'ओलिसांची सुटका न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल'; डोनाल्ड ट्रम्प यांचा हमासला इशारा
वॉश्गिंटन: इस्त्रायल-हमास युद्ध अधिकच तीव्र झाले होते. या युद्धादरम्यान हमासने अनेक इस्त्रायली लोकांना ओलिस ठेवण्यात आले. ओलिसींच्या सुटकेसाठी इस्त्रायलकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे व्यक्तव्य करत हमासला खुली धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅलेस्टिनी गट हमासला म्हटले आहे की, इस्त्रायली ओलिसींची सुटका केली नाही तर मध्य पुर्वेत ते विध्वंस घडवून आणतील. त्यांनी 20 जानेवारी 2025 पूर्वी ओलिसांची सुटका करण्यास हमासला सांगितले आहे.
ट्रम्प यांचा हमासला निषेध
ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,मानतेवर अत्याचार केलेल्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. तसेच इस्त्रायली नागरिकांना ओलिस ठेवून हमासने हिंसक आणि अमानवीय वर्तन केल्याचेम्हटले आहे. ट्रम्प यांनी हमासच्या या प्रकरणावर टिका करत दावा केला आहे की, ओलिसांना अतिशय हिंसक, अमानुषपणे हमासने लोकांना ओलिस ठेवले आहे. मात्र अद्याप हमासवर कोणतीही कारवाई झाली नाही.
ओलिसांची सुटका न केल्या मोठी कारवाई
ट्रम्प यांनी सोशल मीडिया संदेशातून इस्रायली नागरिकांवर झालेल्या अत्याचाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या परिस्थितीत ओलीसांची तात्काळ सुटका करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रकरणावर मागील चर्चा निष्फळ ठरल्याची टीका करत, आता निर्णायक पाऊल उचलण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
ओलिसांची सुटका न झाल्यास ट्रम्प यांनी अमेरिकेकडून कडक करावाई केली जाईल, ज्याची हमासने कल्पना देखील केली नसेल असे स्पष्ट शब्दात ट्रम्प सांगितले आहे.अमेरिकेच्या इतिहासातील ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी असेल, असा दावा करत, त्यांनी या संकटाबाबत तातडीची आणि ठोस भूमिका घेतली आहे.
इस्त्रायलवर हमासचा मोठा हल्ला
हमासने 7 ऑक्टोबर 2024 रोजी इस्रायलवर मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये 1,200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच हमासने 250 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले. इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून गाझामधील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केले. यामुळे 45,000 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला.
अजूनही शेकडो लोक ओलीस आहेत. त्यांचे प्राण वाचवणे मोठे आव्हान ठरत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेची धोरणे कोणत्या दिशेने जातील, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.