US takes major action against 'TRF', China also supports rises tension in Pakistan,
बिजिंग : पाकिस्तानच्या द रेझिस्टंट फ्रंड (TRF) या दहशतवादी संघटनेला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून अमेरिकेने घोषित केले आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला आहे. याशिवाय पाकिस्तानला त्याच्या मित्र राष्ट्राकडून म्हणजेचे चीनकडूनही मोठा झटका मिळाला आहे. चीनने देखील अमेरिकेच्या या निर्णयाचे अप्रत्यक्षपण समर्थन केले आहेत. तसेच पहलगाम हल्ल्याचा देखील निषेध केला आहे.
लष्कर-ए-तैयबा (TRF) ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना आहे. भारताच्या जम्मू आणि काश्मीरधील पहलगाम हल्ल्यानंतर या दहशतवादी संघटनेचे नाव पुढे आले होते. अमेरिकेने या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. यानंतर पाकिस्तानने या संघटनेशी कोणतेही संबंध असल्याचे नाकारले आहे.
दरम्यान आता चीनने देखील जाहीरपणे लष्कर-ए-तैयबा TRF चा दहशतवादी संघटना म्हणून उल्लेख केला आहे. तसेच पहलगाम हल्ल्याची देखील तीव्र निंदा केली आहे. चीन दहशतवादाविरोधात असल्याचे चीनने स्पष्ट केले आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण यापूर्वी अनेक वेळा चीनने पाकिस्तानला अशा प्रकरणांमध्ये पाठिंबा दर्शवला होता.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, चीन सर्व प्रकारच्या दहशतवादी कारवायांना ठामपणे विरोध करतो. तसेच सुरक्षा आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी प्रादेशिक देशांना दहशतवादविरोधात सहकार्याचे आवाहन करतो.
On the United States State Department designating The Resistance Front (TRF), a proxy of Pakistan-based terror group Lashkar-e-Taiba, which is also blamed for the terrorist attack in Jammu and Kashmir, as a Foreign Terrorist Organization and Specially Designated Global Terrorist… pic.twitter.com/NIlTAqk6Fn
— ANI (@ANI) July 19, 2025
दरम्यान पाकिस्ताने टीआरएफशी असलेले कोणतेही संबंध नाकारले आहेत. तसेच देशातील दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई केली असल्याचे म्हटले आहे. दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांना अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
या सर्व घडामोडी अशा वेळी घडत आहे, जेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे. सध्या पाकिस्तानसाठी ही परिस्थिती राजनैतिकदृष्ट्या अडथळा निर्माण करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प या भेटीनंतरही पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलत आहेत. या सर्व घटनांमुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटा पडत चालला आहे. मित्र देश चीनने देखील पाठ फिरवली आहे.