चीनला मोठा धक्का! महत्त्वाच्या सिचुआन प्रांतात भूस्खलन, ३०हून अधिक नागरिक बेपत्ता (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बिजिंग: चीनमध्ये एक मोठी दुर्घटा घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या दक्षिण-पश्चिम भागातील सिचुआन प्रांतात शनिवारी (8 फेब्रुवारी) भूस्खलन (Landslide) झाले. यामुळे संपूर्ण चीन हादरला आहे. या दुर्घटनेत सुमारे 10 घरे उद्ध्वस्त झाली असून 30 लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन-पिंग यांनी प्रशासनाला शोध आणि बचाव कार्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान ली कियांग यांनी देखील संभाव्य धोके तपासण्याचे निर्देश दिले आहेत. सिचुआन प्रांत चीनसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
चीनसाठी का महत्त्वाचे आहे सिचुआन?
सिचुआन प्रांत हा चीनच्या दक्षिण-पश्चिम, उत्तर-पश्चिम आणि मध्य भागांना जोडणार एक महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. हा प्रांत दक्षिण, मध्य आणि आग्नेय आशियाशी संपर्क साधण्याचा महत्त्वाचा आणि मुख्या दुवा आहे. सिचुआन प्रातांची राजधानी चेंगदू(Chengdu) ही शैक्षणिक आणि औद्यागिक क्रेंद्र आहे. या ठिकाणी 70 पेक्षा जास्त विद्यापीठे आणि अनेक उच्च-तंत्रज्ञान विकास क्षेत्रे आहेत.
IT कंपन्यांचे हब
याशिवाय, सिचुआन प्रांतात अनेक आंतरराष्ट्रीय IT कंपन्या, तसेच संशोधन आणि विकास केंद्रे आहेत, मायक्रोसॉफ्ट, सिस्को, इंटेल आयबीएम आणि मोटोरोला यासारख्या कंपन्या या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. तसेच चीनच्या या भागात स्टील उत्पादक, मद्य उत्पादक, पशुखाद्य उत्पादक औषध निर्मिती यांसारखे खाजगी उद्योग कंपन्या झपाट्याने वाढत आहेत. या भागात मोठ्या संख्येन स्थानिक उद्योग आणि ब्रॅंड विकसित झाल्याने हा भाग चीनसाठी अत्यंत महत्त्वाचा बनत चालला आहे.
नैसर्गिक संपत्ती आणि वारसा स्थळे
चीनचा सिचुआन प्रांत नैसर्गिक सांधनसपत्तीने समृद्ध असून येथे 43 प्रकारची खनिजे आढळतात. यामध्ये 11 खनिजांचे साठे चीनमध्ये मोठ्या पहिल्या स्थानी आहेत. यामध्ये टायटॅनियम आणि नॅचरल गॅससाठी हा भाग प्रसिद्ध आहे. या प्रांतात चीनचे पाच वारसा स्थळे आहे. यामध्ये पांडा राखीव क्षेत्र आणि लेशान बुद्धाचा पुतळा यांचा समावेश आहे. याशिवाय सिचुआन चीनच्या प्रमुख कृषी उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. या ठिकाणी तांदूळ, गहू, संत्री, ऊस आणि शकरकंदीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. पोर्क उत्पादनासाठीही हा प्रांत ओळखला जातो.
सिचुआनमध्ये भूस्खलन (Landslide) का होते?
चीनचा सिचुआने प्रांत उंच पठार आणि खालच्या यांगत्से मैदानाच्या दरम्यान स्थित असल्याने येथील भौगोलिक स्थितीमुळे वारंवार भूस्खलन होते. या ठिकाणी पर्वत, डोंगराळ भाग, सपाच प्रदेश आणि पठारी प्रदेश एकत्र दिसतात. यामुळे या भागांत लॅंडस्लाइड मोठ्या प्रमाणात होते.
याशिवाय, जोरदार पाऊस आणि हवामान बदलामुळे पावसाची वाढती तीव्रता यामुळे भूगर्भीय हालचालींमध्ये वाढ होत आहे. यामुळे हा भाग भूकंप आणि भूस्खलनासाठी अतिसंवेदनशील मानला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मेक्सिकोत बस आणि ट्रकचा भीषण अपघात; आगीत 41 जणांचा होरपळून मृत्यू