व्यापार धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या धोरणाचा उद्देश उमेरिकन उद्योगांचे संरक्षण करणे आणि स्थानिक लोकांसाठी रोजगार वाढवणे आहे.
कर लादण्यामागील कारणे
डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार, हे टॅरिफ कॅनडा आणि मेक्सिकोसारख्या देशांवर दबाव आणण्यासाठी लावण्यात आले आहे. या देशांमदून अमली पदार्थांची तस्करी आणि अवैध स्थलांतरला रोख लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ट्रम्पने असाही दावा केला आहे की, अमेरिकन उत्पादनांना देखील इतर देशांकडून देखील समान प्रकारचे टॅरिफ लावले जाते, यामुळे त्यांनी प्रत्युत्तरात तितकेच टॅरिफ लादले असून अमेरिकन उद्योगांचे हित साधले आहे.
हे देश अमेरिकत स्टील आणि ॲल्युमिनियम आयात करतात
सरकारी आकडेवारीनुसार, कॅनडा हा अमेरिकचा सर्वात मोठी स्टील पुरवठादार आहे. यानंतर ब्राझील आणि मेक्सिको दुसऱ्या स्थानावर येतात. तसेच, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम देखील अमेरिकेचे महत्त्वाचे पुरवठादार आहेत. सर्वात जास्त ॲल्युमिनियम देखील कॅनडातून अमेरिकेत निर्यात केले जाते. 2024 च्या पहिल्या अकरा महिन्यांत अमेरिकेच्या एकूण आयतींपैकी 79% पुरवठा कॅनडाने केला होता.
व्यापर युद्धाचा धोका
डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडाच्या आयातीवर 25% कर तसेच चीनच्या उत्पादनांवर 10% कर लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. व्यापार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे 2.1 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त वार्षिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोला काही कालाची सवलत दिली असली तरी यामुळे भविष्यात नवीन व्यापार युद्धाचा धोका वाढला आहे.
अमेरिकन अर्थव्यवस्थेवर परिणाम?
टॅरिफच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील उद्योगांना काही प्रमाणात फायदा होईल. यामुळे स्थानिक उत्पादकांना अधिक संधी उपलब्ध होतील. परंतु, व्यापर तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिकन कंपन्यांसाठी महागाडा ठरु शकतो. यामुळे उत्पादन खर्च वाढेल आमि याचा परिणाम ग्राहकांवर होईल. मात्र, ट्रम्प यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, यामुळे अमेरिकन उद्योगाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होती.