Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी घडामोड; डोनाल्ड ट्रम्प लवकरच येणार भारत दौऱ्यावर; म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींसोबत…’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. त्यानंतर आता त्यांनी लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याचे म्हटले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 07, 2025 | 07:24 AM
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता लवकरच येणार भारत दौऱ्यावर; म्हणाले, 'पंतप्रधान मोदींसोबत...'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता लवकरच येणार भारत दौऱ्यावर; म्हणाले, 'पंतप्रधान मोदींसोबत...'

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : जागतिक पातळीवर अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांतील संबंध सुधारताना दिसत आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. त्यानंतर आता त्यांनी लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याचे म्हटले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा खूप चांगली सुरू आहे आणि लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे’, असे त्यांनी सांगितले.

पत्रकारांच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, “आमच्यात चर्चा खूप चांगली सुरू आहे. त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले आहे. मोदी माझे मित्र आहेत, आम्ही बोलत राहतो आणि त्यांनी मला भारताला भेट देण्याचे आमंत्रण दिले आहे. आम्ही एक तारीख निश्चित करू… पंतप्रधान मोदी एक महान माणूस आहेत आणि मी भारताला भेट देईन.”

हेदेखील वाचा : Explainer : ट्रम्पच्या धमक्यांना नाही बधले ममदानी! न्यूयॉर्कच्या ख्रिश्चन लोकसंख्येमध्ये खाऊन गेले भाव, कसे?

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरील वाटाघाटी अजूनही सुरू आहेत. ट्रम्प म्हणाले की, काही व्यापार मुद्द्यांवर मतभेद आहेत, परंतु त्यांची टीम त्यावर काम करत आहे.

भारत-अमेरिका व्यापार चर्चा सुरू

दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा गेल्या काही काळापासून सुरू असताना, अमेरिकेला भारताने आपली बाजारपेठा आणखी खुली करण्याचा विचार करावा असे वाटते, तर भारताला कृषी आणि तंत्रज्ञानात अमेरिकेकडून सवलती मिळण्याची आशा आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अनेक व्यापार करारांवरही चर्चा झाली होती, परंतु काही मतभेदांमुळे ते अपूर्ण राहिले.

भारत-रशिया तेल व्यापारावर ट्रम्प यांचा दावा

ट्रम्प यांनी अलीकडेच भारत-रशिया तेल व्यापाराबाबत विधान केले. भारत आता रशियासोबत तेल व्यापार मर्यादित करेल. गेल्या महिन्यापासून ट्रम्प यांनी या मुद्द्यावर अनेक दावे केले आहेत. यापूर्वी, त्यांच्या भाषणात ट्रम्प यांनी भारतासोबत लवकर व्यापार करार करण्याचे संकेत दिले होते. भारत आणि अमेरिका लवकरच व्यापार करारावर स्वाक्षरी करतील.

मोदी-ट्रम्प यांच्यात चांगले संबंध

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात खूप काळापासून चांगले संबंध आहेत. ट्रम्प २०२० मध्ये भारताला भेट देऊन गेले होते, जिथे दोन्ही नेत्यांनी अहमदाबादमध्ये झालेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात एकमेकांचे कौतुक केले होते. आता, ट्रम्प यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा भारत-अमेरिका संबंधांबद्दल एक नवीन मुद्दा चर्चेला ठरला आहे.

Web Title: Us president donald trump will soon visit india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 07:15 AM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • narendra modi

संबंधित बातम्या

हाफिज सईदच्या कार्यालयात पाकिस्तान मंत्र्याची हजेरी! दहशतवाद्यांशी संबंधांवरून पाक सरकार पुन्हा एकदा उघडं
1

हाफिज सईदच्या कार्यालयात पाकिस्तान मंत्र्याची हजेरी! दहशतवाद्यांशी संबंधांवरून पाक सरकार पुन्हा एकदा उघडं

Narendra Modi : “जेव्हा निकाल येईल, तेव्हा एकमेकांचे झिंझ्या उपटतील…”, बिहार मतदानावरून पंतप्रधान मोदींचा महाआघाडीवर हल्लाबोल
2

Narendra Modi : “जेव्हा निकाल येईल, तेव्हा एकमेकांचे झिंझ्या उपटतील…”, बिहार मतदानावरून पंतप्रधान मोदींचा महाआघाडीवर हल्लाबोल

Explainer : ट्रम्पच्या धमक्यांना नाही बधले ममदानी! न्यूयॉर्कच्या ख्रिश्चन लोकसंख्येमध्ये खाऊन गेले भाव, कसे?
3

Explainer : ट्रम्पच्या धमक्यांना नाही बधले ममदानी! न्यूयॉर्कच्या ख्रिश्चन लोकसंख्येमध्ये खाऊन गेले भाव, कसे?

SC on Donald Trump Tariff : जगाला वेठीस धरणाऱ्या ट्रम्पला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! द्यावा लागणार इतक्या कोटींचा रिफंड?
4

SC on Donald Trump Tariff : जगाला वेठीस धरणाऱ्या ट्रम्पला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! द्यावा लागणार इतक्या कोटींचा रिफंड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.