H-1B व्हिसा धारकांना मोठा धक्का; अमेरिकेने केला 'हा' मोठा बदल, जाणून घ्या काय होणार परिणाम? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : H-1B व्हिसा धारकांसाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे. अमेरिकेने पुन्हा एकदा आपल्या इमिग्रेशन धोरणात काही बदल केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी “वन बिग ब्युटीफुल बिल” विधेयकावर स्वाक्षरी केली. यामुळे इमिग्रेशन धोरणांत काही बदल झाले आहेत. यामुळे याचा व्हिसा धारकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
या नवीन विधेयकानुसार, आता H-1B व्हिसा अर्जदारांना आता २५० अमेरिकन डॉलर्स इंटिग्रिटी फी भरावी लागमार आहे. ही फी एक प्रकराची सुरक्षा ठेव रक्कम आहे. व्हिसाच्या अटी पूर्ण केल्यानंतर ही फी परत केली जाणार आहे. तसेच महागाईनुसार, दरवर्षी H-1B व्हिसा अर्जाच्या शुल्कात वाढ केली जाणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यंनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या स्थलांतरितांवर कडक कारवाईसाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास संबंधित व्यक्तीला शिक्षा दिली जाणार आहे. तसेच या नवीन विधेयकानुसार, व्हिसा वेव्हर प्रोग्रामच्या प्रवाशांसाठी देखील बदल करण्यात आले आहेत.
अमेरिकेच्या नव्या इमिग्रेशन धोरणानुसार ही फी कोणत्याही परिस्थितीत माफ केली जाणार नाही. सध्या ट्रम्प यांच्या या नवीन विधेयकावरुन अमेरिकेत ट्रम्प आणि मस्क यांच्यातही वाद सुरु आहे. मस्क यांनी वन बिग ब्युटीफुल या विधेयकाला विरोध केला आहे. तसेच नवीन पक्ष स्थापन करण्याची देखील घोषणा केली आहे. याशिवाय ट्रम्प यांच्या बेकायदेशीर धोरणांवरही जगभरातून टीका केली जात आहे.