US Senator Mike Lee talks of ban on H-1B Visa amid tariffs
US H1B Visa News in marathi : वॉशिंग्टन : अमेरिका एकामागून एक झटके जगाला देत आहेत. आता H1B व्हिसा धारकांसाठी एक मोठी बातमी आहे. H1B व्हिसा बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर माइक ली यांनी याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टला उत्तर दिले, यावेळी त्यांनी प्रश्न केला की आता H1B व्हिसा बंद करण्याची वेळ आली आहे?
सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये एक धक्कादायक दावा करण्यात आला होता. यामध्ये भारतीय H1B कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी वॉलमार्टच्या एका अधिकाऱ्याला लाच देण्यात आले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावर माइक ली यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावर त्यांनी आपल्या अकाऊंटवर आता H1B व्हिसा बंद करण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न केला आहे. यापूर्वी अमेरिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी यावर आवाज उठवला आहे. आता माइक ली यांच्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
चीनवर मेहरबान होत आहेत ट्रम्प? भारतावर कराचा बोजा, बीजिंगच्या विद्यार्थ्यांना व्हिसा सवलत
गेल्या काही काळापासून H1B व्हिसावरुन अमेरिकेच्या राजकारणात वाद सुरु आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी देखील याला विरोध केला आहे.मोठ्या अमेरिकन टेक कंपन्या देशातील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत आहेत. याऐवजी H1B व्हिसा धारकांना प्राधान्य देत असून हे अन्याकारक असल्याचे व्हान्स यांनी म्हटले आहे. हे अमेरिका फर्स्ट धोरणाविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याच वेळी USCIS च्या संचालक जोसेफ एडला यांनी देखील याला विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, H1B व्हिसा अमेरिकन अर्थव्यवस्थेला आणि नागरिकांसाठी असला पाहिजे, त्यांच्या जागा घेण्यासाठी नाही. परंतु H1B व्हिसा धारक अमेरिकेत येऊन त्यांचे हक्क काढून घेत आहेत. यामुळे अमेरिकेचे ट्रम्प प्रशासन H1B व्हिसा प्रणाली बंद करण्याच्या मार्गावर आहेत. आता केवळ जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
Is it time to pause H1-B visas? https://t.co/RiBrcWeD6f
— Mike Lee (@BasedMikeLee) August 25, 2025
काय आहे H1B व्हिसा ?
H1B व्हिसा हा परदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकच्या विशिष्ट कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचा, अमेरिकेत व्यवसायांमध्ये संधी देतो. तीन वर्षांसाठी हा व्हिसा दिला जातो. सहा वर्षांपर्यंत वाढवण्याची यामध्ये सवलत असते.
भारतावर होणार परिणाम?
याचा सर्वाधिक परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे. कारण H1B व्हिसा धारकांमध्ये भारतीयांचा मोठा वाटा आहे. यामध्ये आयटी-तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. यामुळे या व्हिसावर बंदी झाल्यास किंवा नियम कड झाल्यास भारतीय व्यावसायिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
H-1B व्हिसा धारकांना मोठा धक्का; अमेरिकेने केला ‘हा’ मोठा बदल, जाणून घ्या काय होणार परिणाम?