Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

White House shooting : अफगाणिस्तान दहशतवाद्याच्या प्रकरणात चिरडले जाणार ‘हे’ 18 देश; त्यापैकी एक भारताचा शेजारी

व्हाईट हाऊसबाहेर झालेल्या गोळीबारानंतर, अमेरिकन प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेनुसार, अमेरिकन एजन्सी अमेरिकेत असलेल्या अफगाणिस्तानसह 19 देशांच्या नागरिकांची चौकशी करत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 28, 2025 | 03:56 PM
US to act against 19 nations possible deportations under Trump directive

US to act against 19 nations possible deportations under Trump directive

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १९ चिंताजनक देशांतील नागरिकांना तातडीने हद्दपार करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • अफगाण नागरिकाने व्हाईट हाऊसबाहेर केलेल्या गोळीबारानंतर ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.
  • या कारवाईचा थेट परिणाम सुमारे २.३३ लाख लोकांवर होणार असून, यादीनुसार भारताचा शेजारी म्यानमारही प्रभावित देशांमध्ये आहे.

US to act against 19 nations deportations : व्हाईट हाऊसबाहेर (America) झालेल्या गोळीबारानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इमिग्रेशन धोरण पूर्णतः कडक केले असून, १९ चिंताजनक देशांतील नागरिकांना थेट हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. या यादीत अफगाणिस्तान, म्यानमारसह अनेक अस्थिर देशांचा समावेश असून, अमेरिकन प्रशासन या देशांतील नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की “अमेरिकेसाठी फायदेशीर नसलेल्यांना इथे थारा दिला जाणार नाही.”

या सर्व कारवाईची सुरुवात झाली ती व्हाईट हाऊसबाहेर झालेल्या एका धक्कादायक घटनेपासून. अफगाण नागरिक रहमुल्लाहवर अमेरिकन प्रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सच्या बाहेर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात एक अमेरिकन सैनिक ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने अमेरिकन सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि प्रशासन तातडीच्या मोडमध्ये गेले. त्यानंतरच अमेरिकेत असलेल्या १९ चिंताजनक देशांतील नागरिकांची तपासणी व शक्य असल्यास हद्दपारीची मोठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर लगेचच काही देशांना “परिस्थितीजन्य धोक्याचे देश” म्हणून घोषित केले होते. त्या वेळी त्यांच्या व्हिसांवर काही मर्यादा आणल्या होत्या, मात्र अमेरिकेत राहत असलेल्या नागरिकांवर मोठा परिणाम झाला नव्हता. परंतु आता घडलेल्या गोळीबारानंतर या यादीतील नागरिकांना थेट लक्ष्य केले जाणार असून, त्यांना हद्दपारीचे धोरण लागू होण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Most Powerful Nation’s: भारत जागतिक शक्ती यादीत टॉप-3 मध्ये; पाकिस्तानचा टॉप-15 मधून पत्ता कट

या १९ देशांमध्ये अफगाणिस्तानसह म्यानमार, चाड, काँगो प्रजासत्ताक, इराण, टोगो, सोमालिया, येमेन, लिबिया, बुरुंडी, विषुववृत्तीय गिनी, हैती, लाओस, सिएरा लिओन, टुर्कमेनिस्तान, व्हेनेझुएला यांसारखे अस्थिर व संघर्षग्रस्त देश आहेत. या यादीत भारताचा शेजारी म्यानमारही समाविष्ट असल्याने दक्षिण आशियाई परिस्थितीवरही याचा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.

