Elon Musk चा अमेरिकन पेमेंट सिस्टिमवर फसवणूकीचा आरोप; काय आहे नेमकं प्रकरण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आणि एलॉन मस्क यांची मैत्री अलीकडे खूपच चर्चेत आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष पदाची शपथ घेताच ट्रम्प प्रशासनात एलॉन मस्क यांची नियुक्ती केली. सध्या एलॉन मस्क सरकारी कार्यक्षम विभागाचे(DOGE) प्रमुख म्हणून ट्रम्प प्रशासनात कार्यरत आहेत. दरम्यान टेस्ला चे सीईओ आणि स्पेसएक्सचे मालक एलॉनस मस्क यांनी अमेरिकेच्या पेमेंट सिस्टिमवर आक्षेप घेत फसवणूकीचा आरोप केल आहे.
एलॉन मस्क यांनी दावा केला आहे की, सरकारी पेमेंट सिस्टिमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ असून दरवर्षी 100 अब्ज डॉलर्सच्या चोरीचा आरोप त्यांनी सरकारी सिस्टिमवर लावला आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मस्क यांनी वित्त विभाग आणि सरकारी कार्यक्षमता विभागाने सरकारी देयकांवर देखरेख ठेवण्यासाठी नियमावली तयार केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मेक्सिकोत बस आणि ट्रकचा भीषण अपघात; आगीत 41 जणांचा होरपळून मृत्यू
To be clear, what the @DOGE team and @USTreasury have jointly agreed makes sense is the following:
– Require that all outgoing government payments have a payment categorization code, which is necessary in order to pass financial audits. This is frequently left blank, making…
— Elon Musk (@elonmusk) February 8, 2025
आतापासून या नवीन नियमांनुसार, सर्व कामे केली जाती. या नियमांनुसार देयकांवर देखरेख ठेवण्यात येईल. यामुळे देयकांचे ऑडिट करणे सोपे जाईल असे मस्क यांनी म्हटले आहे. तसेच पेमेंट वर्गीकरण कोड तयार केला असून यामुळे DOGE आणी वित्त विभागावर पाळत ठेवता येईल असे म्हटले आहे.
मस्क यांनी ट्रम्पचे लक्ष वेधले
एलॉन मस्क यांनी सांगितले की, यापूर्वी सरकारी पेमेंट करताना कोणताही कोड नव्हता यामुळे ऑडिट करणे कठीण जात होता. तसेच आता कोणतीही सरकारी मालमत्ता वापरताना किंवा पेमेंट करताना कारण द्यावे लागणार आहे. तसेच मस्क यांनी ट्रम्पचे लक्ष वेधत आपल्या पोस्टमध्ये फसव्या संस्था आणि संशयास्पद संस्थांचा देखील उल्लेख केला आहे. मस्क यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित अपडेट करण्यासाठी सुरुवात केली असून यासाठी वेळ लागू शकतो.
मस्क यांनी असाही दावा केला आहे की, दरवर्षी अमेरिकेच्या सराकर देयकांमध्ये 100 अब्ज डॉलर्सची फसवणूक झाली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे संशयास्पद आहे की, 100 अब्ज डॉलर्स अशा लोकांना देण्यात आले आहेत ज्यांच्यागकडे कोणताही सिक्युरिटी कोड नाही. तर वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता दर आठवड्याला 1 अरब डॉलरची फसवणूक झाली आहे.