फोटो सौैजन्य: सोशल मीडिया
सना: एकीकडे इस्त्रायल-हमास, इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्ध सुरू आहे. इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्धविराम झाल्यानंतर इस्त्रायल या विरामाचे उल्लंघन केले. यामुळे इस्त्रायल हिजबुल्लह युद्ध अधिकच तीव्र झाले आहे. दरम्यान, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणचा पाठिंबा असणाऱ्या येमेनमधील हुथी बंडखोरांनी दावा केला आहे की, त्यांनी इस्त्रायलवर हायपरसॉनिक मिसाइल्स डागले आहेत. मात्र इस्त्रायलने हे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे.
इस्त्रायलवर हल्ले केल्याचा हुथी बंडकोरांचा दावा
हुथी बंडखोरांनी म्हटले आहे की, त्यांनी इस्त्रायलवर केलेला हायपरसॉनिक मिसाइल हल्ला इस्रायलच्या मध्यभागी असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणांवर करण्यात आला आहे, मात्र, इस्रायलच्या लष्कराने हा दावा फेटाळून लावला असून, येमेनमधून डागलेले क्षेपणास्त्र त्यांच्या सीमेबाहेरच नष्ट केल्याचे म्हटले आहे.
2023 पासून हुथी बंडखोर गाझामधील हमास लढाऊ सैनिकांना पाठिंबा देत आहेत. त्यांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, त्यांनी लाल समुद्रातील जहाजांची हालचालही विस्कळीत केली आहे. दुसरीकडे, गाझामधील इस्रायली हवाई हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.
फोटो सौैजन्य: सोशल मीडिया
मानतावादी वितरण थांबवण्याचा संयुक्त राष्ट्र संघटनेचा निर्णय
दरम्यान, गाझामध्ये वाढत्या तणावामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेने मानतावादी वितरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मानतावदी साहित्याच्या लुटीच्या घटनांमुळे हा निर्णय घेतला गेला असून, पॅलेस्टिनींसाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. अमेरिकन-इस्रायली ओलिसांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये ओलिसांनी अमेरिकेच्या निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या सुटकेसाठी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हा व्हिडिओ हमासचा “मनोवैज्ञानिक युद्ध” म्हणून वर्णन केला असून याचा उद्देश ओलिसांच्या कुटुंबांचे लक्ष विचलित करणे आहे.
इस्रायलचे सीरियातील परिस्थितीवरही लक्ष
तर दुसरीकडे, इस्रायली लष्कराने दक्षिण लेबनॉनमधील यारून गावावर हवाई हल्ला केला आहे. हिजबुल्लाह किंवा इस्रायली लष्कराने या हल्ल्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. याशिवाय, इस्रायलने सीरियातील परिस्थितीवरही लक्ष केंद्रित केले असून, आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे. सीरियामध्येही संघर्ष तीव्र झाला आहे. अलेप्पो शहरात बंडखोर गट सक्रिय असून, रशियन सैन्याला बॉम्बहल्ले करावे लागत आहेत. बशर अल-असद यांच्या प्रशासनाला या बंडखोरांनी मोठे आव्हान दिले आहे.