Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump News : ‘या’ देशांकडून गुपचूप….; डोनाल्ड ट्रम्प यांच्या खळबळजनक दाव्याने वाढणार भारताची धडधड

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळजनक दावा केला आहे. उत्तर कोरिया, रशियासोबतच आता पाकिस्तान-चीनसुद्धा गुपचूप अण्वस्त्र चाचण्या करत असल्याचा गंभीर खुलासा केला असून भारतासाठी ही धोक्याची घंटा असू शकते.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 04, 2025 | 11:02 AM
us president donald trump

us president donald trump

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
  • पाकिस्तान आणि चीनकडून गुपचूप अण्वस्त्र चाचण्या
  • पाकिस्तानकडून भूमीगत चाचण्या सुरु असल्याचा खुलासा

Donald Trump News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळजनक दावा केला आहे. उत्तर कोरिया, रशियासोबतच आता पाकिस्तान-चीनसुद्धा गुपचूप अण्वस्त्र चाचण्या करत असल्याचा गंभीर खुलासा ट्रम्प यांनी केला ही बाब भारतासाठी धोक्याची घंटा असू शकते.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. ३३ वर्षांनंतर अमेरिका अण्वस्त्र चाचणी करत असून खुद्द ट्रम्प यांनी तसे आदेश दिले आहेत. या मागची भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी मीडियासमोर मांडली. यावेळी पाकिस्तान आणि चीन दोघेही गुपचूप अण्वस्त्र चाचण्या करत असल्याचा धक्कादायक खुलासा ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांनी अण्वस्त्र चाचण्या संबंधित केलेला हा खुलासा भारतासाठी चिंताजनक असून, भारताच्या शेजारील दोन्ही देश अण्वस्त्र चाचण्या करत असल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा : Who is Rob Jetten: कोण आहे नेदरलॅंडचे रॉब जेटन ? जे बनू शकतात जगातील पहिले समलिंगी पंतप्रधान…

रशिया-चीन दोन्ही देश अण्वस्त्र चाचण्या करत असूनही याबद्दल उघडपणे बोलत नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटले आहे. पाकिस्तानवरही गंभीर आरोप करत अमेरिकेच्या अध्यक्षांनी पाकिस्तानकडून भूमीगत चाचण्या सुरु असल्याने त्यांचा शोध घेता येत नसल्याचे सांगितले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सनसनाटी दाव्याने जगभरात खळबळ माजली असून भारतासाठी ही धोक्याची घंटा असू शकते.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान युद्ध झाले होते. त्याची तीव्रता इतकी होती कि अण्वस्त्र युद्ध होऊ शकले असते. मात्र, त्यांच्या मध्यस्थीने युद्ध टाळल्याचा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये मे महिन्यात युद्ध झाले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायला लागल्यावर संघर्ष अगदी अण्वस्त्रापर्यंत पोहोचला होता. परंतु, मी त्यांना टॅरिफ आणि व्यपाराच्या धमक्या देऊन दोन्ही देशातील युद्ध नियंत्रणात आणले. त्यामुळे लाखो लोकांचे प्राण अमेरिकेच्या हस्तक्षेपाने वाचले. अमेरिका ‘तुम्ही जर युद्ध थांबवलं नाही. तर, कोणताही करार करणार नाही’ असा इशारा दोन्ही देशांना दिल्यानंतर त्यांच्यातील युद्ध थांबले.’ असे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

हेही वाचा : Donald Trump News: ‘आमच्याकडे इतके अणुबॉम्ब की १५० वेळा जग नष्ट होईल’; डोनाल्ड ट्रम्पचा धक्कादायक दावा

यापूर्वी भारतानं १९९८ साली अण्वस्त्र चाचणी पोखरणमध्ये केली होती. पाकिस्तान-चीन दोन्ही देश गुप्तपणे अण्वस्त्र चाचण्या करत असल्याच्या खुलासाने भारतासाठी ही बाब चिंताजनक आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे भारताला पोखरण -3 ची संधी उपलब्ध होऊ शकते.

Web Title: Us president donald trumps sensational claim that along with north korea and russia pakistan and china are now also secretly conducting nuclear weapons tests

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 11:02 AM

Topics:  

  • China
  • Donald Trump
  • North Korea
  • pakistan
  • Russia
  • US President

संबंधित बातम्या

New York Mayor Election:  जोहरान ममदानी महापौर झाले तर…; निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची न्यू यॉर्कला धमकी
1

New York Mayor Election: जोहरान ममदानी महापौर झाले तर…; निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची न्यू यॉर्कला धमकी

Explainer: एका मोठ्या अणुयुद्धाकडे जगाची वाटचाल..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक घोषणेचा असाही परिणाम?
2

Explainer: एका मोठ्या अणुयुद्धाकडे जगाची वाटचाल..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक घोषणेचा असाही परिणाम?

Donald Trump News: ‘आमच्याकडे इतके अणुबॉम्ब की १५० वेळा जग नष्ट होईल’; डोनाल्ड ट्रम्पचा धक्कादायक दावा
3

Donald Trump News: ‘आमच्याकडे इतके अणुबॉम्ब की १५० वेळा जग नष्ट होईल’; डोनाल्ड ट्रम्पचा धक्कादायक दावा

Rare Earth Magnet: सरकारने केली व्यवस्था, रू. 70000000000 च्या संंजीवनीमुळे चीनचा दबदबा होणार कमी, काय आहे तयारी
4

Rare Earth Magnet: सरकारने केली व्यवस्था, रू. 70000000000 च्या संंजीवनीमुळे चीनचा दबदबा होणार कमी, काय आहे तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.