TRUMP HALTS THIRD WORLD MIGRATION
Plus orders a Green Card audit of all citizens from 13 danger countries
Deportation of any danger citizens to follow THIS is what strong leadership looks like Instead, we’re governed by human rights lawyers! https://t.co/zc554ilfEs — Martin Daubney 🇬🇧 (@MartinDaubney) November 28, 2025

credit : social media and Twitter

ही कारवाई किती मोठी आहे याचा अंदाज न्यूजवीक मासिकाच्या अहवालातून मिळतो. त्यानुसार, अमेरिकन प्रशासनाच्या नव्या आदेशांचा २,३३,००० लोकांवर थेट परिणाम होणार आहे. यापैकी मोठ्या संख्येने नागरिक हे अफगाणिस्तानातून २०२१ मध्ये ताबा बदलल्यानंतर अमेरिकेत आश्रयासाठी आले होते. जोसेफ एडलो, यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसचे प्रमुख, यांनी सांगितले की, “चिंताजनक देशांमधून येणाऱ्या प्रत्येक परदेशी नागरिकाची सखोल व कठोर ग्रीन कार्ड तपासणी करण्याचे आदेश मिळाले आहेत.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : FACT CHECK : अखेर समोर आले किंग खान आणि PM मोदींच्या VIRAL ‘जिहाद’ व्हिडिओमागचे तथ्य; वाचा नक्की काय आहे सत्य?

बायडेन प्रशासनाच्या काळात अमेरिकेत सुमारे ५ लाख निर्वासित होते, परंतु ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ मोहिमेनुसार निर्वासितांची संख्या कमी करण्यात आली आहे. आता नव्या घटनेनंतर ही कारवाई आणखी कठोर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील सुरक्षा, राजकीय तणाव आणि बदललेले इमिग्रेशन धोरण यामुळे या देशांतील नागरिकांवर भविष्यात काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणते १९ देश अमेरिकेच्या चिंतेच्या यादीत आहेत?

    Ans: अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इराण, सोमालिया, येमेन, लिबिया, व्हेनेझुएला आणि इतर संघर्षग्रस्त देश.

  • Que: या कारवाईचा थेट परिणाम किती लोकांवर होणार?

    Ans: सुमारे २.३३ लाख लोकांवर थेट परिणाम अपेक्षित आहे.

  • Que: ही कारवाई का सुरू झाली?

    Ans: व्हाईट हाऊसबाहेर अफगाण नागरिकाने केलेल्या गोळीबारानंतर सुरक्षा कारणास्तव तपासणी आणि हद्दपारी मोहीम तीव्र झाली.

Web Title: Us to act against 19 nations possible deportations under trump directive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 03:56 PM

Topics:  

  • Afganistan
  • Donald Trump
  • international news
  • Myanmar

संबंधित बातम्या

Border Dispute: एका नव्या नोटेमुळे भारत-नेपाळमध्ये पेटली वादाची ठिणगी; सुगौली करारापासून आजपर्यंतचा 200 वर्षांचा वाद पुन्हा चिघळला
1

Border Dispute: एका नव्या नोटेमुळे भारत-नेपाळमध्ये पेटली वादाची ठिणगी; सुगौली करारापासून आजपर्यंतचा 200 वर्षांचा वाद पुन्हा चिघळला

White House : ‘मी तिसऱ्या जगातील देशांतील लोकांना अमेरिकेत…’ संतप्त Trump यांनी उचलले आणखी एक मोठे पाऊल
2

White House : ‘मी तिसऱ्या जगातील देशांतील लोकांना अमेरिकेत…’ संतप्त Trump यांनी उचलले आणखी एक मोठे पाऊल

Hong Kong Fire : 70 वर्षातील सर्वात मोठी आपत्ती; 4,600 लोकांची घरे उद्ध्वस्त, हाँगकाँग आगीत 94 जणांच्या मृत्यूंना जबाबदार कोण?
3

Hong Kong Fire : 70 वर्षातील सर्वात मोठी आपत्ती; 4,600 लोकांची घरे उद्ध्वस्त, हाँगकाँग आगीत 94 जणांच्या मृत्यूंना जबाबदार कोण?

अमेरिकेने सौदी क्राउन प्रिन्सला दिला धोका? F-35 फायटर जेटबाबत ट्रम्प यांनी खेळली ही मोठी खेळ, प्रकरण काय?
4

अमेरिकेने सौदी क्राउन प्रिन्सला दिला धोका? F-35 फायटर जेटबाबत ट्रम्प यांनी खेळली ही मोठी खेळ, प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.