चीनवर मेहरबान होत आहेत ट्रम्प? भारतावर कराचा बोजा, बीजिंगच्या विद्यार्थ्यांना व्हिसा सवलत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत चर्चेत राहत आहे. सध्या त्यांच्या टॅरिफच्या निर्णयाने त्यांनी संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. टॅरिफचा शस्त्र म्हणून वापर करत त्यांचे न ऐकणाऱ्या देशांवर बॉम्ब टाकत आहे. नुकतेच ट्रम्प यांनी मित्र देश भारतावरही ५०% टॅरिफ लागू केले आहे. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रशियाकडून तेल खरेदीच्या भारताच्या निर्णयामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचा आणखी एक आश्चर्यकारक निर्णय म्हणजे चीनला यातून त्यांनी सूट दिली आहे.
चीनसारख्या शत्रू देशावर ट्रम्प आता अधिकच मेहरबान झाले आहेत. सोमवारी (२५ ऑगस्ट) मध्यरात्री अचानक ट्रम्प यांनी भारतावर कर लादण्याच्या अधिकृत निर्णयावर स्वाक्षरी केली. यावेळी त्यांनी चीन संदर्भात आणखी एक घोषणा केली. चीनशी संबंध हळूहळू सुधारत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी चीनच्या विद्यार्थ्यांना अमेरिकन विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची परवानगी दिली आहे. त्यांच्या या निर्णयाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
भारताला अमेरिकेचा आर्थिक झटका; २५% अतिरिक्त कराची अधिसूचना जारी
व्हाइट हाउच्या प्रेस कॉन्फरन्सवेळी त्यांनी अमेरिका आणि भारताचे संबंध मजबूत असल्याचे म्हटले. तसेच या निर्णयाची घोषणाही केली पंरतु ट्रम्प यांच्या निर्णयावर त्यांच्या समर्थकांकडून विरोध केला जात आहे. खरे तर ट्रम्प अमेरिका फर्स्ट आणि मेक द अमेरिका ग्रेट अगेन या धोरणाचे समर्थक आहे.
त्यांनी त्यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या सुरुवातीपासूनच यावर लक्ष्य केंद्रित केले आहे. परंतु चीनला करात सूट देऊन आणि विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षणाची परवानगी देऊन त्यांनी या धोरणाला बाजूले केले आहे. यामुळे त्यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच लोकांनी याविरोधात आवाजही उठवला आहे.
परंतु ट्रम्प यांनी सांगितले आहे की, यावेळी चीनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या धोरणात काही कठोर नियम होते. यापूर्वी अमेरिकेत कोणत्याही चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित व्यक्तीला प्रवेश बंद होता परंतु ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी आम्ही चीनी विद्यार्थ्यांना अमेरिकेत येऊ देऊ असे म्हटले. हे अमेरिका आणि चीन संबंधासाठी खूप महत्वाचे असल्याचे म्हटले.
परंतु ट्रम्प यांनी चीनला इशाराही दिला आहे की, जर अमेरिकेला दुर्मिळ मॅग्नेट सप्लाय केले नाही, तर त्यांच्यावर २०० टक्के कर आकारला जाईल. पण त्यांनी असेही म्हटले आहे की, दोन्ही देशातील व्यापार तणावाचा परिणाम ते विद्यार्थांवर होऊ देणार नाहीत.
ट्रम्प यांच्या या विधानामुळे त्यांच्या कट्टर समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावर तीव्र विरोध केला जात आहे. अमेरिका फर्स्ट धोरणाला हा धोका असल्याचे म्हटले आहे. याच वेळी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सांगितले की, अमेरिकेचे परराष्ट्र विभाग गृह सुरक्षा विभाग चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित किंवा महत्त्वाच्या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाच्या व्हिसा काटेकोरपणे रद्द करण्यासाठी प्रयत्न करतील.
पाकिस्तानला मोठा धक्का! तालिबानी परराष्ट्र मंत्री भारतात येणार? असीम मुनीर चिंतेत